Home आंतरराष्ट्रीय Iran’s Hormuz Island : होर्मुझ बेट…. लाल माती आणि सॉस
आंतरराष्ट्रीय

Iran’s Hormuz Island : होर्मुझ बेट…. लाल माती आणि सॉस

74

अमेरिका, इस्रायल आणि इराणवरील युद्धामध्ये सध्या सर्वात जे नाव चर्चेत आहे, ते म्हणजे होर्मुझच्या सामुद्रधुनीचे. पर्शियन आखात आणि ओमानच्या आखाताच्या दरम्यान हा एक अरुंद आणि महत्त्वाचा सागरी मार्ग आहे. अमेरिका-इराण युद्ध सुरू होईपर्यंत जगातील सर्वाधिक तेलाची निर्यात याच मार्गावरून होत होती. आता इराणने हाच मार्ग बंद करून अमेरिका आणि जगातील सर्व देशांचे नाक दाबण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय तेलपुरवठ्यावर आणि अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीची चर्चा होत असताना होर्मुझ बेटांचे वैशिष्ट्य मात्र झाकोळले गेले आहे. वास्तविक ही होर्मुझ बेटे म्हणजे निसर्गसौंदर्याचा अद्भुत नजारा आहेत. इराणच्या होर्मुझ बेटाचे समुद्रकिनारे, विशेषतः रेड बीच, त्याच्या अद्वितीय लाल मातीमुळे पर्यटकांच्या पसंतीचे स्थान आहे. येथील मातीमध्ये लोह ऑक्साईडचे प्रमाण जास्त असल्यामुळे ही माती अक्षरशः रक्तासारखी लाल दिसते. याशिवाय होर्मुझ बेटांवर अन्यही रंगांची माती आढळते. त्यामुळे ही बेटे रंगीबेरंगी दिसतात. या बेटांचे सौंदर्य टिपण्यासाठी अनेक छायाचित्रकार येथे गर्दी करतात. इराणच्या स्थानिक साहित्यामध्ये होर्मुझ बेटांच्या सौंदर्यावर अनेक काव्यरचना करण्यात आल्या आहेत. आता जगाच्या चर्चेचा केंद्रबिंदू होर्मुझ सामुद्रधुनीवर असताना या बेटांचे आतील निसर्गसौंदर्य अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमुळे काळवंडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ( Iran’s Hormuz Island )

अमेरिका आणि इराणच्या युद्धामध्ये सध्या होर्मुझ सामुद्रधुनीचे नाव सर्वत्र चर्चेत आहे. समुद्रातील हा चिंचोळा मार्ग जगाच्या तेलनिर्यातीमधील महत्त्वाचा टप्पा होता. मात्र आता हाच मार्ग इराणने बंद करत तेलनिर्यात रोखण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे तेलाच्या किंमती आभाळाला भिडल्या आहेत. या सर्व घडामोडींमुळे ज्या होर्मुझ सामुद्रधुनीची चर्चा होत आहे, तो मार्ग जिथून जातो ती होर्मुझ बेटे निसर्गाच्या अनेक रंगांची किमया दाखवतात. येथील माती गडद लाल रंगाची आहे. होर्मुझ बेटांच्या समुद्रकिनाऱ्यांवरील मातीमध्ये उच्च प्रमाणात लोह ऑक्साईड असल्यामुळे संपूर्ण किनारा गडद लाल रंगाचा दिसतो. फक्त मातीच नव्हे तर संपूर्ण बेटावरील खडकांची रचना देखील अनोखी आहे. त्यामुळे निसर्गाचा हा चमत्कार पाहण्यासाठी अनेक पर्यटक या बेटांवर येतात. एरवी कुठेही दिसणार नाहीत असे मातीचे विविध रंग होर्मुझ बेटांवर पाहायला मिळतात. लाल, पिवळ्या आणि पांढऱ्या रंगांच्या छोट्या टेकड्या येथे आहेत. या टेकड्यांचे फोटो काढण्यासाठी अनेक छायाचित्रकार येथे येतात. त्यामुळेच होर्मुझ बेटांना “इंद्रधनुष्य बेट” असेही म्हटले जाते. होर्मुझ बेटांवर जेव्हा पाऊस पडतो तेव्हाचा नजारा पाहण्यासारखा असतो. पावसात रक्ताचे पाट वाहत आहेत असे दृश्य येथे दिसते. पावसात संपूर्ण किनारा लाल रंगाचा होऊन जातो. होर्मुझ बेटावरील माती फक्त लालच नाही, तर त्यात अनेक औषधी गुणधर्म असल्याचेही मानले जाते. ही माती येथील स्थानिकांसाठी सोन्याहून अधिक मोलाची आहे. या भागातील स्थानिक हीच माती वापरून एक विशिष्ट सॉस तयार करतात. केशरी-लाल, हळदी-पिवळा आणि शेवाळासारख्या रंगाची ही माती येथे “गेलाक” म्हणून ओळखली जाते.

