हिंदू धर्मशास्त्रानुसार, प्रत्येक वर्षी चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते. हिंदू धर्मात संकटमोचन हनुमानाला कलयुगाचा देवता मानण्यात आलं आहे. या दिवशी हनुमानाची विधीवत पूजा केली जाते. यंदा 2 एप्रिल रोजी हनुमानाचा जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. हनुमानाला एक शक्तिशाली देव मानले जाते. ते भगवान रामाचे भक्त होते. याकाळात हनुमानाची पूजा केल्यास भूत आणि नकारात्मक शक्तींचाही अंत होते असे मान्यता आहे. या दिवशी हनुमान चालीसा किंवा सुंदरकांड पठण करण्याला विशेष महत्त्व आहे. (Hanuman Jayanti)
हनुमान जयंतीनिमित्त भक्त हनुमानाच्या मंदिरात जातात आणि तिथे पूजा-अभिषेक करून हनुमानाचे नामस्मरण करतात. सूर्योदयापूर्वी हनुमान चालीसा पठण करून हनुमान पूजा केली जाते. हनुमानाची पूजा केल्याने चिंता दूर होतात, कुंडलीतील ग्रहांच्या नकारात्मक स्थानाचा प्रभाव कमी होतो, संपत्ती आणि आरोग्य मिळते आणि येणाऱ्या अडचणी-अडथळे दूर होतात असे मानले जाते. हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने आपण त्यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल माहिती जाणून घेऊया. (Marathi)
हनुमान हे श्रीरामाचे अतिशय मोठे किंबहुना सर्वात मोठे भक्त होते. आजही श्रीरामांसोबत हनुमानाची सर्वत्र पूजा केली जाते. श्रीरामांच्या या श्रेष्ठ भक्ताची आणि त्यांची भेट नक्की कशी आणि कुठे झाली ते आपण जाणून घेऊया. जेव्हा श्रीराम, सीता आणि लक्ष्मण हे 14 वर्षांच्या वनवासासाठी निघाल्यावर पंचवटीमध्ये पोहचले तेव्हा, सीता मातेचे रावणाने अपहरण केले. सीता मातेचा शोध घेण्यासाठी जेव्हा श्रीराम आणि लक्ष्मण फिरत होते तेव्हा, ते फिरता फिरत ऋष्यमूक पर्वताजवळ पोहोचले. रामजी आणि लक्ष्मण जेव्हा ऋष्यमूक पर्वतावर पोहोचले तेव्हा वानरराजा सुग्रीवने त्यांच्यावर संशय व्यक्त करत त्यांना त्याचा भाऊ बालीने पाठवले असल्याची शंका व्यक्त केली. त्यामुळे त्यांची ओळख पटवण्यासाठी सुग्रीवाने बजरंगबलीला सांगितले की, दोन तरुण जंगलात भटकत आहेत. हे दोघे कोण आहेत याचा अंदाज तुम्हाला आलाच पाहिजे. सुग्रीवाने असेही सांगितले की, बालीने त्याला आपल्याला मारण्यासाठी पाठवले आहे की, नाही हे पडताळून बघ. (Top Trending News)

यानंतर हनुमानजींनी ऋषींचे रूप धारण केले आणि रामजींना विचारले की तुम्ही दोघे या पर्वतावर कोणत्या उद्देशाने आला आहात? त्यांच्या प्रश्नावर रामजी म्हणाले की मी माझी पत्नी सीतेचा शोध घेण्यासाठी निघालो आहे. माझ्या पत्नीचे रावणाने अपहरण केले आहे. म्हणून मी त्यांना शोधण्यासाठी ऋष्यमूक पर्वतावर आलो आहे. श्री राम आणि लक्ष्मण सीतेचा शोध घेत किष्किंधा येथे पोहोचले. त्यावेळी सुग्रीव, हनुमानजी आणि जामवंत बालीच्या भीतीने एका गुहेत लपून बसले होते. हनुमानजी श्री राम आणि लक्ष्मण यांच्याकडे पोहोचले. जेव्हा ते बोलले तेव्हा श्री रामांनी हनुमानजींना त्यांची समस्या सांगितली की माझी पत्नी सीता एका राक्षसाने पळवून नेली आहे. आम्ही सीतेचा शोध घेत आहोत, पण आम्हाला कोणतीही माहिती मिळत नाही. (Top Stories)
=========
Hanuman Jayanti : हनुमानाने का घेतला होता पंचमुखी अवतार?
Hanuman Jayanti : हनुमान जयंतीचे महत्त्व आणि पूजेचा विधी
=========
हनुमानजींनी श्री रामांचे शब्द खूप काळजीपूर्वक ऐकले, समजून घेतले आणि ते म्हणाले की मी वानरांचा राजा सुग्रीवाचा दूत आहे. माझ्या राजाची समस्या अशी आहे की त्याचा मोठा भाऊ बाली त्याला मारू इच्छितो, बाली खूप शक्तिशाली आहे, म्हणून सुग्रीव येथे लपून बसला आहे. माझा राजा आणि तुम्ही दोघेही काळजीत आहात. तुम्ही माझे पूज्य आहात, मी तुम्हाला सुग्रीवाशी मैत्री करण्याची विनंती करतो. सुग्रीवाची समस्या सोडवा आणि मग सुग्रीवा तुम्हाला देवी सीतेच्या शोधात मदत करेल. (Social News)
( टीप : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. आम्ही या माहितीची कोणतीही पुष्टी करत नाही. आमचा उद्देश फक्त तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics