Home आंतरराष्ट्रीय Crude Oil : जगातील ‘या’ देशामध्ये कच्च्या तेलशिवायच केली जातात संपूर्ण कामं
आंतरराष्ट्रीय

Crude Oil : जगातील ‘या’ देशामध्ये कच्च्या तेलशिवायच केली जातात संपूर्ण कामं

73
Salman Khan Threat Mail
Salman Khan Threat Mail

अमेरिका-इराण यांच्यातील संघर्षामुळे संपूर्ण जग चिंतेत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या ऊर्जा केंद्रांवर हल्ले रोखल्याची घोषणा केली आहे. तसेच युद्ध थांबवण्यासाठी दोन्ही बाजूंनी चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे, मात्र तरीही दोन्ही बाजूंनी जोरदार हल्ला सुरूच आहेत. या युद्धामुळे जगासमोर ऊर्जा संकट उभे राहिले आहे. हे कमी करण्यासाठी इराणवरील काही तात्पुरते निर्बंध हटवण्यात आले आहेत. मात्र एव्हाना संपूर्ण जगातील लोकांच्या पुन्हा एकदा लक्षात आले असेल की , कच्चे तेल किती महत्त्वाचे आहे. प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था याच कच्च्या तेलावर अवलंबून आहे. असे असले तरी एक देश असा आहे, ज्याला अजिबातच कच्च्या तेलाची आवश्यकता नाही. सध्या अमेरिका आणि इराण यांच्यात सुरु असलेल्या युद्धामुळे अनेक देशांमध्ये तेलाचा तुटवडा निर्माण झाला असून, या तेलासाठी अनेक देश जंग जंग पछाडत आहे. अशा परिस्थितीत एक देश मात्र निवांत असून, त्या देशावर या युद्धाचा आणि कच्चे तेल मिळत नसल्याचा कोणताही परिणाम होत नाहीये. (Crude Oil)

मात्र जगातील आइसलँड हा देश या इंधन टंचाईपासून कोसो लांब आहे. देशातील अखेरचा पेट्रोल पंप पण देखील आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. या देशाला ऊर्जेसाठी नवीन स्त्रोत उपलब्ध झाल्याने आता खनिज तेलावर हा देश अवलंबून नाही. हा जगातील एकमेव ऊर्जा स्वतंत्र देश मानल्या जातो. आइसलँडची भौगोलिक रचना अशी आहे की भूगर्भातील उष्णताच या देशाची उर्जेची गरज भागवते. या देशात जमिनीतूनचे मोठ्या प्रमाणात गरम पाणी आणि ऊर्जा उपलब्ध होता. या देशात असंख्य हिमनद्या आणि नद्या वीज पुरवतात. (Todays Marathi Headline)

मुख्य म्हणजे हा देश पेट्रोल देखील वापरत नाही. या देशात हळूहळू पेट्रोलचा वापर कमी करत आहे. आइसलँडमध्ये असलेल्या एकमेव पेट्रोल पंप देखील आता बंद होणार आहे. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, हा देश कच्च्या तेलाशिवाय कशी काय अर्थव्यवस्था चालते? आइसलँडमध्ये पेट्रोलवरील गाड्यांपेक्षा इलेक्ट्रिक गाडयांना अधिक प्राधान्य दिले जात आहे. म्हणूनच येथे पेट्रोल पंप बंद करून चार्जिंग स्टेशन्स बसवले जात आहे. आयसलँड या देशाला निसर्गाचे वरदान आहे. हा देश आपल्या ऊर्जेच्या गरजेपैकी जवळपास 85% ते 90% गरज विना जीवाश्म इंधन स्त्रोतातून पूर्ण करतो. म्हणजे या देशाला कच्चा तेलाची गरज नाही. इथे मुबलक भूऔष्णिक आणि जलविद्युत संसाधने आहेत. येथील ऊर्जा मॉडेल जगासाठी एक मोठे उदाहरण आहे. (Marathi)

