Home आंतरराष्ट्रीय United States-North Korea : युद्धात फक्त याचीच कमी होती….
आंतरराष्ट्रीय

United States-North Korea : युद्धात फक्त याचीच कमी होती….

73

रशिया-युक्रेन युद्धानंतर आता अमेरिका-इराण युद्धाने जग बेजार झाले असतानाच आणखी एका विनाशक युद्धाची चाहूल लागली आहे. हे संभाव्य युद्ध अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यात होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण एकीकडे इराणवर क्षेपणास्त्र डागत असताना अमेरिकेने आता दक्षिण कोरियासह संयुक्त लष्करी सराव सुरू केला आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्या या संयुक्त सरावामुळे उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन संतापला आहे. उत्तर कोरियाच्या सुरक्षा समितीची प्रमुख असलेल्या किम जोंग उन यांची बहीण किम यो जोंग हिने यावर आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेला याचे भयानक परिणाम भोगावे लागतील, अशी थेट धमकीच किम यो जोंग हिने दिल्यामुळे आता आणखी एका नव्या युद्धाला अमेरिका तोंड देणार का, असा प्रश्न विचारला जात आहे. ( United States-North Korea )

जगभरात फक्त युद्धाच्या बातम्याच आहेत का, असा प्रश्न निर्माण होईल इतका तणाव वाढला आहे. एकीकडे इराणवर केलेल्या युद्धामध्ये अमेरिकेचे हात अडकले असताना आता त्यांनी दुसऱ्या युद्धाची तयारीही सुरू केली आहे. अमेरिकेच्या सैनिकांनी दक्षिण कोरियाच्या सैनिकांसोबत संयुक्त लष्करी सराव सुरू केला आहे. यामुळे उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन प्रचंड संतापले आहेत. उत्तर कोरियाच्या संरक्षण विभागाची जबाबदारी किम जोंग उन यांनी त्यांच्या बहिणी किम यो जोंग हिच्याकडे सोपवली आहे. तिने या सरावाबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. अमेरिकेने दक्षिण कोरियासह युद्धसराव सुरू केल्यामुळे किम यो जोंग यांनी स्पष्ट शब्दांत अमेरिकेला धमकी दिली आहे. किम यो जोंग हिने अमेरिकेला म्हटले आहे की, जर उत्तर कोरियाच्या सुरक्षेला आव्हान दिले गेले तर त्याचे “खूप भयानक परिणाम” होऊ शकतात. यावरच ती शांत न राहता तिने एक निवेदन जाहीर करून अमेरिका-दक्षिण कोरियाचा लष्करी सराव हा प्रादेशिक शांततेसाठी धोका असल्याचे म्हटले आहे. या निवेदनात तिने पुढे अमेरिकेमुळे जग आधीच युद्धाच्या खाईत गेले असताना आता नव्या युद्धाची सुरुवात कशासाठी केली जात आहे, असा प्रश्नही विचारला आहे. तणावाच्या वातावरणात या लष्करी सरावांमुळे परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. यातून जर उत्तर कोरियाची सुरक्षा धोक्यात आली तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असेही किम यो जोंग हिने स्पष्ट केले आहे.

अमेरिका आणि दक्षिण कोरियाने “फ्रीडम शील्ड” नावाचा ११ दिवसांचा संयुक्त लष्करी सराव सुरू केला आहे. १९ मार्चपर्यंत हा सराव सुरू राहील. यात १८,००० दक्षिण कोरियाचे सैनिक सहभागी होत असून अमेरिकेचे किती सैनिक सहभागी आहेत, याची माहिती देण्यात आलेली नाही. अमेरिकेने दक्षिण कोरियासोबत या सरावाची सुरुवात केल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. कारण त्याच दरम्यान अमेरिकेने इराणवरही हल्ला सुरू केला. हा हल्ला सुरू झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणनंतर आणखी एका देशाला शांततेचा सल्ला द्यायचा आहे, असे सूचक विधान केले होते. हा देश कोणता हे ट्रम्प यांनी स्पष्ट केले नसले तरी त्यांचा रोख उत्तर कोरिया आणि त्याचे नेते किम जोंग उन यांच्याकडे आहे, हे स्पष्ट झाले. त्यातूनच त्यांनी दक्षिण कोरियासोबत युद्धसराव सुरू केल्यामुळे ट्रम्प आता आणखी नव्या युद्धाची सुरुवात करणार का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. ( United States-North Korea )

=======

हे देखील वाचा : US-Iran-Israel : अमेरिका-इराण युद्धामुळे जगावर न्यूक्लियर विंटरचे सावट

=======

दक्षिण कोरियासोबत अमेरिकेने सुरू केलेल्या लष्करी सरावात संगणक सिम्युलेशनद्वारे युद्धासारख्या परिस्थितीची चाचणी घेण्यात येत आहे. याव्यतिरिक्त “वॉरियर शील्ड” नावाचे एक फील्ड प्रशिक्षणही होत आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरियाने या लष्करी सरावामुळे अन्य कोणत्याही देशाला धोका नसून हा फक्त बचावात्मक परिस्थितीतील सराव असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र उत्तर कोरियाने हे स्पष्टीकरण नाकारले आहे. प्योंगयांगचा दावा आहे की हा सराव प्रत्यक्षात त्यांच्याविरुद्ध संभाव्य हल्ल्याची तयारी आहे. अशा लष्करी सरावावर आपले पूर्ण लक्ष असून उत्तर कोरियाच्या सुरक्षेला धक्का लागला तर त्याची किंमत अमेरिकेला भोगावी लागेल, असे उत्तर कोरियाने म्हटले आहे. उत्तर कोरिया फक्त धमकी देऊन शांत राहिला नाही, तर त्यांनी आपला अणु कार्यक्रम अधिक मजबूत करण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, या युद्धसरावासोबत डोनाल्ड ट्रम्प यांनी दक्षिण कोरियात अमेरिकन सैन्य तैनात केले आहे. यातून उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग उन यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. मात्र किम यांच्या बहिणीने अमेरिकेच्या दबावापुढे आपण झुकणार नसल्याचे जाहीर केल्यामुळे आता अमेरिका नव्या युद्धाकडे वाटचाल करत असल्याची भीती व्यक्त होत आहे. ( United States-North Korea )

– सई बने

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!

📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा

Related Articles

Katrina Kaif
आंतरराष्ट्रीय

Jiang Xueqin : चीनच्या नॉस्ट्राडॅमसने सांगितले ट्रम्पचे भविष्य

अमेरिका-इराण युद्धामध्ये पंधरा दिवसांचा विराम आला आहे. यात चीनची भूमिका असल्याची माहिती...

Jewellery
आंतरराष्ट्रीय

Jared Kushner : ट्रम्पचा जावई आहे तरी कोण

अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धावर कायमचा विराम आणण्यासाठी पाकिस्तानची राजधानी...

Mobile
आंतरराष्ट्रीय

First Lady Melania Trump : अमेरिकेच्या फर्स्ट लेडीसाठी शाही सवारी

इराणमध्ये सत्तांतर करण्याच्या हेतूने अमेरिकेने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणविरुद्ध लष्करी मोहीम...

आंतरराष्ट्रीयगाजावाजा स्पेशल

US-Iran War : अमेरिका नमली की इराण घाबरलं ?

America, Israel आणि Iran यांचे युद्ध गेले ४० दिवस चालू आहे. रोजच्या...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!