Home लाईफ स्टाईल Chaitra Purnima : जाणून घ्या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये
लाईफ स्टाईल

Chaitra Purnima : जाणून घ्या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये

74
Vaikuntha Chaturdashi | Top Stories

हिंदू धर्मामध्ये चैत्र पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. पंचांगानुसार पौर्णिमा तिथीची सुरुवात आज सकाळी 07.07 वाजता झाली असून पौर्णिमा तिथीची समाप्ती 2 एप्रिल अर्थात उद्या सकाळी 07.42 वाजता होईल. धार्मिक मान्यतेनुसार उदया तिथीनुसार चैत्र पौर्णिमेचा उपवास 2 एप्रिल गुरुवार रोजी केला जाणार आहे. पौर्णिमेचे पवित्र स्नान आणि दान देखील याच दिवशी करावे. 2 एप्रिल रोजी सूर्योदयाच्या वेळी पौर्णिमा तिथी असल्याने त्या दिवशी पवित्र स्नान आणि दान करणे अधिक शुभ ठरेल. हिंदू धर्मात पौर्णिमा तिथीचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी जगाचे रक्षणकर्ता भगवान विष्णू आणि धनाची देवी लक्ष्मी यांची पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी विधीनुसार पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. चैत्र पौर्णिमा हा धन, समृद्धी आणि विपुलतेसाठी देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी एक अतिशय शक्तिशाली काळ मानला जातो. त्यामुळे यादिवशी जर काही उपाय केले तर त्याचा नक्कीच लाभ होऊन तुमच्यावर लक्ष्मी देवीची कृपा होऊ शकते. (Chaitra purnima)

चैत्र पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू यांची पूजा करणे विशेष फलदायी मानले जाते. शिवाय या दिवशी सत्यनारायण पूजा करणे आणि कथा ऐकणे देखील शुभ मानले जाते. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी चंद्राला दूध मिश्रित जलाने अर्घ्य अर्पण करणे शुभ मानले जाते. तसेच या दिवशी हनुमान जयंती असल्याने हनुमान चालीसा किंवा सुंदरकांडाचे पठण केल्याने मनाला शांती मिळते आणि जीवनात सकारात्मकता येते, असे म्हणतात. (Lord Vishnu)

चैत्र पौर्णिमेच्या दिवशी पूजा करताना, भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवीला नारळ आणि तांदळाची खीर अर्पण केली जाते. त्यासोबत चैत्र पौर्णिमेची ही तिथी पूजेबरोबरच पूर्वजांसाठी खूप महत्वाची आहे. या दिवशी पूर्वजांना तर्पण आणि पिंडदान अर्पण केल्याने पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते आणि त्यांना मोक्ष मिळतो. व आपल्याला पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात. गंगा किंवा इतर कोणत्याही पवित्र नदीच्या काठावर जाऊन तुमच्या पूर्वजांसाठी पिंडदान करा. नेहमी दुपारच्या वेळेस पिंडदान करा. पूर्वजांना पिंडदान करण्यासाठी दुपारची वेळ सर्वोत्तम मानली जाते. पिंडदान करताना, तुमच्या पूर्वजांचे ध्यान करा. त्याच्या आशीर्वादासाठी त्यांची प्रार्थना करा. (Marathi)

असे मानले जाते की देवी लक्ष्मी स्वच्छ ठिकाणी राहते. पूजा सुरू करण्यापूर्वी तुमचे घर पूर्णपणे स्वच्छ करा. स्वच्छता म्हणजे नकारात्मक उर्जेपासून बचाव करणे आणि समृद्धीचे स्वागत करणे. या दिवशी देवी लक्ष्मी समोर दिवा लावा आणि शक्य असल्यास कामगट्टा माळेचा वापर करून 108 वेळा मंत्रांचा जप करा. श्री सुक्तम आणि लक्ष्मी स्तोत्र पठण किंवा ऐका. तिला खूश करण्याचा हा सर्वात प्रभावी मार्गांपैकी एक आहे. लक्ष्मी अष्टाक्षरी मंत्र: देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी शक्तिशाली मंत्र. (Todays Marathi Headline)

Chaitra Purnima

चैत्र पौर्णिमेच्या दिवशी डाळिंब, केळी आणि आंबा यासारखी ताजी फळे अर्पण करा. कारण ही समृद्धी आणि प्रजननक्षमतेचे प्रतीक आहेत. लाडू, खीर, दूध यासारख्या मिठाई आणि गुळापासून बनवलेल्या मिठाई लक्ष्मीसाठी शुभ अर्पण मानल्या जातात. तांदूळ हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी या खास दिवशी गरजूंना दान करायला विसरू नका. गरिबांना किंवा धार्मिक संस्थांना अन्न, कपडे किंवा पैसे दान करा. प्राणी आणि पक्ष्यांना विशेषतः गायी आणि कावळ्यांना अन्न द्या. आईचा आशीर्वाद घेणे हे एक शुभ कार्य मानले जाते. (Top Marathi News)

