अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धावर कायमचा विराम आणण्यासाठी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे चर्चा होणार आहे. यात अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेचे शिष्टमंडळ सहभागी होणार आहे. उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांच्यासह मध्यपूर्व दूत स्टीव्ह विटकॉफ आणि ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर हे इराण आणि अमेरिका यांच्यातील शस्त्रसंधीच्या बैठकीत अमेरिकेचे प्रतिनिधित्व करतील. यापैकी ट्रम्प यांचे जावई असलेल्या कुशनर यांची या शिष्टमंडळात काय भूमिका, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. कुशनर हे कुठल्याही सरकारी पदावर नसताना त्यांना या बैठकीसाठी का पाठवण्यात आले, हा प्रश्न विचारण्यात येऊ लागला आहे. कुशनर यांच्या या उपस्थितीमागे ट्रम्प यांचा वैयक्तिक आर्थिक संबंध असल्याचीही माहिती पुढे येत आहे. ट्रम्प यांच्या कौटुंबिक व्यवसायात या युद्धबंदीचा कसा फायदा करून घेता येईल, हे जाणण्यासाठीच कुशनर या बैठकीत सहभागी होतील, अशी टीकाही करण्यात येत आहे. ( Jared Kushner )

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धबंदी ही कायमस्वरूपी व्हावी म्हणून इस्लामाबाद येथे ११ एप्रिलपासून चर्चा होत आहे. यासाठी उपराष्ट्रपती जेडी व्हान्स, मध्यपूर्व दूत स्टीव्ह विटकॉफ यांच्यासह राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर हे इराणसोबत शांतता करारावर वाटाघाटी करण्यासाठी अमेरिकेच्या वतीने बैठकीत सहभागी होत आहेत. या तिघांसमोर इराणचे संसद अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची असतील. या वाटाघाटी फक्त या दोन देशांसाठीच महत्त्वाच्या नाहीत, तर संपूर्ण जगाचे हितसंबंध यामध्ये गुंतलेले आहेत. अमेरिका-इराण युद्ध सुरू झाल्यापासून जगभरात तेलाच्या व्यापारावर बंधने आली आहेत. शिवाय इराणने अमेरिकेच्या मध्यपूर्वेतील देशांमधील लष्करी छावण्यांवर हल्ले सुरू केल्यामुळे तेथेही तणावाचे वातावरण आहे. या युद्धामुळे अमेरिका, इस्रायल, इराण यांना जेवढी आर्थिक झळ बसली, त्याहून अधिक आर्थिक फटका यूएई, दुबई, सौदी अरेबिया, कुवेत या देशांना बसला आहे. त्यामुळेच हे युद्ध संपुष्टात यावे, यासाठी या देशांचाही प्रयत्न आहे. यासाठी जी शांतता वार्ता होणार आहे, त्यावर सगळे भविष्य अवलंबून राहणार आहे. या शांतता वार्तेमध्ये सहभागी होणारे इराणचे नेते हे सर्वाधिक अनुभवाचे आहेत, मात्र अमेरिकेच्या शिष्टमंडळाकडे पाहिले, तर जेडी व्हान्स वगळता अन्य कोणाकडेही फारसा राजकीय अनुभव नाही. त्यातही डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई कुशनर हे या वाटाघाटींमध्ये काय भूमिकेतून सहभागी होणार आहेत, हा सुद्धा एक प्रश्नच आहे.
