Home सामाजिक Syahi Devi Temple : या देवीपुढे स्वामी विवेकानंदही झाले होते नतमस्तक
सामाजिक

Syahi Devi Temple : या देवीपुढे स्वामी विवेकानंदही झाले होते नतमस्तक

0

निसर्गाचे अलौकिक रूप आणि चमत्कार यांचा संगम पाहायचा असेल तर उत्तराखंड राज्यातील स्याही देवीच्या मंदिराला नक्की भेट द्यायला हवी. १९ मार्चपासून चैत्र नवरात्र सुरू होत आहे. यानिमित्ताने भारतभरातील देवीच्या मंदिरांमध्ये सजावट सुरू झाली आहे. त्यात स्याही देवी मंदिराचाही समावेश आहे. अल्मोडा येथील स्याही देवीचे हे मंदिर अनोख्या शक्तीसाठी ओळखले जाते. येथील मातेच्या मूर्तीचा रंग दिवसातून तीन वेळा बदलतो. या मंदिराची निर्मिती करतानाही देवीने अनेक संकेत दिल्याचे स्थानिक सांगतात. मंदिर ज्या विटांच्या साहाय्याने बांधण्यात आले आहे, त्या विटा विशेष साहित्याने जोडल्या आहेत. स्याही देवीचा हा संपूर्ण परिसर एवढा अलौकिक आहे की येथे ध्यानधारणा करण्यासाठी अनेक साधू-संत येतात. स्वामी विवेकानंदही या स्याही देवीच्या चरणी नतमस्तक झाले होते. स्वामी विवेकानंद यांनी या मंदिर परिसरात काही काळ वास्तव्य करून ध्यानधारणा केली. ( Syahi Devi Temple )

चैत्र नवरात्र १९ मार्च रोजी सुरू होणार आहे. या उत्सवादरम्यान देवीच्या अनेक रूपांची पूजा केली जाते. उत्तराखंडच्या अल्मोडा जिल्ह्यातील स्याही देवीच्या मंदिरातही हा चैत्र नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. चमत्कारिक असलेल्या या स्याही मंदिराच्या अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. अल्मोडा जिल्ह्यातील शीतलखेत जवळील स्याही देवीचे हे प्राचीन आणि चमत्कारिक मंदिर आहे. या मंदिराला स्थानिक शाही देवी मंदिर म्हणूनही ओळखतात. या देवीच्या मूर्तीचा रंग दिवसातून तीन वेळा बदलतो. त्यामुळे देवीचा हा चमत्कार पाहण्यासाठी हजारो भाविक मंदिर परिसरात थांबतात आणि देवीच्या तीन रंगांतील मूर्ती पाहून जयघोष करतात. हे मंदिर कात्युरी काळात बांधले असून ९०० ते १७०० वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते. मंदिराच्या उभारणीबाबतही एक आख्यायिका आहे. या मंदिराच्या बांधकामापूर्वी स्याही देवीची मूळ मूर्ती सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या दुसऱ्या टेकडीवर स्थापित करण्यात आली होती. स्याही देवी ही अल्मोडा राजांची कुलदेवता आहे. म्हणून राजांनी या ठिकाणी त्यांच्या देवीसाठी एक नवीन आणि मोठे मंदिर बांधले. या मंदिराच्या बांधकामानंतर गुरु गोरखनाथांच्या वंशजांना नेपाळहून दैनंदिन विधी आणि प्रार्थना करण्यासाठी येथे आणले. आजही त्या पुजाऱ्यांच्या वंशातील लोक मंदिराचे व्यवस्थापन करतात. आख्यायिकेनुसार कात्युरी राजे महान वास्तुविशारद होते. ते कोणतीही वास्तू एका रात्रीत उभारत असत. तसेच त्यांनी हे मंदिरही एका रात्रीत उभे केले, असे सांगितले जाते. त्यावेळी गावकऱ्यांनी मंदिराच्या बांधकामासाठी विटा तयार केल्या. परंतु त्या रात्री मुसळधार पाऊस पडला आणि बांधकाम साहित्याचे नुकसान झाले. अशावेळी मंदिराच्या विटा जोडण्यासाठी गुळाच्या मिश्रणाचा आणि सफरचंदाच्या लाकडाचा वापर करण्यात आला. ( Syahi Devi Temple )

