Home आरोग्य Health : सकाळी रिकाम्या पोटी चहा-कॉफी ऐवजी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स
आरोग्य

Health : सकाळी रिकाम्या पोटी चहा-कॉफी ऐवजी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स

0

सकाळी उठल्यानंतर ब्रश झाला की सगळ्यांनाच हातात चहाचा कप हवा असतो. चहाशिवाय आपल्या भारतीय लोकांची दिवसाची सुरुवातच होत नाही. चहा आपल्या सर्वांसाठीच अमृततुल्य आहे. सकाळी जर चहा मिळाला नाही तर दिवसाची सुरुवात झाल्यासारखे वाटत नाही. उन्हाळा, हिवाळा किंवा पावसाळा ऋतू कोणताही असो चहा हा कॉमन असतो. सकाळी हातात गरमागरम वाफाळता मसालेदार चहा असला की जीवन कसे सार्थकी लागल्यासारखे वाटते. मात्र सकाळी उठल्यानंतर रिकाम्यापोटी चहा पिणे आपल्या आरोग्याच्यादृष्टीने अपायकारक आहे. (Health)

सकाळी उठल्यानंतर लगेच चहा पिणे म्हणजे आपल्या आरोग्यासाठी त्रासदायक आहे. कारण चहा, कॉफीमध्ये असलेले कॅफिन हे आपल्या शरीराच्या दृष्टीने अतिशय अयोग्य आहे. सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने ऍसिडिटी, गॅस, बद्धकोष्ठता आणि अपचनासारख्या समस्या उद्भवतात. चहामधील कॅफीनमुळे शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होऊन डिहायड्रेशन होऊ शकते, तसेच शरीरातील पोषक तत्वे, विशेषतः लोह शोषण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊन ऍनिमियाचा धोका वाढतो. पण सकाळी उठल्यानंतर चहा पिण्याची खूपच जुनी सवय सोडणे सोपे नसते. यासाठी तुम्ही सकाळी चहा ऐवजी इतर हेडी ड्रिंक्स घेऊन दिवसाची आरोग्यदायी सुरुवात करू शकतात. मग चहा ऐवजी कोणते पेय पिणे चांगले आहे? (Marathi)

दिवसाची सुरुवात करण्यासाठी गरम पाण्यात लिंबू मिसळून प्यायल्यास पचनक्रिया सुरळीत चालते. या सवयीमुळं शरीरातील हानिकारक घटकांचं उत्सर्जन होण्यास मदत होते. शिवाय तुम्ही आल्यामध्ये असणाऱ्या गुणांमुळं पोट फुगणं, मळमळ या आणि अशा समस्या दूर ठेवण्यास मदत होते. सकाळी गरम पाण्यात आलं मिसळून पिण्याचे अनेक फायदे होतात. पेपरमिंट किंवा पुदिन्यामध्ये असणाऱ्या गुणांनी स्नायूंना बळकटी मिळते. अपचनावर उपाय म्हणून गरम पाण्याच पुदिना मिसळून प्यावे. सकाळी तुम्ही चहाऐवजी पचनक्रिया सुधारण्यासाठी गरम पाण्यात अॅपल सायडर व्हिनेगर मिसळून प्यायल्यास अॅसिडीटी कमी होते. (Top Marathi HEadline)

Health

अनेक लोकं सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिक्स करून प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते. सोबतच मेटाबॉलिझम सुधारतो आणि वजन कमी होण्यास मदत होते. काही लोकं कोरफडीचा गर देखील सकाळी उठून पितात. पाण्यात कोरफडीचा रस टाकून प्यायल्यास आतड्यांमधील हानिकारक घटक शरीराबाहेर पडण्यास मदत होते. दुधात हळद मिसळून प्यायल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते. सांधेदुखी, सूज यावर आराम मिळतो आणि हा थंडी, खोकल्यावर प्रभावी उपाय आहे. आवळा रस सकाळी उपाशी पोटी प्यायल्याने शरीराला व्हिटॅमिन सी मिळते. केस आणि त्वचेसाठी उत्तम आहे. अँटीऑक्सिडंट्सनी युक्त आहे. (Latest Marathi News)

सकाळी चहाच्या जागी मेथी पाणी प्यायल्याने डायजेशन सुधारते. ब्लड शुगर नियंत्रणात राहते आणि पोट फुगणे गॅस होणे या समस्या कमी होतात. किंवा तुम्ही ग्रीन टी देखील घेऊ शकता. ग्रीन टी मध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर आहेत. त्यामुळे मानसिक ताजेपणा मिळतो आणि वजन कमी करण्यास मदत होते. सकाळी उठल्यानंतर चहाऐवजी बडीशेपचे पाणी पिणे देखील लाभदायक आहे. चवीला किंचित गोड, बडीशेपमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. हे पचनसंस्था सुधारण्यास मदत करते आणि अॅसिडिटीसारख्या समस्या कमी करते. (Top Trending Headline)

========

Period Cramps : पीरियड्समधील वेदना कमी करतील ही योगासने, मिळेल आराम              

 Health : रिकाम्या पोटी कढीपत्ता खाल्ल्याने आरोग्यास होतात ‘हे’ मोठे फायदे      

========

सकाळी पुदिना पाणी घेतल्याने पचन सुधारते आणि वजन कमी करण्यास मदत करते. पुदिन्याची पाने कोमट पाण्यात मिसळून रोज सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. हळदीचा चहा बनवण्यासाठी एक चमचा हळद एक चमचा मध, दालचिनी आणि २ कप पाणी घालून शिजवा. त्यात थोडी आले पावडरही टाकू शकता. जर तुम्हाला चहाच प्यायचा असेल तर तुम्ही चहापासून जास्तीत जास्त आरोग्य फायदे मिळवण्यासाठी ग्रीन टी, ब्लॅक टी किंवा हर्बल टीचे सेवन केले पाहिजे. आणि दूध व साखर या गोष्टी चहामध्ये टाकणे टाळायला हव्यात. (Social News)

(टीप : कोणतेही उपाय करताना डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

Blood Pressure 
आरोग्य

Health : स्मरणशक्ती शार्प ठेवण्यासाठी आजच आहारात करा ‘हे’ बदल

आपण दैनंदिन जीवनात करत असलेल्या प्रत्येक लहान सहान गोष्टीचा चांगला, वाईट परिणाम...

Potato
आरोग्य

Potato : खरंच बटाटा खाल्ल्याने वजन वाढते का?

आपल्या भारतीय घरांमध्ये स्वयंपाक घराचा राजा कोण असे विचारल्यावर सर्वच लोकांचे एकच...

Pooja Bhatt Relationships
आरोग्य

Dental Care : मोत्यासारखे पांढरेशुभ्र दात पाहिजे, मग आजच ‘हे’ उपाय करा

असे अनेकदा म्हटले जाते की दातांची ट्रीटमेंट ही सर्वात खर्चिक असते. त्यामुळे...

आरोग्य

Joints Sound : हाडांमधून येणाऱ्या कटकट आवाजाचे कारण आणि त्यावर उपाय

अनेकदा आपल्या लक्षात येते की, आपण खाली बसतो, उठतो तेव्हा आपल्या हाडांमधून...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!