Home लाईफ स्टाईल Ramnavami : प्रभू रामचंद्रामधील ‘हे’ गुणच त्यांना बनवतात आदर्श पुरुष
लाईफ स्टाईल

Ramnavami : प्रभू रामचंद्रामधील ‘हे’ गुणच त्यांना बनवतात आदर्श पुरुष

1
Artificial Heart
Artificial Heart

कायमच जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अन्याय, अत्याचार वाढला, दृष्ट प्रवृत्तींनी सामान्य मनुष्याला त्रास देण्यास सुरुवात केली तेव्हा तेव्हा भगवंताने या पृथ्वीच्या आणि लोकांच्या रक्षणासाठी अवतार घेतला. भगवान राम देखील असेच देवाचा अवतार मानले जातात. भगवान विष्णू यांचा सातवा अवतार म्हणून प्रभू श्रीरामांची ओळख आहे. जेव्हा रावणाच्या पापांचा घडा भरला तेव्हा त्याच्या अंतासाठी विष्णूनी अवतार घेतला. हिंदू धर्मामध्ये श्रीरामांना अतिशय वरचे स्थान आहे. आदर्श पुरुष म्हणून प्रभू रामांची ओळख आहे. हिंदू धर्मात प्रभू श्रीरामाला विशेष महत्त्व आहे. प्रभू राम हे समस्त हिंदूंचे श्रद्धास्थान असून ते त्यांच्या गुणांमुळे विशेषतः पूजले जातात.

लवकरच आपण रामचंद्रांचा जन्मोत्सव अर्थात रामनवमीचा सण साजरा करणार आहोत. चैत्र शुक्ल नवमीच्या दिवशी भर दुपारी भगवान विष्णू यांनी अयोध्येतील राजा दशरथ आणि राणी कौसल्या यांच्या पोटी राम अवतारात जन्म घेतला. प्रभू रामांचे संपूर्ण जीवन मनुष्य वर्गासाठी प्रेरणादायी आणि आदर्श आहे. त्यांचे वर्णन एक वचनी, एक बाणी आणि एक पत्नी असे केले जाते. एक उत्तम पुरुष कसा असावा, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्रभू राम. रामांच्या अंगी असलेले गुण जर आपण आपल्या जीवनात अंगिकारले, तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होऊन तुमचे जीवन अधिकच सुकर आणि आनंदमय होईल. तर श्रीरामांच्या अंगी नक्की कोणते गुण होते चला जाणून घेऊया. (Ramnavami)

– प्रभू श्री राम हे सर्व मानवजातीत सर्वोत्तम आहे, ते प्रत्येकाची मर्यादा आणि प्रतिष्ठेचे रक्षक आहेत. प्रभू राम हे एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. त्यांचा प्रत्येक शब्द त्यांच्या कृतीतून प्रतिबिंबित होतो.

– प्रभू श्रीरामांनी प्रजेला आपले कुटुंब, पत्नी आणि मुलांपेक्षा महत्त्व दिले. ते नि:स्वार्थ भावनेने प्रजेचे रक्षण करत होते. ते धर्माचे अनुयायी होते.

– राजपुत्र असूनही श्रीरामाचे चरित्र मधुरतेने भरलेले आहे, या प्रकारच्या सामाजिक श्रेष्ठतेचा त्याच्यावर थोडाही परिणाम होत नाही. श्रीरामाच्या सान्निध्यात येणारा प्रत्येक माणूस त्याच्या व्यक्तिमत्त्वातील गोडव्याने प्रभावित होतो. (Todays Marathi Headline )

– प्रभू श्रीरामाचे प्रत्येक कार्य हे लोककल्याणासाठी होते. हा त्यांच्या जीवनाचा आदर्श होता. ते लोकांच्या विचारांचा आदर करायचे. श्री राम हे लोकाभिमुख राजा होते आणि जोपर्यंत त्यांचा हा आदर्श आपल्यात येत नाही तोपर्यंत आपण निष्पक्ष आणि विश्वासार्ह शासन व्यवस्था निर्माण करू शकत नाही.

Ramnavami

– प्रभू श्री राम हे प्रेम आणि करुणेचे सागर आहे. त्यांनी संतांना वाचवण्यासाठी रक्षसांचा वध केला. अहिल्योधर म्हणजेच ऋषी गौतमची पत्नी अहल्येचा उद्धार श्री रामाची करुणा आणि अत्याचार पिडितांविषयी प्रेम दर्शवते. करुणा ही एक मोठी शक्ती आहे, ज्याचा खरा अर्थ आपल्याला आत्मसाक्षात्कारानंतरच समजू शकतो. (Top Marathi Headline)

– जगप्रसिद्ध रघु कुळात जन्म घेऊनही श्रीरामांची स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजले नाही. ते अतिशय सभ्य आणि नम्र होते. शबरीचे बोर स्वीकारताणा त्यांची नम्रता दिसून येते.

– श्रीराम हे धर्मप्रिय होते. त्यांनी नेहमी धर्माचा मार्ग निवडला. हा त्यांचा सर्वात मोठा गुण होता. ते धर्माचे अनुयायी होते. त्यांनी अधर्माचा नाश करत धर्माची स्थापना केली. यामुळे त्याचे रामराज्य आदर्श ठरते.

