Home आंतरराष्ट्रीय Population Crisis : चला प्रेमाच्या गावाला…
आंतरराष्ट्रीयगाजावाजा

Population Crisis : चला प्रेमाच्या गावाला…

71

विद्यार्थी सुट्टीची वाट बघत असतात. परीक्षा झाल्यावर येणारी सुट्टी म्हणजे सर्वच विद्यार्थ्यांसाठी धम्माल मजेची असते. पर्यटनाची असते, अगदी आरामाची सुद्धा असते. पण याच सुट्टीमध्ये प्रेमात पडा… असा सल्ला कोणी दिला तर? ही जर-तरची घटना प्रत्यक्षात चीनमध्ये घडली आहे. चीनच्या एका विद्यापीठाने विद्यार्थ्यांना चक्क सुट्टीमध्ये प्रेमात पडा असा गोड सल्ला दिला आहे. ( Population Crisis )

या गोड सल्ल्यामागे सध्याच्या चीनचे वास्तव आहे. चीनमध्ये लोकसंख्येचा दर झपाट्याने खालावत आहे. या सर्वांमागे चीनने काही वर्षांपूर्वी राबवलेले एक-मूल धोरण आहे. त्यात आता चीनमधील नोकरीतील अस्थिरताही कारणीभूत ठरत आहे. आठवड्याचे सातही दिवस १२ तासांहून अधिक वेळ येथील नोकरदारांचा कार्यालयात जातो. या सर्वाचा गंभीर सामाजिक परिणाम होत असून अनेक तरुण लग्न करण्याचे टाळत आहेत. शिवाय घरांच्या किमती आणि चीनमधील वाढती महागाई यांचा परिणाम म्हणून ज्यांचे लग्न झाले आहे, अशीही जोडपी मुलांना जन्म देण्याचे टाळत आहेत. याचा परिणाम म्हणून चीनमध्ये २०३५ पर्यंत लोकसंख्येत वरिष्ठ नागरिकांची सर्वाधिक भर होणार आहे. चीनच्या वर्चस्ववादी धोरणाला यामुळे जबर फटका बसणार आहे.

भविष्यातील हा सर्व धोका पाहता चीनमध्ये आता तरुणांना लग्न करण्यासाठी आणि मुलांना जन्म देण्यासाठी गळ घालण्यात येत आहे. त्यात आता चीनमधील विद्यापीठांचाही समावेश झाला आहे. या विद्यापीठांमधून विद्यार्थ्यांना सुट्टीच्या काळात प्रेमात पडा… आणि पुढचे आयुष्य एकत्र घालवा असा सल्ला देण्यात येत आहे. ( Population Crisis )

वर्चस्ववादी चीनची अंतर्गत सामाजिक परिस्थिती चिंताजनक आहे. सध्या चीनमध्ये घटत्या जन्मदराशी लढा सुरू आहे. २०२५ मध्ये चीनची लोकसंख्या सलग चौथ्या वर्षी घटली आणि जन्मदर विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला. तज्ज्ञांनी त्यात आणखी घट होण्याचा अंदाज वर्तवला आहे. मुलांच्या जन्मदरात गंभीर घट झाल्यामुळे आता सरकारी पातळीवर तरुणांना लग्न करा, असे आवाहन करण्यात येत आहे. यासाठी चीनमधील विद्यापीठांमध्येही सूचना देण्यात आल्या आहेत.

त्यातूनच तिथे सुरू होत असलेल्या वसंत महोत्सवाचे निमित्त साधून विद्यार्थ्यांनी प्रेमात पडावे, असे चिनी विद्यापीठे आवाहन करीत आहेत. “फुलांकडे पाहा आणि प्रणयाचा आनंद घ्या” असे आवाहन करणारी पत्रके या विद्यापीठांतर्फे विद्यार्थ्यांना देण्यात आली आहेत. काही विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या मध्यावधी सुट्टीत “फुलांचा आनंद घ्या आणि प्रेमात पडा” असे आवाहन केले आहे. सिचुआन साउथवेस्ट व्होकेशनल कॉलेज ऑफ एव्हिएशनने आपल्या अधिकृत वीचॅट खात्यावर १ ते ६ एप्रिल दरम्यान होणाऱ्या वसंत ऋतूतील सुट्ट्यांची संकल्पना “फुले पाहा आणि प्रेमात पडा” अशी जाहीर केली आहे. सोबतच विद्यार्थी आणि शिक्षकांना आपली पुस्तके बाजूला ठेवा आणि सुट्टीचा आनंद आपल्या प्रियजनांसोबत घ्या, असाही प्रेमळ आग्रह करण्यात आला आहे. ( Population Crisis )

