सध्या चैत्र नवरात्र सुरु असून, सगळ्या देवीच्या मंदिरांमध्ये भक्तिमय वातावरण दिसत आहे. देवीच्या मंदिरांमध्ये विविध पद्धतीने भाविक तिची सेवा करत मनोभावे पूजा करत आहेत. चैत्र नवरात्राच्या निमित्ताने आपण देशभरातील देवीची प्रसिद्ध मंदिरं, त्यांचा इतिहास पाहत आहोत. आज आपण साडे तीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या माहूर गड निवासिनी रेणुका मातेच्या मंदिराबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठापैकी एक शक्तीपीठ म्हणून माहूरचे श्री रेणुकादेवी मंदिर ओळखले जाते. नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यात सह्याद्रीच्या पर्वत रांगात रेणुकादेवीचे मंदिर माहूर शहरापासून सुमारे 2.415 किमी अंतरावर नैसर्गिक सौंदर्यात डोंगरावर वसलेले आहे. देवगिरीच्या राजाने देवीचे हे मंदिर सुमारे आठशे ते नऊशे वर्षांपूर्वी बांधले. (Chaitra Navratra)
देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे, माहूरची श्री रेणुकामाता होय. माहूर गडाची रेणुका देवी ही महाराष्ट्रातील अनेक परिवारांची कुलदेवी आहे. ही साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. माहूर गड हे एक जागृत तीर्थ क्षेत्र आहे. माहूर गडावर रेणुके तसेच दत्तात्रय आणि परशुराम यांची देखील देऊळे इथे आहे. या देवीचं देऊळ यादव काळातील राजाने बांधले असे. आख्यायिका आहे की दत्तात्रयांचा जन्म देखील याच माहूर गडावर झाला. (Marathi)
माता रेणुकाची एक कथा आहे- या कथेनुसार रेणुका मातेचा वध त्यांच्या मुलाने म्हणजे परशुरामाने आपल्या पितृ आदेशावरून केले. नंतर परशुरामाला आपल्या मातेची आठवण येऊ लागली ते दुखी झाले असून शोकाकुल झाले होते. त्याच क्षणी आकाशवाणी झाली. तुझी आई तुला दर्शनास येईल. पण तू मागे वळून बघू नकोस. परंतु परशुरामाला आपल्या आईशी भेटण्याची ओढ लागली होती. त्यामुळे त्याने मागे वळून बघितले. त्यावेळी रेणुकेमातेचा चेहराच जमिनीतून वर आलेला होता. परशुरामाला तेवढेच दिसले. त्यामुळे माहूरगडावर रेणुकेच्या या तांदळारूपातील मुखाचीच पूजा केली जाते. या डोंगरावर परशुरामाला मातेचे दर्शन घडले त्यामुळे या डोंगराला ‘मातापूर ‘ म्हटले जाऊ लागले आणि शेजारीच आंध्रप्रदेशातील ‘ऊर’ गाव असल्यामुळे ‘माऊर’ आणि आता ते माहूर म्हणून ओळखले जाते. (Todays Marathi Headline)

एका कथेनुसार माता पार्वतीने कुब्ज नगराच्या राजाच्या पोटी जन्म घेतला तिचे नाव रेणू ठेवले. उपवर झाल्यावर तिचे लग्न शंकराचे अवतार मानले गेलेले ऋषी जमदग्नीशी करण्यात आले. ऋषी जमदग्नी हे फार तापट असे. ऋषींच्या आश्रमात फार शिष्य शिकवणी घेण्यासाठी राहत असे. ऋषींच्या आश्रमात कामधेनू नावाची गाय होती जी सर्वांची इच्छा पूर्ण करायची. एकदा त्या नगराचा राजा सहस्रार्जुनाने कामधेनू बघितल्यावर ऋषींकडे तिची मागणी केली. ऋषीने नकार दिला या वर संतापून त्याने ऋषिपुत्र परशुराम नसताना आश्रमावर हल्ला करून ऋषी जमदग्नि यांना ठार मारले. (Latest Marathi News)