– सहिष्णुता आणि संयम हा भगवान रामाचा एक विशेष गुण आहे. कैकेयीच्या आदेशानुसार, 14 वर्षे जंगलात घालवणे, समुद्रावर सेतु निर्माणासाठी तपस्या करणे, सीतेचा त्याग केल्यानंतर राजा असून संन्यासी प्रमाणे जीवन व्यतीत करणे हे त्यांच्या सहनशीलता आणि धैर्याचे गुण दर्शवते. (Top Trending News)

– प्रभू राम यांनी दया दाखवत सर्वांना आपल्या छत्रछायेत जागा दिली. त्यांच्या सेनते पशु़ मानव, दानव सर्व प्रकारे होते त्यांनी सर्वांना पुढे वाढण्याची संधी दिली. सुग्रीवला राज्य, हनुमान, जाम्बवंत व नल-नील यांना देखील त्यांना वेळोवेळी नेतृत्व करण्याचा हक्क दिला. मित्र केवट असो वा सुग्रीव, निषादराज असो वा विभीषण. प्रत्येक जाती, प्रयत्येक वर्गाच्या मित्रांसह प्रभू रामाने ‍हृद्याने नाते जपले. मित्रांसाठी स्वत:ने संकट ओढून घेतले.

– प्रभू श्रीरामांसमोर अनेकवेळा असे कठीण प्रसंग उद्भवले जेव्हा संपूर्ण संघात निराशेची भावना पसरली, परंतु समस्यांवर उपाय शोधण्यासाठी त्यांनी संयमाने काम केले आणि नंतर त्यावर काम सुरू केले. सीतेचे अपहरण, स्वतः अहिराणाचे अपहरण आणि लक्ष्मण मूर्च्छा येण्यापासून त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला परंतु त्यांच्या उत्साही संघाने सर्व अडचणींवर मात केली. संकट त्याच व्यक्तीसमोर उभे राहते ज्याला त्यांचे समाधान माहित असते. (Latest Marathi Headline)

– हे सर्वज्ञात आहे की आपल्या वडिलांच्या आदेशानुसार त्यांनी सिंहासन सोडण्याचा निर्णय घेतला होता. आश्रमात राहून त्यांनी गुरुज्ञान घेतले. जंगलात एका झोपडीत राहून त्यांनी कंद खाल्ली आणि यादरम्यान त्यांनी आदिवासी आणि वनवासी यांना धनुष्यबाण शिकवले आणि धर्मही शिकवला. शबरीची उष्टी बोरं प्रेमाने खाणे, केवट निषादराजला मिठी मारणे, माकड, अस्वल, अशा प्राण्यांना प्रेम व वात्सल्य देऊन त्यांना आपलेसे करणे आणि त्यांच्या जीवनात उत्साह संचारणे हे रामाकडून शिकले पाहिजे. आधुनिक युगाच्या माणसामध्ये त्यागाची भावना नाही. त्याग माणसाला श्रेष्ठ आणि लोकप्रिय बनवतो.

=========

Ramnavami : प्रभू श्रीरामांचा जन्मदिन अर्थात रामनवमी

=========

– आजकाल बहीण-भावामध्ये वाद होणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. मात्र प्रभू श्री रामासारखे भावा-बहिणींमध्ये परस्पर प्रेम असावे हे शिकण्यासारखे आहे. केवत, सुग्रीव, निषादराज आणि विभीषण हे प्रभू श्री रामचे मित्र होते. श्री रामाच्या मैत्रीतून काहीतरी शिकणे आवश्यक आहे. मैत्री टिकवण्यासाठी प्रभू रामाने स्वतः अनेक संकटांचा सामना केला. (Top stories)

– प्रभू श्रीराम हे त्यांच्या चारित्र्याचे परिपूर्ण सामर्थ्य, त्यांच्या प्रेमाची शक्ती आणि जीवनातील त्यांच्या कार्यांसाठी ओळखले जातात. शूर्पणखाकडे एक नजरही न पाहणारे श्रीराम सर्व लोभापासून आणि चुकीच्या विचारांपासून अलिप्त होते. आत्मविश्वास, सतत प्रयत्न आणि जिद्द यातून त्यांनी जे सांगितले ते साध्य केले.

– भगवान राम केवळ एक कुशल व्यवस्थापक नव्हते, तर सर्वांना सोबत घेऊन जाणार होते. ते प्रत्येकाला विकासाची संधी देत असून उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करत होते. त्यांच्या या गुणांमुळे लंका जाण्यासाठी त्यांनी व त्यांच्या सेनेने दगडांचा पूल तयार केला होता. (Social News)

(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

लाईफ स्टाईल

Gold : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याला एवढे महत्त्व का आहे?

आज अक्षय्य तृतीया. साडे तीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेचे ओळख...

Parshuram
लाईफ स्टाईल

Parshuram : भगवान परशुरामांबद्दलची रंजक तथ्ये

परशुराम यांना भगवान विष्णू यांचा सहावा अवतार समजले जाते. मान्यतेनुसार भगवान विष्णू...

लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला ‘ही’ कामे करून पुण्य कमवा

वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक...

लाईफ स्टाईल

Vallabhacharya : वल्लभाचार्य जयंती – कोण होते कृष्णभक्त वल्लभाचार्य?

आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची अकरावी तिथी अर्थात. आज चैत्र महिन्यातील एकादशीचा...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!