Crude Oil

जगातील काही मोजक्या देशांपैकी हा एक आहे जो तेलाशिवाय आपल्या बहुतेक ऊर्जेच्या गरजा सहजपणे पूर्ण करू शकतो. याचा अर्थ असा नाही की ते तेल अजिबात वापरत नाही, परंतु हे खरे आहे की त्याची ऊर्जा व्यवस्था हरित ऊर्जेवर अवलंबून असल्याने इथे कच्च्या तेलाची जास्त गरज नाही. आइसलँड पृथ्वीच्या अशा प्रदेशात वसलेले आहे जिथे तीव्र उष्णता आणि ज्वालामुखी सक्रिय आहेत. यामुळेच येथे भूगर्भातून बाहेर पडणारी वाफ आणि गरम पाण्यापासून वीज निर्माण केली जाते. भूगर्भातून निघणाऱ्या उर्जेचा वापर स्वयंपाकासाठी केला जातो. आइसलँडमध्ये असंख्य हिमनदी नद्या आहेत, ज्या मोठ्या प्रमाणात जलविद्युत निर्माण करतात. (Top Marathi News)

या घटकांमुळे, त्याची वीज जवळजवळ 100 टक्के ग्रीन एनर्जी मानली जाते. भूगर्भातील गरम पाणी थेट पाईपद्वारे घरांमध्ये पोहचवले जाते भूगर्भातील गरम पाणी थेट घरांमध्ये पाईपद्वारे पोहोचवले जाते. त्यामुळे पाणी गरम करण्यासाठी जवळजवळ कोणतेही इंधन वापरले जात नाही. आइसलँडचा वीज स्रोत 70 टक्के जलविद्युत आणि 30 टक्के भूऔष्णिक आहे. आइसलँडला वीज निर्मितीसाठी कोळसा किंवा तेलाची आवश्यकता नाही. आइसलँडला हरित ऊर्जेचे मॉडेल मानले जाते. (Latest Marathi Headline)

========

Iran Bunkers : इराणच्या बंकरचे जाळेच ठरले आहे अमेरिकेसाठी जंजाळ

========

आयसलँड उर्वरीत ऊर्जा म्हणजे 20% ते 25% ऊर्जा हायड्रोपॉवरद्वारे तयार करतो. तर हिमनद्यांमधून उगम पावणाऱ्या नद्या आणि धबधबे यांच्या माध्यमातून वीज तयार करण्यात येते. हा येथील अक्षय ऊर्जेचा एक मोठा पर्याय आहे. या देशात वीज अत्यंत स्वस्त आहे. वीज निर्मितीचा खर्च कमी असल्याने हे शक्य झाले आहे. त्यामुळे या देशात ऊर्जेसाठी इतर स्त्रोतावर अवलंबून राहण्याची गरज नाही. केवळ हाच देश नाही तर नॉर्वे, स्वीडन, पॅराग्वे आणि कोस्टारिका या सारखे देश सुद्धा अक्षय ऊर्जेवर अवलंबून आहेत. ते नैसर्गिक स्त्रोतापासून ऊर्जा तयार करत आहेत. त्यामुळे येथे प्रदूषणाचा टक्का पण घसरला आहे. (Top Stories)

आइसलँडची लोकसंख्या जेमतेम 3,80,000 आहे. त्यांच्याकडे अमर्यादित आणि स्वस्त भूऔष्णिक ऊर्जा असल्याने, ते बाहेर कितीही थंडी असली तरीही वर्षभर मोठ्या ग्रीनहाऊसमध्ये भाज्या आणि फळे पिकवू शकतात. खते आणि ट्रॅक्टरसाठी केवळ तेलावर अवलंबून असलेल्या देशांमध्ये तेलाच्या कमतरतेचा त्यांच्या शेतीवर तितका परिणाम होणार नाही. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!

📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा

Related Articles

Katrina Kaif
आंतरराष्ट्रीय

Jiang Xueqin : चीनच्या नॉस्ट्राडॅमसने सांगितले ट्रम्पचे भविष्य

अमेरिका-इराण युद्धामध्ये पंधरा दिवसांचा विराम आला आहे. यात चीनची भूमिका असल्याची माहिती...

Jewellery
आंतरराष्ट्रीय

Jared Kushner : ट्रम्पचा जावई आहे तरी कोण

अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धावर कायमचा विराम आणण्यासाठी पाकिस्तानची राजधानी...

Mobile
आंतरराष्ट्रीय

First Lady Melania Trump : अमेरिकेच्या फर्स्ट लेडीसाठी शाही सवारी

इराणमध्ये सत्तांतर करण्याच्या हेतूने अमेरिकेने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणविरुद्ध लष्करी मोहीम...

आंतरराष्ट्रीयगाजावाजा स्पेशल

US-Iran War : अमेरिका नमली की इराण घाबरलं ?

America, Israel आणि Iran यांचे युद्ध गेले ४० दिवस चालू आहे. रोजच्या...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!