चैत्र पौर्णिमेच्या काय करू नये
– या दिवशी चुकूनही जास्त वेळ झोपू नये. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान विष्णूची पूजा करावी. पौर्णिमेच्या दिवशी दान आणि दक्षिणा देण्याला विशेष महत्त्व आहे.
– चैत्र पौर्णिमेच्या शुभ दिवशी सूर्यास्तानंतर तुळशीच्या झाडाला पाणी अर्पण करणे टाळा. यामुळे देवी लक्ष्मी तुमच्यावर रागावू शकते. याशिवाय, तुम्हाला ग्रह दोषांचाही त्रास होऊ शकतो. (Latest Marathi Headline)
– चैत्र पौर्णिमेचा दिवस अत्यंत पवित्र असतो. या दिवशी चुकूनही तामसिक भोजन, मांसाहार, मद्य आदींचं सेवन करू नये. असं मानलं जातं की, या दिवशी तामसिक अन्नाचे सेवन केल्याने मनावर नकारात्मक परिणाम होतो, जीवनात नकारात्मकता येते. त्यामुळे या दिवशी सात्विक अन्न खावं.
– चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आचरण शुद्ध ठेवावं. या दिवशी कोणासाठीही अपशब्द वापरू नयेत. असं मानलं जातं की, यामुळे चंद्र देव क्रोधित होतो.
– पौर्णिमेच्या दिवशी तुळशीची पानं चुकूनही तोडू नये. तुळशीची पानं भगवान विष्णूला खूप प्रिय आहेत, परंतु पौर्णिमेच्या दिवशी तुळशीची पानं तोडणं अशुभ मानलं जातं आणि असं केल्यास भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळत नाही. (Top Trending News)

==========

Chaitra Purnima : हिंदू नवीन वर्षातील पहिली पौर्णिमा असलेल्या चैत्र पौर्णिमेचे महत्त्व

Hanuman : रावणाविरुद्ध युद्ध जिंकल्यानंतर रामाची वानरसेना गेली तरी कुठे?

==========
– पौराणिक मान्यतेनुसार, पौर्णिमेच्या रात्री दह्याचं सेवन करू नये. यामुळे चंद्र दोष निर्माण होतो आणि आर्थिक नुकसानीसह जीवनात अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. रात्री दही खाल्ल्याने आरोग्यासंबंधी अनेक समस्या देखील निर्माण होतात. (Top Stories)
– चैत्र पौर्णिमेच्या दिवशी नखे, केस आणि दाढी कापणे टाळा. यामुळे तुमच्या आयुष्यात नकारात्मक ऊर्जा येईल, ज्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहाल.
– पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचा प्रभाव सर्वाधिक असतो. पौर्णिमेच्या रात्री तो त्याच्या परिपूर्ण कलांनी संपन्न होतो, अशी मान्यता आहे. अशा स्थितीत पौर्णिमेच्या दिवशी असं कोणतंही काम करणं टाळावं ज्यामुळे चंद्रदोष होऊ शकतो.
– चैत्र पौर्णिमेच्या दिवशी मन शांत ठेवावं. राग, मत्सर आणि नकारात्मक विचार दूर ठेवावे.
– चैत्र पौर्णिमेच्या शुभ दिवशी खोटे बोलू नका आणि कोणाचाही अनादर करू नका. विशेषतः महिला आणि ज्येष्ठांचा आदर करा.
– चैत्र पौर्णिमेच्या दिवशी दान केलेल्या वस्तू खाऊ नयेत. याशिवाय कोणाच्याही घरून आणलेले गोड पदार्थ किंवा अन्नपदार्थ खाऊ नका. (Social News)

( टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!

📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा

Related Articles

Akshaya Tritiya
लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला मीठ का खरेदी केली जाते?

आता लवकरच अक्षय्य तृतीयेचा सण येत आहे. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला...

लाईफ स्टाईल

Gold : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याला एवढे महत्त्व का आहे?

आज अक्षय्य तृतीया. साडे तीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेचे ओळख...

Parshuram
लाईफ स्टाईल

Parshuram : भगवान परशुरामांबद्दलची रंजक तथ्ये

परशुराम यांना भगवान विष्णू यांचा सहावा अवतार समजले जाते. मान्यतेनुसार भगवान विष्णू...

लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला ‘ही’ कामे करून पुण्य कमवा

वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!