चीनमध्ये उन्हाळी आणि हिवाळी सुट्ट्यांव्यतिरिक्त वसंत आणि शरद ऋतूमध्येही शालेय सुट्ट्या सुरू करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांमध्ये प्रेमाची भावना वाढवण्यासाठी या सुट्ट्या आवश्यक असल्याचा अहवाल तेथील काही विद्यापीठांनी सरकारकडे पाठवल्यानंतर या दोन सुट्ट्यांचा निर्णय घेण्यात आला. हा एक असामान्य उपक्रम मानला जात असून त्यातूनच तरुणांमध्ये विवाह संस्थेबाबत आत्मीयता निर्माण होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून चीनमध्ये सरकारी पातळीवर विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. आता या उपक्रमामध्ये विद्यापीठांचाही समावेश करण्यात आला आहे.

=======

हे देखील वाचा : Shakumbhari Shakti Peeth : शाकुंभरी शक्तीपीठाची महती

=======

चीनमध्ये गेली काही वर्षे राबवण्यात आलेल्या एक-मूल धोरणामुळे लोकसंख्येचा असमतोल वाढला. या सर्वांचे अनेक घातक परिणाम झाले. त्यातील एक परिणाम म्हणजे तरुण पिढीला नातेसंबंधांविषयी फारशी आत्मीयता राहिलेली नाही. हा कौटुंबिक जिव्हाळा वाढवण्यासाठी चीनमध्ये आता अनेक सामाजिक संस्था पुढे आल्या आहेत. ( Population Crisis )

चीन सरकारने २५ सप्टेंबर १९८० रोजी अधिकृतपणे एक-मूल धोरण स्वीकारले. या धोरणाचे ४६ वर्षांनंतर चीनवर विपरीत परिणाम झाले आहेत. एक-मूल धोरण स्वीकारल्यानंतर चीनमध्ये स्त्रीभ्रूणहत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली. परिणामी लोकसंख्येत असमतोल निर्माण झाला. यातून लग्न करण्यासाठी मुलांना मुली मिळेनात अशी परिस्थिती तिथे निर्माण झाली. अन्य देशांमधून भरपूर पैसे मोजून मुली विकत आणल्या गेल्या आणि त्यांचा विवाह चीनमधील तरुणांबरोबर लावला जाऊ लागला.

या सर्वामुळे शहाणे झालेल्या चीन सरकारने आता आपले एक-मूल धोरण मागे घेत जास्तीत जास्त मुलांना जन्म द्या, असे आवाहन करायला सुरुवात केली आहे. सरकार आता कर्मचाऱ्यांना ऑफ-सीझनमध्ये प्रवास करण्यासाठी पगारी रजा देत आहे. लग्न करण्यासाठी उत्सुक असलेल्या जोडप्यांचा खर्चही करण्यास सरकारची तयारी आहे. यातून सरकारला जन्मदरातील घट दूर करता येईल, अशी आशा आहे. ( Population Crisis )

— सई बने

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

गाजावाजा

Law Awareness : गाडीवर लाल-निळा दिवा लावण्याचा अधिकार कोणाला ?

Law Awareness : अलीकडेच मुंबईच्या महापौर Ritu Tawde यांच्या गाडीवर लाल-निळा दिवा...

गाजावाजा

Police : ‘तडीपार’ कारवाई म्हणजे नेमकं काय ? Police कशी करते अंमलबजावणी

Police :  गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून विविध उपाययोजना केल्या जातात. त्यापैकीच एक...

गाजावाजा

परंपरा की वादग्रस्त प्रथा ? ‘या’ समाजात दुसऱ्याची पत्नी पळवून लग्न करण्याची विचित्र रीत

Bride Capture Traction : जगभरात विविध संस्कृती आणि परंपरा आढळतात. काही परंपरा...

गाजावाजा

Parkinsons : तरुणांमध्ये वाढतोय Parkinson’s Disease चा धोका!

Parkinsons : पूर्वी वृद्धापकाळाशी संबंधित मानला जाणारा पार्किन्सनचा आजार आता तरुणांमध्येही वाढताना...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!