=======

हे देखील वाचा : US-Iran-Israel : आखाती देशात पिण्याच्या पाण्यासाठी युद्ध

=======

अनेक वर्षांपासून या गेलाकपासून येथे मसाला तयार केला जातो. येथील स्थानिक कधीही पावडर स्वरूपात गेलाक खात नाहीत. त्याऐवजी ते या मातीचा मसाला म्हणून वापर करतात. येथील पारंपरिक पाककृतीमध्ये “सुरग” नावाचा माशांचा सॉस प्रसिद्ध आहे. “सुरग” हा गडद लाल, खनिजांनी समृद्ध माशांचा सॉस आहे. हा सॉस याच होर्मुझ बेटावरील मातीपासून बनवला जातो. आंबट आणि चवदार असलेला “सुरग” सॉस लाल रंगाचा असतो आणि त्याचा सुगंध तीव्र असतो. दक्षिण इराणी पाककृतीमध्ये “सुरग” सॉसचा महत्त्वाचा वापर केला जातो. होर्मुझ बेटावरील मातीमध्ये सूक्ष्मजीवरोधी आणि जंतुनाशक गुणधर्म असल्याचे मानले जाते. त्यामुळे या मातीचा वापर अन्नपदार्थांमध्ये केल्यास ते तीव्र उष्णतेमध्येही खराब होत नाहीत, असा येथील स्थानिकांचा अनुभव आहे. मात्र आता हीच होर्मुझ बेटावरील औषधी गुणधर्म असलेली लाल माती धोक्यात आली आहे. युद्धामुळे येथेही रसायनांचा पाऊस पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे या लाल मातीतील औषधी गुणधर्मांना बाधा होण्याची चिंता स्थानिकांना आहे. ( Iran’s Hormuz Island )

-सई बने

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!

📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🗳️ तुमची निवड करा
तुम्ही कोणत्या विषयावरील लेख जास्त वाचता?
📚 खालीलपैकी कोणत्या विषयावरील ब्लॉग तुम्हाला वारंवार वाचायला आवडतात?
💡 एक किंवा अधिक पर्याय निवडा:

Related Articles

Katrina Kaif
आंतरराष्ट्रीय

Jiang Xueqin : चीनच्या नॉस्ट्राडॅमसने सांगितले ट्रम्पचे भविष्य

अमेरिका-इराण युद्धामध्ये पंधरा दिवसांचा विराम आला आहे. यात चीनची भूमिका असल्याची माहिती...

Jewellery
आंतरराष्ट्रीय

Jared Kushner : ट्रम्पचा जावई आहे तरी कोण

अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धावर कायमचा विराम आणण्यासाठी पाकिस्तानची राजधानी...

Mobile
आंतरराष्ट्रीय

First Lady Melania Trump : अमेरिकेच्या फर्स्ट लेडीसाठी शाही सवारी

इराणमध्ये सत्तांतर करण्याच्या हेतूने अमेरिकेने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणविरुद्ध लष्करी मोहीम...

आंतरराष्ट्रीयगाजावाजा स्पेशल

US-Iran War : अमेरिका नमली की इराण घाबरलं ?

America, Israel आणि Iran यांचे युद्ध गेले ४० दिवस चालू आहे. रोजच्या...

⚙️ Font Size

100%
WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!