ऋषिपुत्र परशुराम तेथे आल्यावर घडलेला प्रकार कळाला. त्याच क्षणी त्यांनी सर्व क्षत्रियांना संपविण्याची प्रतिज्ञा घेतली आणि वडिलांचे अंत्यसंस्कार कोऱ्या जमिनीवर करण्याचे निश्चय करून वडिलांचे प्रेत घेऊन आई सह भटकंती करत माहूर गडावर आले. इथे पूर्वीपासून वास्तव्यास असलेले दत्तात्रयांनी त्यांना मदत केली आणि वडिलांसाठी कोरी जागा शोधून दिली. त्यापूर्वी परशुरामाने आपल्या बाणाने तिथे मातृ कुंड आणि सर्व कुंड निर्माण करून त्याच पाण्याने अंघोळ घालून आपल्या पित्याचे अंत्यसंस्कार केले. त्यांचा पित्यासह त्यांची माता रेणू देखील सती झाल्या. (Marathi Trendning HEadline)
माहूर गडावर माता रेणुकेचे कमलाकर असे देऊळ आहे. हे देऊळ यादवराजा देवगिरी यांनी 800 ते 900 पूर्वी बांधलेले असे. हे देऊळ वास्तुशास्त्रानुसार बांधण्यात आले आहेत. देऊळ हे गाभारा आणि सभामंडपात विभागलेले आहेत. गाभाऱ्यात कोणालाही प्रवेश देत नाही. गाभाऱ्याचे प्रवेश द्वार चांदीच्या पत्राचे आहे. देवीचा मुखवटा तब्बल 5 फुटी उंच आहे आणि रुंदी 4 फुटी इतकी आहे. जवळच तेलाचा आणि तुपाचा दिवा तेवलेला आहे. देवीचा हा मुखवटा पूर्वाभिमुखी आहे. (Top Stories)
=========
Chaitra Navratra : साडे तीन शक्तिपीठांपैकी अर्धेपीठ – सप्तशृंगी देवी
==========
देवीच्या डोक्यावर चांदीचा टोप घातलेला आहे. सुवर्णेभूषणे परिधान करून देवी पितांबर नेसलेली आहे. भाळी मळवट भरलेले असून मुखात तांबूल घेऊन आहे. मुखावर सहस्त्र सूर्याचे तेज असलेली माता रेणुकेचे मोहक रूप डोळ्यातच साचवून ठेवण्या सारखे असते. मातेचे दर्शन घेण्यासाठी आपल्याला दक्षिणाभिमुख चांदीने मढलेल्या दारातून प्रवेश करावा लागतो. सभामंडपाच्या परिसरात महाकाली, महालक्ष्मी आणि तुळजाभवानीच्या मुरत्या आहेत. पहिलं बाजूस परशुरामाचे देऊळ दर्शनी भागास गणपतीचे देऊळ, विष्णू कवी मठ, पांडवतीर्थ, औदुंबर झरा, जमदग्नी स्थान, अमृत कुंड, आत्मबोध तीर्थ, मातृ तीर्थ आणि राम तीर्थ इत्यादी तीर्थ आहेत. (Social News)
(टीप: वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
- Chaitra Navratra
- Chaitra Navratra 2026
- Chaitra Navratra special
- Nanded
- renuka mata
- renuka mata mahur
- renuka mata mahur history
- renuka mata mahur information
- renuka mata mahur mahiti
- renuka mata mahur significance
- renuka mata mahur temple
- renuka mata temple nanded
- ऋषी परशुराम
- चैत्र नवरात्र
- चैत्र नवरात्र २०२६
- पार्वती माता
- माहूर गड
- रेणुकामाता माहूर
- रेणुकामाता माहूर इतिहास
- रेणुकामाता माहूर कथा
- रेणुकामाता माहूर गड
- रेणुकामाता माहूर माहिती
- साडे तीन शक्तिपीठं