Home सामाजिक Jeen Mata Temple : मुघलांना हरवणारी जीन माता
सामाजिक

Jeen Mata Temple : मुघलांना हरवणारी जीन माता

0

चैत्र नवरात्रीचा उत्सव आता सुरू होत आहे. या उत्सवासाठी देवीच्या मंदिरामध्ये तयारी सुरू झाली आहे. राजस्थानमधील जीन माता मंदिरही या उत्सवासाठी सजवले जात आहे. राजस्थानमधील प्रमुख शक्ती उपासना स्थळांपैकी एक असलेले जीन माता मंदिर सीकर जिल्ह्यातील हर्ष पर्वतावर आहे. जीन माता मंदिर हे आध्यात्मिक शक्ती, चमत्कारिक घटना आणि ऐतिहासिक प्रसंगांचे जिवंत साक्षीदार आहे. जीन माता ही देवीच्या शक्तीस्थानांपैकी एक मानली जाते. मुघल सम्राट औरंगजेबाने हे मंदिर पाडण्याचा प्रयत्न केला, मात्र मातेनं औरंगजेबाच्या सैन्याला चांगलाच धडा शिकवला. मातेचा हा चमत्कार पाहिल्यावर औरंगजेबही मातेच्या चरणी लीन झाला आणि या मंदिराला चांदीची छत्री अर्पण केली. ( Jeen Mata Temple )

राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील जीन माता मंदिर भाविकांच्या श्रद्धेचे स्थान आहे. जीन मातेची पूजा येथे शक्तीच्या देवी म्हणून केली जाते. मुघल बादशहा औरंगजेबाने मातेपुढे हार मानल्याची कथा येथे अभिमानाने सांगितली जाते. औरंगजेबाने हिंदूंची अनेक मंदिरे नष्ट केली. त्याला जीन मातेच्या मंदिराची ख्याती समजल्यावर हे मंदिरही पाडण्याचे त्याने आदेश दिले. हर्ष पर्वतावर असलेल्या जीन माता मंदिराकडे त्याने आपल्या सैन्याला कूच करण्याचे आदेश दिले. पण हे सैन्य मंदिरात पोहोचल्यावर तिथे अचानक लाखो मधमाश्या आल्या. या मधमाश्यांनी मुघल सैन्यावर हल्ला केला. यामुळे औरंगजेबाचे सैन्य बेजार झाले आणि मातेचा चमत्कार समजून घाबरून पळू लागले. औरंगजेबही या हल्ल्यामुळे घाबरून मंदिरातून पळून गेला. या मधमाश्यांच्या हल्ल्यात औरंगजेबाच्या सैन्यातील अनेक सैनिक जखमी झाले. शिवाय काही दिवसांतच औरंगजेबाला त्वचारोग झाला. हा त्वचारोग कोणत्याही उपचाराने बरा झाला नाही. त्यामुळे औरंगजेबाला जीन माता मंदिर हे सामान्य मंदिर नसून दैवी शक्तींचे केंद्र असल्याची जाणीव झाली. त्याने दिल्ली दरबारातून दरवर्षी १.२५ मण तूप आणि तेल मंदिरासाठी पाठवण्याची परंपरा सुरू केली, तसेच देवीसाठी चांदीची छत्रीही अर्पण केली. आजही ही छत्री देवीच्या मूर्तीच्या वर आहे. शिवाय या घटनेनंतर जीन मातेचा कोप होईल या भीतीने औरंगजेबाने एका स्थानिक मुस्लिम कुटुंबाला जीन माता मंदिराच्या पायऱ्या धुण्याचे काम सोपवले. आज ‘सिक्का कुटुंब’ म्हणून ओळखले जाणारे हे कुटुंब जवळजवळ चारशे वर्षांपासून दररोज मंदिराच्या पायऱ्या स्वच्छ करत आहे.

या जीन मातेचे मंदिर जसे प्रसिद्ध आहे, तसेच जीन मातेचा भाऊ हर्ष भैरव यांचे प्राचीन मंदिरही हर्ष पर्वतावर आहे. हे हर्ष मंदिरही प्रसिद्ध असून येथेही चैत्र नवरात्रीमध्ये मेळा भरतो. १०४६ मध्ये चौहान राजवंशाचे राजा सिंह राज यांनी या मंदिराची उभारणी केली. या हर्ष मंदिरामागे एक कथा सांगितली जाते. जेव्हा जीन माता कठोर तपश्चर्या करत होती, तेव्हा तिला समजवण्यासाठी तिच्या हर्ष भावाने खूप प्रयत्न केले. आपल्या बहिणीला एवढ्या यातना होत आहेत हे पाहून हर्षही दुःखी झाला. त्यानंतर त्यानेही बहिणीसारखी तपश्चर्या करायला सुरुवात केली. काही वर्षे दोघेही तप करत बसले. त्यांच्या प्रेम आणि श्रद्धेने प्रसन्न होऊन देवतांनी त्यांना आशीर्वाद दिला. त्यानंतर जीन मातेचे रूपांतर देवी दुर्गेच्या रूपात झाले. तर जीन मातेचा भाऊ हर्ष याची भगवान शंकराच्या उग्र रूपातील भैरव म्हणून पूजा होऊ लागली. आपल्या भावाची आराधना पाहून जीन मातेच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू काजळात रूपांतरित झाले आणि जिथे आज हर्ष मंदिर आहे ते स्थान ‘काजल शिखर’ म्हणून ओळखले जाऊ लागले. हर्ष भैरव मंदिर हे तपश्चर्या आणि श्रद्धेचे प्रतीक मानले जाते. ( Jeen Mata Temple )

=======

हे देखील वाचा : Chaitra Navratra : रजस्वला होणाऱ्या कामाख्या देवीची आख्ययिका

=======

नवरात्रीमध्ये या दोन्ही मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होते. चैत्र नवरात्रीत येथे तंत्र साधना करणारे अनुयायी मोठ्या संख्येने येतात. मातेला यावेळी चुनरी आणि दिवे अर्पण केले जातात. आसाममधील कामाख्या देवीला जे महत्त्व आहे, तेच महत्त्व राजस्थानात जीन मातेला असल्याचे साधक सांगतात. नवरात्रीत या मंदिरात नवविवाहित जोडप्यांची मोठी गर्दी होते. मातेचा आशीर्वाद मिळाल्यावर संसारातील सर्व अडचणी दूर होतात, अशी त्यांची श्रद्धा आहे. आता मंदिरात याच नवरात्री सोहळ्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. ( Jeen Mata Temple )

– सई बने

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

Health Care
सामाजिक

Chardham Yatra : चारधाम यात्रेची तयारी सुरू

उत्तराखंडची चारधाम यात्रा १९ एप्रिल रोजी सुरू होणार आहे. अक्षय तृतीयेचा मुहूर्त...

सामाजिक

Yamunotri Dham : यमुनोत्री धामची रहस्ये

उत्तराखंड राज्यातील चारधाम यात्रेचे हिंदू धर्मात मोठे महत्त्व आहे. यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ...

सामाजिक

Narmadeshwar Mahadev Temple : रंग बदलणारे शिवलिंग

उत्तर प्रदेशामध्ये भगवान शंकराची अनेक मंदिरे आहेत. या मंदिरांच्या स्थापनेमागे पौराणिक कथा...

सामाजिक

Chilkur Balaji Temple : अनोखे व्हिसा मंदिर

प्रभू श्रीरामांचे परमभक्त असलेल्या महाबली हनुमानांचा जन्मोत्सव २ एप्रिल रोजी साजरा होणार...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!