Home लाईफ स्टाईल Ramnavami : प्रभू श्रीरामांचा जन्मदिन अर्थात रामनवमी
लाईफ स्टाईल

Ramnavami : प्रभू श्रीरामांचा जन्मदिन अर्थात रामनवमी

1
Instagram Tips & Tricks
Instagram Tips & Tricks

चैत्र महिन्यातील पाडव्यानंतरचा दुसरा मोठा सण म्हणजे रामनवमी. आदर्श पुरुष अशी ओळख असलेल्या प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव म्हणजे रामनवमी. आपल्या हिंदू लोकांचे आराध्य दैवत म्हणून श्रीराम यांना ओळखले जाते. प्रभू रामचंद्र म्हणजे भगवान विष्णूचे सातवे अवतार, ज्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणूनही ओळखले जाते. त्रेतायुगात धर्माच्या स्थापनेसाठी रामाचा जन्म झाला होता. याच दिवशी सूर्य, बुध, गुरु, शुक्र आणि शनी ग्रहांचा एक अत्यंत विशेष योग निर्माण झाला होता. हे सर्व ग्रह त्यावेळी आपापल्या उच्च राशीत विराजमान होते. (Ram Navami)

‘एक पत्नी, एक बाणी आणि एक वचनी’ हे आदर्श पुरुषांमधील तीन महत्वाचे गुण श्रीराम यांच्यामध्ये होते. श्रीराम हे प्रत्येक मनुष्यासाठी आदर्श आहे. अशा या श्रीरामांचा जन्मोत्सव अर्थात रामनवमीचा सण आता अगदीच जवळ आला आहे. रामनवमी हा हिंदू धर्माचा एक महत्त्वाचा सण आहे, जो भारतासह परदेशातही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्याचनिमित्ताने आपण जाणून घेऊया रामनवमी बद्दल अधिकची माहिती. (Marathi)

श्रीहरी विष्णू यांचे अवतार असलेल्या भगवान श्रीरामांचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला अयोध्येत झाला होता. त्यामुळे दरवर्षी या दिवशी रामनवमीचा सण साजरा केला जातो. या दिवशी अनेक भाविक उपवास करतात. ठिकठिकाणी या दिवशी रामायणाचे पठण केले जाते, गीत रामायणाचे कार्यक्रम केले जातात, भजन कीर्तन करून भगवान श्रीरामाची उपासना करतात. राम मंदिरांमध्ये तर श्रीरामांचा जन्मोत्सव करतात. दुपारी जेव्हा श्रीरामांचा जन्म झाला होता त्याच वेळेला श्रीरामाच्या मूर्तीला पाळण्यात घातले जाते. श्रीरामाचा पाळणा देखील गायला जातो. यादिवशी राम मंदिरं भाविकांनी भरलेली असतात. (Todays Marathi Headline)

Ramnavami

चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून नवमीपर्यंत काळ हा ‘रामनवरात्र’ म्हणून ओळखला जातो. या काळाता रामायणाचे पारायण करणे, रामाच्या चरित्राचे, तसेच इतर काही धार्मिक ग्रंथाचे वाचन करे असे विधी ठिकठिकाणी आचरले जातात. यंदा राम नवमीची तिथी 26 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजून 46 मिनिटांनी सुरु होणार असून, राम नवमी तिथीची समाप्ती 27 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजून 7 मिनिटांनी होणार आहे. रामायणानुसार भगवान रामाचा जन्म मध्यान्ह काळात झाला. त्यामुळे 26 मार्च 2026 रोजी राम नवमी साजरी होणार आहे. या व्यतिरिक्त उदय तिथीच्या आधारे 27 मार्च 2026 रोजी राम नवमी साजरी केली जाणार आहे. (Marathi News)

राम नवमी 26 मार्च 2026 रोजी साजरी करणं शुभ मानलं जाणार आहे. याचं कारण म्हणजे, या दिवशी दुपारी नवमी तिथी असणार आहे. या दिवशी राम नवमीचा मध्यान्ह मुहूर्त 11.13 पासून ते 1.41 पर्यंत असणार आहे. तर, मध्यान्हचा काळ दुपारी 12.25 असणार आहे. यंदा राम नवमी 2026, 26 आणि 27 मार्च या दोन्ही दिवशी साजरी केली जाईल. याचे कारण असे आहे की, काही लोक उदय तिथीनुसार पूजा आणि व्रत करतात. 27 मार्चच्या सकाळी सूर्योदयावेळी नवमी तिथी असेल, त्यामुळे अनेक भाविक या दिवशीही उपवास करू शकतात. मात्र, शास्त्रानुसार श्रीरामाच्या जन्माचे महत्त्व मध्यान्ह काळाशी जोडलेलं असल्यामुळे 26 मार्च हाच दिवस मुख्य मानला जाईल. (Top Marathi News)

अयॊध्येतील वैश्य समाज रामाचा जन्म झाला असे मानतात. त्रेतायुगात अयोध्येत चैत्र शुक्ल नवमीच्या दिवशी राजा दशरथाच्या घरी माता कौशल्याच्या पोटी भगवान विष्णू यांचा सातवा अवतार असलेल्या श्रीरामांचा जन्म झाला. तेव्हापासून हा दिवस रामनवमी अर्थात भगवान श्रीरामाचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. श्रीराम यांचा जन्म मोठ्या कारणासाठी या पृथ्वीवर झाला होता. भवन विष्णूनी त्यांच्या राम अवतारामध्ये रावणासारख्या शक्तिशाली राक्षसाचा वध केला आणि पुन्हा मनुष्याचे रक्षण केले. (Latest Marathi Headline)

========

Chaitra Navratra : माहूरच्या रेणुका देवीचा इतिहास

========

रामनवमीच्या दिवशी रामाचा जन्मोत्सव रामाच्या मंदिरासोबतच इतरही अनेक मंदिरांमध्ये आणि घरांमध्ये देखील साजरा केला जातो. या दिवशी दुपारी १२ च्या सुमारास श्रीराम यांचा जन्म झाला असल्याने १२ ला रामाला पाळण्यात घातले जाते, त्याला झुलवले जाते. पाळणा गायला जातो. शिवाय मंदिरात, मठांत यज्ञ, हवन, महाप्रसाद यांचे आयोजन केले जाते. श्रीरामांसोबतच माता सीतेची देखील यादिवशी पूजा केली जाते सीता मातेला लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. त्यामुळे भगवान श्रीरामाच्या जोडीने, माता सीतेची पूजा केल्याने आई लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि तुमच्या घरी धनवृद्धी होते. (Social News)

(टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. आम्ही त्याची हमी देत नाही.)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!

📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा

Related Articles

Akshaya Tritiya
लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला मीठ का खरेदी केली जाते?

आता लवकरच अक्षय्य तृतीयेचा सण येत आहे. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला...

लाईफ स्टाईल

Gold : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याला एवढे महत्त्व का आहे?

आज अक्षय्य तृतीया. साडे तीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेचे ओळख...

Parshuram
लाईफ स्टाईल

Parshuram : भगवान परशुरामांबद्दलची रंजक तथ्ये

परशुराम यांना भगवान विष्णू यांचा सहावा अवतार समजले जाते. मान्यतेनुसार भगवान विष्णू...

लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला ‘ही’ कामे करून पुण्य कमवा

वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!