Home लाईफ स्टाईल Gas Cylinder : गॅस सिलेंडर वाचवण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय
लाईफ स्टाईल

Gas Cylinder : गॅस सिलेंडर वाचवण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

1

सगळीकडे सध्या फक्त आणि फक्त गॅस सिलेंडरचीच चर्चा सुरु आहे. कारण सध्या इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील तणावामुळे जागतिक बाजारपेठेत मोठी गोंधळ निर्माण झाला आहे. या युद्धामुळे खनिज तेल आणि गॅस वाहतुकीचा अत्यंत महत्त्वाचा मार्ग असलेली ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ बंद झाली आहे. यामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढल्या असून अनेक ठिकाणी गॅस सिलिंडरची टंचाईही जाणवत आहे. त्यामुळेच आता आपल्या घरातील सिलेंडरचा वापर अतिशय काळजीपूर्वक करणे जिकरीचे झाले आहे. गॅस सिलेंडर काळजीपूर्वक वाचवण्यासाठी आणि गॅस सिलेंडर जास्त काळ टिकावा यासाठी आम्ही तुम्हाला आज काही सोप्या आणि सहज करता येतील अशा टिप्स सांगणार आहोत. (Gas Cylinder)

सर्वात आधी आपला सिलेंडर अजून किती दिवस चालेल याबद्दल आपण योग्य अंदाज नाही लावू शकत नाही. शिवाय सिलेंडरमध्ये नक्की किती गॅस शिल्लक आहे, याचा अंदाज येत नाही. पण काळजी करू नका, आज आपण कोणत्याही मशीनशिवाय घरच्या घरी काही सोप्या ट्रिक्स वापरून गॅसची किती शिल्लक आहे, याची पातळी तपासणार आहोत. सिलेंडरमधील गॅस मोजण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे. एक कापड पाण्यात भिजवून ओले करा आणि ते सिलेंडरच्या बाजूने वरपासून खालपर्यंत गुंडाळा. एक-दोन मिनिटांनंतर कापड काढून टाका. (Marathi)

अनेक वेळा घाईघाईत लोक स्वयंपाकासाठी ओली भांडी गॅसवर ठेवतात. उष्णतेमुळे ही भांडी पूर्णपणे सुकत असली तरी या संपूर्ण प्रक्रियेत भरपूर गॅस खर्च होतो. अशा वेळी, स्वयंपाक करण्यापूर्वी नेहमी सूती कापडाने भांडी पुसून घ्यावीत आणि मगच गॅसवर ठेवून स्वयंपाक करावा. यामुळे गॅस वाचवणे सोपे होऊ शकते. स्वयंपाकाच्या पारंपारिक पद्धतींच्या तुलनेत, प्रेशर कुकिंगमुळे गॅसची बचत होते, विशेषत: तांदूळ आणि डाळी तयार करताना. याशिवाय वेळेची बचत होण्यासही मदत होते. कुकरची साफसफाई टाळण्यासाठी काही लोक भांड्यातच डाळ आणि तांदूळ शिजवतात, त्यामुळे भरपूर गॅस लागतो. (Todays Marathi Headline)

Gas Cylinder

अनेकदा आपण छोट्या बर्नरवर मोठं भांडं किंवा मोठ्या बर्नरवर छोटं भांडं ठेवतो, यामुळे गॅस वाया जातो. भांड्याचा आकार बर्नरच्या आकाराएवढाच असेल याची काळजी घ्या. तसेच, जाड बुडाची भांडी वापरल्यास अन्न लवकर शिजतं आणि गॅसची बचत होते. डाळ, भाजी किंवा भात शिजवताना भांड्यावर झाकण ठेवले, तर वाफ आतच राहते आणि जेवण लवकर शिजते. यामुळे गॅस कमी लागतो आणि जेवणाची चवही छान लागते. जेवण तयार करताना लक्षात ठेवा की, गॅसची आग आणि भांड्यामध्ये योग्य अंतर असावे. भांडं आगीपासून खूप वर असेल तर जेवण तयार होण्यास जास्त वेळ लागू शकतो. यामुळे जास्त गॅस खर्च होतो. योग्य अंतरावर भांडं ठेवल्याने उष्णता थेट भांड्यात पोहोचते. ज्यामुळे जेवण लवकर शिजतं आणि गॅसचीही बचत होते. (Top Marathi News)

गॅस चालू करण्यापूर्वी भाज्या कापून, मसाले तयार ठेवून आणि इतर गोष्टी तयार ठेवणे खुप फायदेशीर असते. यामुळे जेवण शिजवण्याचा वेळ कमी होतो आणि गॅसही विनाकारण चालू राहत नाही. पहिलेच तयारी असल्यावर गॅस जास्तवेळ ऑन राहत नाही. ज्यामुळे गॅसची चांगली बचत होते आणि कामही लवकर होते. स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारी भांडी स्वच्छ असणे आवश्यक आहे. भांड्यांवर तेल किंवा घाण साचली असल्यास उष्णता नीट पसरत नाही. स्वच्छ भांड्यांमुळे अन्न लवकर शिजते आणि गॅसची बचत होते. (Latest Marathi Headline)

========

Induction : इंडक्शन कुकटॉप घेताय…? मग ही बातमी तुमच्यासाठी

Rice : जगातील सर्वात महागडा तांदूळ, किंमत ऐकाल तर येईल भोवळ

========

बर्नर स्वच्छ ठेवल्याने स्टोव्हची ज्योत तीक्ष्ण राहते. त्यामुळे भांडी कमी वेळात गरम होतात आणि गॅसही कमी खर्च होतो. या उलट, बर्नरमध्ये जर घाण असेल तर, काहीवेळा तो व्यवस्थित जळत नाही आणि गॅस विनाकारण बाहेर पडत राहतो. तुमच्या गॅसची फ्लेम कमकुवत जाली असेल किंवा थोडाही गॅस लीक होत असेल तर सिलिंडर खुप लवकर संपू शकतो. यामुळे वेळोवेळी सिलेंडर आणि नॉजल चेक करत राहा. तुम्हाला फ्लेम कमी वाटत असेल तर लगेच याची तपासणी करुन घ्या. (Top Stories)

तांदूळ, डाळी किंवा कडधान्ये स्वयंपाक करण्यापूर्वी काही वेळ पाण्यात भिजवून ठेवल्यास ती लवकर शिजतात. त्यामुळे गॅस कमी लागतो. याशिवाय भिजवलेले धान्य पचायलाही हलके असते. भाजी किंवा डाळ करताना जास्त पाणी घातल्यास ते उकळण्यासाठी जास्त वेळ लागतो. त्यामुळे गॅसचा वापर वाढतो. म्हणून पदार्थासाठी आवश्यक तेवढेच पाणी वापरणे चांगले. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

लाईफ स्टाईल

Gold : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याला एवढे महत्त्व का आहे?

आज अक्षय्य तृतीया. साडे तीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेचे ओळख...

Parshuram
लाईफ स्टाईल

Parshuram : भगवान परशुरामांबद्दलची रंजक तथ्ये

परशुराम यांना भगवान विष्णू यांचा सहावा अवतार समजले जाते. मान्यतेनुसार भगवान विष्णू...

लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला ‘ही’ कामे करून पुण्य कमवा

वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक...

लाईफ स्टाईल

Vallabhacharya : वल्लभाचार्य जयंती – कोण होते कृष्णभक्त वल्लभाचार्य?

आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची अकरावी तिथी अर्थात. आज चैत्र महिन्यातील एकादशीचा...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!