४५ वर्षीय जेरेड कुशनर यांना कोणताही राजनैतिक अनुभव नाही. कुशनर गेल्या वर्षी स्टीव्ह विटकॉफ यांच्यासोबत इराणच्या चर्चेत सहभागी झाले होते, त्यावेळीही मोठी टीका करण्यात आली होती. कुशनर हे ज्यू समुदायाचे आहेत. यासाठी आधीच त्यांच्यावर अमेरिकेत टीका होत आहे. अमेरिका-इराण युद्ध सुरू करण्यामागेही जेरेड कुशनर यांचे हितसंबंध असल्याचा आरोप झाला होता. इस्रायलला अनुकूल असलेले अमेरिकेचे परराष्ट्र धोरण राबवण्यामागेही जेरेड कुशनर यांचाच हात असल्याची माहिती आहे. असे असताना आता तेच जेरेड कुशनर इस्लामाबादमध्ये होत असलेल्या महत्त्वाच्या वाटाघाटींमध्ये सहभागी होत असल्याने त्यांच्यावर आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर होत असलेल्या टीकेचा सूर वाढला आहे. जेरेड कुशनर यांच्याकडे अधिकृतपणे कोणतेही पद नाही. फेब्रुवारी २०२६ मध्ये ट्रम्प यांनी त्यांना विशेष शांतता दूत म्हणून नियुक्त केले आहे. २०२४ मध्ये जेव्हा ट्रम्प पुन्हा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले, तेव्हा व्यावसायिक असलेल्या जेरेड कुशनर यांनी सुरुवातीला व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्याचा आपला इरादा जाहीर केला. मात्र नंतर त्यांनी ट्रम्प यांच्या साथीनं राजकारणात प्रवेश करायला सुरुवात केली आहे. ट्रम्प यांनी जेरेड कुशनर यांना यापूर्वीही काही शांतता कराराच्या बैठकांना पाठवले आहे. ( Jared Kushner )
=======
हे देखील वाचा : Donald Trump Ceasefire : ट्रम्पच्या पलटीमागचं सत्य
=======
जेरेड कुशनर यांचा व्यवसाय मध्यपूर्वेवर केंद्रित आहे. त्यांच्या ‘अॅफिनिटी पार्टनर्स’ या कंपनीला सौदी अरेबिया, कतार आणि संयुक्त अरब अमिराती यांसारख्या देशांकडून भरीव निधी मिळतो. जेरेड कुशनर यांची संपत्ती १ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. इव्हांका ट्रम्प ही ट्रम्प यांची मुलगीही आपल्या पतीच्या व्यवसायात भागीदार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या २०१६ च्या अध्यक्षीय प्रचार मोहिमेतही जेरेड कुशनर यांची महत्त्वाची भूमिका होती. अर्थात, याचे फळ म्हणून ट्रम्प यांनी त्यांच्या कंपनीला अनेक सवलती दिल्याचीही माहिती आहे. २०२५ पासून कुशनर ट्रम्प प्रशासनात अनौपचारिक सल्लागार भूमिकेत आहेत. व्हाइट हाऊसचे अधिकारी म्हणून काम करत असताना कुशनर यांनी सरकारी कामकाजासाठी व्हॉट्सॲपचा वापर केला होता. त्यावर सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी आक्षेप घेतला होता. आता त्याच कुशनर यांच्यावर अमेरिका-इराण युद्ध सुरू करण्यासाठी कारणीभूत असल्याचा आरोप होत आहे. २९ सप्टेंबर २०२५ रोजी व्हाईट हाऊसमध्ये इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यासोबत कुशनर यांनी चर्चा केली. तिथूनच या युद्धाची योजना आखण्यात आल्याची माहिती आहे. अशातच कुशनर यांनाच शांततावार्तामध्येही पाठवले असल्यामुळे ट्रम्प यांच्या या निर्णयावर सर्वत्र टीका होत आहे. ( Jared Kushner )
सई बने…
- Affinity Partners
- backchannel diplomacy
- business interests
- controversial role
- diplomatic criticism
- Donald Trump son-in-law
- financial conflict
- Iran ceasefire talks
- Islamabad meeting
- Jared Kushner
- JD Vance
- Middle East envoy
- Middle East policy
- nepotism debate.
- Netanyahu connection
- no official position
- peace negotiations
- political controversy
- Qatar links
- Saudi funding
- Steve Witkoff
- Trump family influence
- U.S.-Iran talks
- UAE connections
- White House adviser