Home आंतरराष्ट्रीय Iran Bunkers : इराणच्या बंकरचे जाळेच ठरले आहे अमेरिकेसाठी जंजाळ
आंतरराष्ट्रीय

Iran Bunkers : इराणच्या बंकरचे जाळेच ठरले आहे अमेरिकेसाठी जंजाळ

70

२८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा इस्रायलने केलेल्या बॉम्बहल्ल्यात मृत्यू झाला. तेव्हापासून अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध सुरू झाले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध सुरू झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत इराणची मोठी हानी केल्याची घोषणा केली. इराणचे नौदल नष्ट केल्याचाही दावा अमेरिकेतर्फे करण्यात आला. पण इराणने आपण हार मानली नसल्याचे सांगत अमेरिकेला या युद्धाचा भयानक परिणाम भोगावा लागेल, अशी खुली धमकी दिली. त्यानंतर इराणने मध्यपूर्वेत अमेरिकेचे लष्करी तळ असलेल्या देशांवरही हल्ले सुरू करण्यास सुरुवात केली. आत्ताही इराणमधून तेवढ्याच तीव्रतेने हल्ले सुरू असून ट्रम्प प्रशासनाची कोंडी करण्यात त्यांना यश आल्याचे दिसत आहे. इराण आपल्या स्वस्त ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी अमेरिकेची महागडी पॅट्रियट इंटरसेप्टर प्रणाली संपवत असून त्यामुळे अमेरिकन संरक्षण यंत्रणेवर दबाव वाढला आहे. दुसरीकडे इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीला रोखल्यामुळे अवघ्या जगात तेलाची कमतरता निर्माण झाली आहे. ही कोंडी फोडण्यासाठी अमेरिका आणि इस्रायलतर्फे प्रयत्न सुरू असले तरी त्यांना अपेक्षित असे यश मिळत नाही. त्याला कारण ठरले आहेत ते इराणमधील सुसज्ज बंकर. इराणमध्ये इमारतींच्या खाली पाच मजले खोल असे बंकर असल्याची माहिती आहे. या बंकरमध्ये सर्व सुविधा असून इराणची अत्याधुनिक शस्त्रास्त्रेही सुरक्षित ठेवल्याची माहिती आहे. त्यामुळेच अमेरिका अनेक प्रयत्न करूनही अद्याप इराणला नमवू शकलेली नाही.

अमेरिका-इराण युद्धामध्ये पारडे कुणाच्या बाजूला आहे हे सांगणे कठीण झाले आहे. सुरुवातीला अमेरिकेला व्हेनेझुएलाप्रमाणे इराणलाही नमवता येईल असा विश्वास वाटत होता. मात्र इराणने अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर फिनिक्ससारखी झेप घेतल्याचे चित्र आहे. या सर्वाला कारण ठरले आहेत इराणमधील बंकर. याच बंकरचा आधार घेत आता खामेनींचे वारस असलेले त्यांचे पुत्र मोजतबा खामेनी अमेरिकेला नमवत असल्याची माहिती आहे. इराणमध्ये बंकर किती सुसज्ज पद्धतीने बांधलेले आहेत याचा एक व्हिडिओ नुकताच इस्रायलतर्फे दाखवण्यात आला आहे. हा बंकर १६४ फूट जमिनीत बांधलेला आहे. बंकर म्हणजे केवळ मातीचा ठिगारा उपसलेला नसून, या बंकरला लागून अन्य पाच बोगदेही तयार करण्यात आले आहेत. यामध्ये उतरण्यासाठी अत्याधुनिक लिफ्ट असून त्यामध्ये काही महिने राहण्यासाठी औषधांसह सर्व आवश्यक सामग्रीचा समावेश आहे. इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर इस्रायलने हा व्हिडिओ सार्वजनिक केला आहे. इराणची राजधानी असलेल्या तेहरानमध्ये हा भूमिगत गुप्त किल्ला आहे.

