अमेरिका-इराण युद्धामुळे IRGC काय आहे, याची जगाला कल्पना आली. इराणचे इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स हे एक अत्यंत प्राणघातक आणि लष्करी दल आहे. इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या संरक्षणाची जबाबदारी याच IRGC वर होती. या लष्करी गटामध्ये जमीन, हवाई आणि नौदल दल यांचाही समावेश आहे. शिवाय परदेशातील गुप्तचर विभागही IRGC च्या अंतर्गत काम करत आहे. सध्या अमेरिकेला बेजार करण्यामागे याच IRGC ची कार्यप्रणाली आहे. शिवाय लेबनॉनमधील हिजबुल्लाह, येमेनमधील हुथी आणि इराक, सीरियामधील विविध गटांना प्रशिक्षित करण्यामध्येही याच IRGC चा पुढाकार आहे. आता हे सर्व मिळून अमेरिका आणि इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा करत आहेत. IRGC एवढ्यावरच थांबत नाही, तर इराणच्या अर्थव्यवस्थेचा मोठा भाग त्यांच्या नियंत्रणाखाली आहे. या IRGC मुळे अमेरिकेच्या नाकात दम आला असतानाच आता त्यापेक्षाही घातक असलेल्या NOPO या गटाचे नाव पुढे आले आहे. अयातुल्ला अली खामेनी यांच्या सुरक्षिततेची सर्व जबाबदारी जशी IRGC वर होती, तशीच इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्याच्या म्हणजेच मोजतबा खामेनी यांच्या सुरक्षेची जबाबदारी NOPO वर आहे. ही NOPO संघटना इराणमधील सर्वात घातक सेना म्हणून ओळखली जाते. आता याच घातक सेनेच्या हाती इराणच्या पुढच्या लढ्याची सूत्रे आली आहेत, त्यामुळे अमेरिका आणि इस्रायलची डोकेदुखी अधिक वाढणार आहे. ( Iran’s NOPO Special Forces )

आत्तापर्यंत इराणमधील IRGC या घातक सैन्य तुकडीची माहिती समोर आली होती. मात्र त्यापेक्षाही घातक सैन्यदल इराणकडे आहे. त्याचे नाव NOPO आहे. NOPO ही इराणचे नवीन सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले स्वतंत्र सैन्यदल आहे. आत्तापर्यंत NOPO तर्फे आंदोलने नियंत्रित करण्यात आली आहेत. शिवाय तुरुंगांमध्ये आणि नेत्याची वैयक्तिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी NOPO कार्यरत होती. या सैन्यदलाला आधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज करण्याचे काम मोजतबा खामेनी यांनी केले आहे. त्यामुळे याच NOPO वर आता त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली आहे.
NOPO ला इराणी नागरिक काळ्या कपड्यांचे दहशतवादविरोधी दल म्हणून ओळखतात. NOPO चा इराणी भाषेत अर्थ, सर्वोच्च नेत्याच्या संरक्षणासाठी विशेष दल असा होतो. या दलाकडे सहा ब्रिगेड आहेत. त्यापैकी चार तेहरानमध्ये, एक मशहादमध्ये आणि एक इस्फहानमध्ये तैनात आहेत. काही महिन्यांपूर्वी इराणमध्ये जी निदर्शने होत होती, त्यातील सहभागींना अटक करून तुरुंगात डांबण्याचे काम NOPO तर्फे करण्यात आले आहे. गरज पडल्यास IRGC ला पर्याय म्हणून NOPO ची स्थापना १९९१ मध्ये झाली. सुरुवातीला या सेनेकडे मर्यादित अधिकार होते. ओलिसांची सुटका करणे एवढेच या सैनिकांचे काम होते. मात्र नंतर इराणमधील अत्यंत धोकादायक सेना म्हणून NOPO चे नाव घेतले जाऊ लागले. NOPO चे सैनिक IRGC पेक्षा खूपच जास्त प्राणघातक आणि निर्दयी आहेत. अनेक वेळा या सैनिकांवर नागरिकांवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला. मात्र NOPO ला सुरुवातीपासून मोजतबा खामेनी यांचा पूर्ण पाठिंबा होता, त्यामुळे त्यांच्यावर कधीही कारवाई झाली नाही. ८ मार्च २०२६ रोजी मोजतबा खामेनी यांची नवीन सर्वोच्च नेते म्हणून निवड झाली. तेव्हापासून त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी याच घातक NOPO कडे देण्यात आली. त्यामागे प्रमुख कारण म्हणजे, NOPO च्या सैन्याने अनेक वेळा अमेरिकेच्या सैन्याचा प्रतिकार केला आहे. ( Iran’s NOPO Special Forces )
=======
हे देखील वाचा : United States-North Korea : युद्धात फक्त याचीच कमी होती….
=======
NOPO सैन्यदल हे IRGC पेक्षा खूपच जास्त प्राणघातक, क्रूर आणि प्रशिक्षित आहे. या युनिटकडे आधुनिक शस्त्रे आणि उत्कृष्ट कमांडो आहेत. इराणी पोलिस कमांडर असेही मानतात की NOPO ही इराणच्या पोलिसिंग व्यवस्थेतील सर्वात शक्तिशाली आणि धोकादायक युनिट आहे. NOPO चे सैनिक केवळ शस्त्रांमध्ये पारंगत नाहीत, तर मानसिकदृष्ट्याही ते मजबूत मानले जातात. NOPO मध्ये सामील होण्यासाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या अनेक चाचण्या घेतल्या जातात. उमेदवारांची उंची, उत्कृष्ट तंदुरुस्ती आणि उच्च बुद्ध्यांकाची चाचणी होते. नंतर अनुभवी अधिकाऱ्यांकडून कठोर मुलाखत प्रक्रिया पार पडल्यानंतर या NOPO सैन्यदलात भरती होता येते. हे सैनिक मार्शल आर्ट्स आणि स्वसंरक्षण तंत्रांमध्ये तज्ञ असतात. शिवाय पॅराशूटिंग, फ्री-फॉल आणि पॅराग्लायडिंगमध्ये देखील तरबेज असतात. त्यांना पाण्याखाली डायव्हिंग आणि नेव्हिगेशनमध्ये देखील प्रशिक्षण दिले जाते. इराणमधील जनतेची आंदोलने चिरडण्याची कामगिरी याच NOPO ने पार पाडली आहे. २०२१ मध्ये अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने इराणमधील गंभीर मानवी हक्क उल्लंघनांसाठी NOPO वर निर्बंध लादले आहेत. आता त्याच NOPO चे सैनिक अमेरिकेवर तुटून पडले आहेत. ( Iran’s NOPO Special Forces )
– सई बने
- anti-riot operations
- Ayatollah Khamenei security
- black uniform unit
- counter-terror unit Iran
- elite commando force
- elite tactical force.
- Hezbollah training support
- Houthi rebels support
- human rights violations Iran
- Iran defense structure
- Iran internal security
- Iran military units
- Iranian protests crackdown
- IRGC
- Islamic Revolutionary Guard Corps
- Middle East conflict
- military intelligence Iran
- Mojtaba Khamenei
- NOPO special forces
- paramilitary organization
- special protection force
- Supreme Leader protection unit
- Tehran brigades
- US sanctions 2021
- US-Iran tensions