Home गाजावाजा Jagannath Rath Yatra : जगन्नाथ रथयात्रेच्या तारखा जाहीर
गाजावाजा

Jagannath Rath Yatra : जगन्नाथ रथयात्रेच्या तारखा जाहीर

0
Winter Trip

ओडिशा येथे होणारी जगन्नाथ रथयात्रा देशातील सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक आहे. यामध्ये भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचे भव्य रथ तयार करण्यात येतात. या रथातून भगवान जगन्नाथ हे त्यांच्या मावशीच्या घरी, म्हणजेच गुंडीचा मंदिराला भेट देण्यासाठी जातात. हा सगळा सोहळा आगळावेगळा असतो. अगदी भगवान जगन्नाथांच्या रथांचे निर्माण करण्यापासूनची प्रक्रियाही वेगळी असते. हजारो वर्षांपासून यासाठी ज्या परंपरा होत्या, त्यांचे पालन यावेळी काटेकोरपणे केले जाते. या यात्रेमध्ये प्रभू जगन्नाथ यांचे दर्शन घेतल्यावर आणि देवाचा रथ ओढल्याने जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते, अशी धारणा आहे. यामुळेच या रथयात्रेसाठी जगभरातून लाखो भाविक जगन्नाथपुरीमध्ये दाखल होतात. ही यात्रा आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी साजरी केली जाते. यावर्षी ही यात्रा १६ जुलै रोजी सुरू होणार आहे. यात्रेसाठी भगवान जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा यांच्या रथांचे निर्माणकार्यही सुरू झाले आहे. ( Jagannath Rath Yatra )

जगन्नाथ रथयात्रा हा भारतातील प्रमुख आणि विशेष उत्सवांपैकी एक आहे. ही रथयात्रा श्री गुंडीचा यात्रा म्हणूनही ओळखली जाते. जगन्नाथ रथयात्रा ही भगवान विष्णूचा अवतार जगन्नाथ, त्यांचे थोरले बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांना समर्पित आहे. जगभरातील भाविक ही यात्रा कधी होणार, याची प्रतीक्षा करीत असतात. यावर्षीच्या जगन्नाथ यात्रेची तारीख जाहीर झाली आहे. जगन्नाथ रथयात्रा २०२६ मध्ये गुरुवार, १६ जुलै २०२६ रोजी होणार आहे. या यात्रेचा परतीचा प्रवास २४ जुलै २०२६ रोजी होईल. या यात्रेचा प्रारंभ विधी १५ जुलै २०२६ रोजी सकाळी ११:५० वाजता सुरू होईल. प्रत्यक्ष यात्रा १६ जुलै रोजी सकाळी ८.५२ वाजता सुरू होईल.

या यात्रेसाठी वापरण्यात येणाऱ्या रथांच्या निर्मितीसाठीही मुहूर्त काढण्यात येतो. या रथासाठी विशिष्ट जंगलातील लाकडे वापरली जातात. ही लाकडे कापण्याचाही मुहूर्त असतो. या रथांच्या बांधणीची तयारी माघ शुक्ल पंचमीला रथ अनुसूल या विधीने सुरू झाली. भगवान जगन्नाथ यांच्या श्री गुंडीचा यात्रेच्या तयारीमधील हा पहिला टप्पा अतिशय महत्त्वाचा असतो. यासाठी परंपरेनुसार, रथांच्या बांधणीसाठी आणलेल्या लाकडाची रथखला, म्हणजेच जिथे रथ तयार होतात, त्या ठिकाणी पूजा आणि अभिषेक करण्यात आला. यापूर्वी रथखला येथे धौरा लाकडाचे तीन तुकडे तेथे स्थापित करण्यात आले. वंशपरंपरागत ब्राह्मण आणि राजगुरूंनी केलेल्या वैदिक मंत्रोच्चारांसह पारंपरिक पद्धतीने विशेष पूजा करण्यात आली. याप्रसंगी, या वर्षीची रथयात्रा शांततेत आणि सुरळीतपणे पार पडावी, यासाठी पवित्र त्रिमूर्तींना प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर रामनवमीला रथाच्या लाकडाची तोडणी आणि त्याला आकार देण्याचे काम सुरू झाले. रथांच्या औपचारिक बांधणीला अक्षय तृतीयेला सुरुवात होणार आहे. तीन रथांच्या बांधणीसाठी एकूण ८६५ लाकडाचे तुकडे लागतात. गेल्या वर्षीचे ४७ तुकडे शिल्लक असून त्यांचाही वापर यावर्षीच्या रथामध्ये होणार आहे. ( Jagannath Rath Yatra )