मुख्य म्हणजे या भूमिगत बंकरमध्ये जाण्याचा मार्ग शाळा, मशिद आणि हॉस्पिटलमधून आहे. असेच भूमिगत बंकर गाझामध्ये इस्रायलच्या सैन्याला आढळून आले आहेत. जिथे कोणालाही संशय येणार नाही अशा इमारतींच्या खाली हे बंकर तयार करण्यात येतात. इराणमध्येही असेच भूमिगत बंकर आहेत. हे बंकर किमान ५ किलोमीटर लांबीचे आहेत. इस्रायली सैन्याने या बंकरचे आतापर्यंत आठ अन्य उपबंकर शोधले असून त्याला आणखी मार्ग असल्याचा संशय व्यक्त केला आहे. सध्या जो बंकर सापडला आहे तो म्हणजे भूमिगत बंकरचे सुसज्ज जाळे आहे. हे बंकरचे जाळे तेहरानच्या मध्यवर्ती भागातील पाश्चर जिल्ह्यापर्यंत पसरलेले आहे. हा सर्व परिसर इराणच्या सत्तेचे प्रमुख केंद्र मानला जातो. येथेच राष्ट्रपती कार्यालय आणि अनेक सरकारी संस्था आहेत. शिवाय इराणमधील प्रमुख राजकीय नेत्यांची निवासस्थानेही येथे आहेत. या सर्वांचा वापर या बंकरमार्फत केला जात असल्याचे आता उघड झाले आहे. तेहरान शहराच्या खाली असलेले हे बंकर बांधण्यासाठी अंदाजे १५० ते १८० दशलक्ष डॉलर्स खर्च केल्याची माहिती आहे. शिवाय या बंकरमध्ये आधुनिक शस्त्रास्त्रेही असून त्यांची किंमत अब्जोमध्ये असल्याचे सांगितले जाते.

=======

हे देखील वाचा : United States-North Korea : युद्धात फक्त याचीच कमी होती….

=======

या सर्व बंकरमध्ये जाण्याचा एक मार्ग शाहिद शौरीदेह मेडिकल सेंटरच्या खाली आहे. हे आरोग्यकेंद्र अनेक वर्षांपासून इराणमध्ये आरोग्य सेवा देत आहे. त्याच्या बांधकामावेळीच बंकरचेही काम झाले असावे असा अंदाज इस्रायलच्या सैनिकांनी व्यक्त केला आहे. वर आरोग्यकेंद्राची इमारत उभी राहत असताना त्याचवेळी त्याखाली बंकरचे काम करण्यात आल्याने त्याबद्दल कुणालाही संशय आला नाही. या बंकरचा एक दरवाजा हजरत गर्ल्स एलिमेंटरी स्कूलच्या अगदी शेजारी असून अन्य एक दरवाजा तोहिद मशिदीच्या खाली आहे. येथूनच लष्करी संस्थांशी संबंधित अनेक इमारती आहेत. शिवाय तेहरानमधील प्रसिद्ध फुटबॉल केंद्राच्या कार्यालयाखालीही बंकरचा दरवाजा आढळून आला आहे. याच भूमिगत जाळ्यामध्ये आता आयआरजीसीचे प्रमुख अधिकारी लपून असून ते अमेरिका आणि मध्यपूर्वेतील देशांवर हल्ले करत आहेत. या भक्कम बंकरच्या जाळ्यामुळे अमेरिकेला हे युद्ध जड जाणार असल्याचे स्पष्ट आहे.

सई बने…

 

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

Katrina Kaif
आंतरराष्ट्रीय

Jiang Xueqin : चीनच्या नॉस्ट्राडॅमसने सांगितले ट्रम्पचे भविष्य

अमेरिका-इराण युद्धामध्ये पंधरा दिवसांचा विराम आला आहे. यात चीनची भूमिका असल्याची माहिती...

Jewellery
आंतरराष्ट्रीय

Jared Kushner : ट्रम्पचा जावई आहे तरी कोण

अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धावर कायमचा विराम आणण्यासाठी पाकिस्तानची राजधानी...

Mobile
आंतरराष्ट्रीय

First Lady Melania Trump : अमेरिकेच्या फर्स्ट लेडीसाठी शाही सवारी

इराणमध्ये सत्तांतर करण्याच्या हेतूने अमेरिकेने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणविरुद्ध लष्करी मोहीम...

आंतरराष्ट्रीयगाजावाजा स्पेशल

US-Iran War : अमेरिका नमली की इराण घाबरलं ?

America, Israel आणि Iran यांचे युद्ध गेले ४० दिवस चालू आहे. रोजच्या...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!