Home लाईफ स्टाईल Gudipadwa : गुढीवर तांब्याचाच कलश उपडा का ठेवतात?
लाईफ स्टाईल

Gudipadwa : गुढीवर तांब्याचाच कलश उपडा का ठेवतात?

1

गुढीपाडवा म्हणजे हिंदू नवीन वर्षाची सुरुवात…साडे तीन मुर्हुतांपैकी एक असणारा अत्यंत शूभ मुहुर्त म्हणजे गुढीपाडवा. यावर्षी गुरुवार 19 मार्च 2026 रोजी गुढीपाडवा साजरा केला जात आहे. गुढीपाडवा या सणाला अनेक अर्थी महत्त्व आहे. धार्मिक मान्यतांनुसार याच दिवशी ब्रह्म देव यांनी सृष्टीची निर्मिती केली होती, तर याच दिवशी भगवान विष्णू यांनी मत्स्य अवतार घेतला होता. शालिवाहन ह्या राजाने शालिवाहन शकास सुरुवात केली आणि या शकाची सुरुवात अर्थात आरंभ म्हणजेच गुढीपाडवा होय. (Gudhipadwa)

श्री राम” लंकेवर विजय मिळवुन अयोध्येला परतले तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत ध्वज उभारुन मोठ्या आनंदाने केले. चैत्र शुध्द प्रतिपदेच्याच दिवशी प्रभू रामांचा चौदा वर्षांचा वनवास संपला होता, म्हणून हा आनंदोत्सवाचा साजरा केला जातो. प्रभू श्रीराम यांचे स्वागत लोकांनी घरासमोर गुढी उभारून केले होते. गुढी ही केवळ एक प्रथा नसून हा एक विजयोत्सव आहे. गुढी उभारताना कायम एका काठीवर वरच्या टोकाला नवीन रेशमी वस्त्र बांधले जातात. त्या वस्त्रासोबत साखरेची गाठी, कडुनिंबाची डहाळी आणि आंब्याची पाने एकत्र करून बांधतात. त्यावर झेंडूच्या फुलांचा हार गुढीला अर्पण करा. सर्वात शेवटी, काठीच्या टोकावर तांब्याचा किंवा चांदीचा तांब्या म्हणजेच कलश उपडा ठेवता. या तांब्यावर कुंकवाने स्वस्तिक काढले जाते. (Marathi)

गुढीवर तांब्याचाच तांब्या हा उपडा का ठेवला जातो? यामागे देखील एक खास शास्त्र आहे. हिंदू धर्मात धार्मिक कार्यात तांब्याच्या भांड्यांचा वापर करण्याची जुनी परंपरा आहे. यामागे धार्मिक श्रद्धा, तर आहेच शिवाय अजून काही कारणं आहेत. ‘तांबे’ हा एक पवित्र आणि शुद्ध धातू असून त्याचा वापर करणे म्हणजे आध्यात्मिक शुद्धता वाढते. तज्ज्ञांच्या माहितीनुसार ‘तांबे आणि चांदी हे धातू देवांना प्रिय आहे. तांब्याचा भांड्याचा वापर धार्मिक विधींमध्ये देखील केला जातो. या वापरामुळे एक खास प्रकारे आध्यात्मिक ऊर्जा आपल्याकडे प्रभावित होत असते. (Todays Marathi Headline)

याशिवाय तांबे हा गंजरोधक धातू असल्यामुळे तो दीर्घकाळ टिकतो. पूर्वीच्या काळात चांदीचा कलश वापरण्याची परंपरा काही ठिकाणी होती. मात्र चांदी सर्वसामान्यांना परवडत नसल्यामुळे तांब्याचा वापर अधिक प्रमाणात सुरू झाला. त्यामुळे कालांतराने गुढीसाठी तांब्याचा कलश हीच प्रथा रूढ झाली. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने तांबे हा धातू मंगळ ग्रहाशी संबंधित मानला जातो. मंगळ ग्रह ऊर्जा, धैर्य आणि पराक्रम यांचे प्रतीक मानला जातो. गुढी ही विजयाचे प्रतीक असल्यामुळे तिच्या शिखरावर तांब्याचा कलश ठेवणे हे पराक्रम आणि यशाचे प्रतीक मानले जाते. (Latest Marathi Headline)

काही ज्योतिषांच्या मते तांबे हा समृद्धी आणि सकारात्मकतेचेही प्रतीक आहे. त्यामुळे गुढीवर तांब्याचा कलश ठेवणे हे शुभ मानले जाते. शिवाय गुढीवर ठेवला जाणारा कलश तांब्याचा असल्यामुळे तो ऊर्जा खेचून घेतो. जमिनीतील ऊर्जा असो वा चाहोबाजूकडील ऊर्जा त्या कलशात समाविष्ट होते आणि गुढीची पूजा करताना त्या ऊर्जेचे सकरात्मक परिणाम आपल्यावर आणि घरात कायम राहतात. (Top Stories)

=========

Gudhipadwa : गुढीपाडव्याला गुढी उभारण्याची योग्य पद्धत काय?

Gudhipadwa : चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा

=========

गुढीवर आपण कायम तांब्याचा तांब्या उपडा ठेवतो. याचे कारण म्हणजे, हिंदू धर्मानुसार, गुढी पाडव्याच्या दिवशी गुढी उभारताना तांब्याचे तोंड जमिनीकडे असल्याने त्यातून निघणाऱ्या लहरींचा फायदा जमिनी जवळच्या वायूमंडलाला, उर्ध्वमंडलाला मिळण्यास मदत होते. यावेळी कलशामध्ये लावलेले कडुलिंब, कलश, साखरमाळ आणि वस्त्र यांमुळे वायूमंडल शुद्ध होते. गुढी आपण घराच्या मुख्य दाराबाहेर किंवा घराच्या खिडकी, गॅलरीमध्ये उभारतो. ज्यामुळे जमिनीमार्फत ऊर्जा आपल्या घराकडे, कुटुंबाकडे यावी, यामागचे मुख्य कारण असते. त्यामुळे गुढीवर कलश उलटा ठेवला जातो. (Social News)

(टीप: वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

लाईफ स्टाईल

Gold : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याला एवढे महत्त्व का आहे?

आज अक्षय्य तृतीया. साडे तीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेचे ओळख...

Parshuram
लाईफ स्टाईल

Parshuram : भगवान परशुरामांबद्दलची रंजक तथ्ये

परशुराम यांना भगवान विष्णू यांचा सहावा अवतार समजले जाते. मान्यतेनुसार भगवान विष्णू...

लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला ‘ही’ कामे करून पुण्य कमवा

वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक...

लाईफ स्टाईल

Vallabhacharya : वल्लभाचार्य जयंती – कोण होते कृष्णभक्त वल्लभाचार्य?

आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची अकरावी तिथी अर्थात. आज चैत्र महिन्यातील एकादशीचा...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!