स्कंद पुराणानुसार, जो व्यक्ती भगवान जगन्नाथाच्या नावाचा जप करून रथयात्रेदरम्यान गुंडीचा येथे पोहोचतो, तो पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्त होतो. जगन्नाथ रथयात्रेची सुरुवात कशी आणि केव्हा झाली, याबद्दल विविध कथा प्रचलित आहेत. ही यात्रा १२व्या आणि १६व्या शतकादरम्यान सुरू झाली असे मानले जाते. भव्य रथयात्रा साजरी करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक एकत्र येतात. यातून सामाजिक ऐक्याचा मोठा संदेश देण्यात येतो. भगवान जगन्नाथांचा रथ जगन्नाथ मंदिरापासून गुंडीचा मंदिरापर्यंत प्रवास करतो. यात्रेपूर्वी छेरा विधी करण्याची परंपरा आहे. या विधीमध्ये ओडिशाचे महाराज सोन्याच्या झाडूने रथ स्वच्छ करतात. या प्रक्रियेला छेरा विधी म्हणतात. हा विधी पाहण्यासाठीही भाविकांची मोठी गर्दी होते.

=======

हे देखील वाचा : Chardham Yatra : चारधाम यात्रेची तयारी सुरू

=======

रथयात्रेदरम्यान तीन रथ बनवले जातात. यातील भगवान जगन्नाथांच्या रथाला नंदीघोष म्हणतात. हा सर्वात मोठा रथ असून तो लाल रंगाचा असतो. त्याला १६ चाके असतात. भगवान बलभद्राच्या रथाला तालध्वज म्हणतात. हा रथ हिरव्या, निळ्या आणि लाल रंगात बनवलेला असून त्याला १४ चाके असतात. देवी सुभद्राच्या रथाला दर्पदलन म्हणतात. तो लाल आणि काळ्या रंगाचा असून त्याला १२ चाके असतात. जगन्नाथ रथयात्रा हा नऊ दिवसांचा उत्सव आहे. भगवान जगन्नाथ गुंडीचा मंदिरात काही दिवस विश्रांती घेतात आणि नंतर ‘बाहुडा यात्रे’दरम्यान आपल्या मुख्य मंदिरात परत येतात. आता यावर्षीच्या रथयात्रेसाठी मोठ्या प्रमाणात तयारी सुरू झाली असून भाविकांनी आत्तापासून निवासासाठी हॉटेलची बुकिंगही सुरू केली आहे. ( Jagannath Rath Yatra )

सई बने…

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

गाजावाजा

Law Awareness : गाडीवर लाल-निळा दिवा लावण्याचा अधिकार कोणाला ?

Law Awareness : अलीकडेच मुंबईच्या महापौर Ritu Tawde यांच्या गाडीवर लाल-निळा दिवा...

गाजावाजा

Police : ‘तडीपार’ कारवाई म्हणजे नेमकं काय ? Police कशी करते अंमलबजावणी

Police :  गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून विविध उपाययोजना केल्या जातात. त्यापैकीच एक...

गाजावाजा

परंपरा की वादग्रस्त प्रथा ? ‘या’ समाजात दुसऱ्याची पत्नी पळवून लग्न करण्याची विचित्र रीत

Bride Capture Traction : जगभरात विविध संस्कृती आणि परंपरा आढळतात. काही परंपरा...

गाजावाजा

Parkinsons : तरुणांमध्ये वाढतोय Parkinson’s Disease चा धोका!

Parkinsons : पूर्वी वृद्धापकाळाशी संबंधित मानला जाणारा पार्किन्सनचा आजार आता तरुणांमध्येही वाढताना...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!