स्याही देवी ही सुमारे ५२ गावांची अधिष्ठात्री देवी मानली जाते. उत्तराखंडमधील अनेक कुटुंबे त्यांची कौटुंबिक देवता म्हणून तिची पूजा करतात. देशभरातील उत्तराखंडचे नागरिक चैत्र नवरात्रीनिमित्त हमखास देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी येथे येतात. या परिसरात नऊ देवी आहेत. स्याही देवी त्यातील सर्वात प्रमुख देवी आहे. तिच्याभोवती आठ इतर देवी आहेत. त्यामध्ये दूनगिरी देवी, मल्लिका देवी, कासार देवी, बनद देवी, देवीधुरा, हरतोला देवी, नैना देवी आणि झोला देवी यांचा समावेश आहे. या सर्व देवी जवळच्या वेगवेगळ्या टेकड्यांवर आहेत.

=======

हे देखील वाचा : Chaitra Navratri : देवी पार्वतीचा अवतार असलेल्या गोव्याच्या शांतादुर्गा देवीची महती

=======

स्थानिक आख्यायिकेनुसार या नऊ देवी सतत एकमेकांशी संवाद साधतात. त्यामुळेच या सर्व भागात एक वेगळे चैतन्य असल्याची जाणीव भाविकांना होते. स्वामी विवेकानंदांनी २५ ते २८ मे १८९८ या काळात या ठिकाणी भेट दिली होती. त्यांनी स्याही देवी मंदिरात ध्यान केले होते. त्यानंतरही स्वामी विवेकानंद या ठिकाणी पंधरा दिवस ध्यानधारणेसाठी आले होते. यामुळे हे मंदिर अनेक संत आणि ऋषींच्या तपश्चर्येचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध झाले. स्याही मंदिर संकुलाच्या वरच्या बाजूला असलेल्या एका मोठ्या पाइन वृक्षामुळे ब्रिटिशांनी या टेकडीला टायगर हिल असे नाव दिल्याची माहिती आहे. अल्मोडा येथून पाहिल्यास हे शिखर वाघाच्या चेहऱ्यासारखे दिसते. काही वर्षांपूर्वी हा संपूर्ण परिसर घनदाट जंगल आणि वन्यजीवांनी भरलेला होता. मात्र आता मंदिरापर्यंत जाण्यासाठी रस्ता आहे. या मंदिर परिसराला निसर्गाचा अनमोल खजिना लाभला आहे. अल्मोडा जवळील शीतलखेत हे हिमालयाच्या नेत्रदीपक दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. शिखरावरून नैनिताल टेकड्यांपासून एका बाजूला मुक्तेश्वरपर्यंत आणि केदारनाथपासून नंदा देवी पर्वतरांगांपर्यंत, तसेच पंचचुली शिखरांपर्यंतचे दृश्य पाहता येते. आता याच सुंदर मंदिरात चैत्र नवरात्रीनिमित्त धार्मिक कार्यक्रम सुरू झाले आहेत. ( Syahi Devi Temple )

सई बने…

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!

📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा

Related Articles

Health Care
सामाजिक

Chardham Yatra : चारधाम यात्रेची तयारी सुरू

उत्तराखंडची चारधाम यात्रा १९ एप्रिल रोजी सुरू होणार आहे. अक्षय तृतीयेचा मुहूर्त...

सामाजिक

Yamunotri Dham : यमुनोत्री धामची रहस्ये

उत्तराखंड राज्यातील चारधाम यात्रेचे हिंदू धर्मात मोठे महत्त्व आहे. यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ...

सामाजिक

Narmadeshwar Mahadev Temple : रंग बदलणारे शिवलिंग

उत्तर प्रदेशामध्ये भगवान शंकराची अनेक मंदिरे आहेत. या मंदिरांच्या स्थापनेमागे पौराणिक कथा...

सामाजिक

Chilkur Balaji Temple : अनोखे व्हिसा मंदिर

प्रभू श्रीरामांचे परमभक्त असलेल्या महाबली हनुमानांचा जन्मोत्सव २ एप्रिल रोजी साजरा होणार...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!