Home व्यक्ती विशेष Induction : इंडक्शन कुकटॉप घेताय…? मग ही बातमी तुमच्यासाठी
व्यक्ती विशेष

Induction : इंडक्शन कुकटॉप घेताय…? मग ही बातमी तुमच्यासाठी

1
Titanic
Titanic

इराण आणि अमेरिका इस्राएल यांच्यामध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे जगातील इतर देशांवर याचे अनेक परिणाम होताना दिसत आहे. याला भारत देखील अपवाद नाही. भारतावर देखील या युद्धामुळे इंधन टंचाई जाणून लागली आहे. आता तर गॅस सिलेंडर देखील मिळत नसल्याने स्वयंपाकाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र यावर तोडगा म्हणून आता इंडक्शन कुकवेयर घेण्यासाठी लोकांची गर्दी होताना दिसत आहे. तुम्हालाही इंडक्शन खरेदी करायचे असेल आणि कळत नसेल की, कोणत्या प्रकारचे आणि कसे इंडक्शन तुमच्या घरासाठी योग्य असेल, तर आजची ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. (Induction)

इंडक्शन खरेदी करताना सर्वप्रथम त्याची पॉवर रेटिंग पाहणे महत्त्वाचे असते. बाजारात साधारणपणे १२०० वॅट ते २२०० वॅटपर्यंतचे इंडक्शन स्टोव्ह उपलब्ध असतात. जास्त पॉवर असलेले मॉडेल पदार्थ लवकर शिजवण्यास मदत करतात. मात्र त्यामुळे विजेचा वापर तुलनेने जास्त होऊ शकतो. म्हणूनच आपल्या रोजच्या वापरानुसार योग्य पॉवर असलेला इंडक्शन निवडा. आता येणाऱ्या आधुनिक मॉडेलमध्ये उकळणे, फ्राय करणे किंवा स्लो कुकिंगसारखे वेगवेगळे कुकिंग मोड दिलेले असतात. यामुळे स्वयंपाक करणे सोपे होते आणि वीज वापरावरही नियंत्रण ठेवता येते. इंडक्शन स्टोव्ह खरेदी करण्यापूर्वी आपल्या घरातील वीज कनेक्शन त्या पॉवरसाठी योग्य आहे का, हेही तपासा. (Marathi)

इंडक्शनचा आकार म्हणजे इंडक्शनवर किती झोन असावे हे पण महत्त्वाचे आहे. जागा वाचवण्यासाठी एकच झोन असलेले किंवा लहान इंडक्शन खरेदी करू नका. भारतीय स्वयंपाक जास्त असल्याने आपल्याला गॅसच्या 2 ते 4 शेगड्यांवर स्वयंपाकाची सवय असते. म्हणून भारतीय स्वयंपाकासाठी किमान 2 झोन असलेले इंडक्शन खरेदी करा. (Todays Marathi Headline)

Induction

आपल्या घरातील रोजची स्वयंपाकाची भांडी इंडक्शनसाठी वापरता येत नाही. म्हणून, तुम्हाला नवीन खरेदी करणे आवश्यक आहे. बरेच लोक अजूनही जुने अॅल्युमिनियम कुकटॉप वापरतात, ज्यामुळे ते एका महिन्यात खराब होऊ शकते. म्हणून, इंडक्शन कुकटॉप खरेदी करण्यापूर्वी इंडक्शन-फ्रेंडली कुकटॉप खरेदी करा. (Latest Marathi News)

इंडक्शन कुकटॉप चुंबकीय तत्त्वावर काम करतो. त्यामुळे अॅल्युमिनियम, तांबे किंवा काचेची भांडी इंडक्शनवर योग्य प्रकारे गरम होत नाहीत. अशा भांड्यांचा वापर केल्यास स्वयंपाक करण्यास जास्त वेळ लागू शकतो. त्यामुळे स्टेनलेस स्टील किंवा कास्ट आयर्नसारख्या चुंबकीय धातूंची भांडी वापरणे उत्तम मानले जाते.

सध्याच्या इंडक्शन स्टोव्हमध्ये अनेक आधुनिक सेफ्टी फीचर्स दिलेले असतात. यात ऑटो कट-ऑफ, ओव्हरहीट प्रोटेक्शन आणि चाइल्ड लॉकसारख्या सुविधा समाविष्ट असतात. इंडक्शन जास्त गरम झाल्यास किंवा त्यावर योग्य भांडे न ठेवल्यास हे उपकरण आपोआप बंद होते. (Top Trending News)

========

DMart : D-Mart मध्ये शॉपिंग करता ना…? मग D-Mart चा फुल फॉर्म माहिती आहे का?

Rice : जगातील सर्वात महागडा तांदूळ, किंमत ऐकाल तर येईल भोवळ

========

इंडक्शन कुकटॉप साफ करताना कठीण स्क्रबर किंवा खडबडीत क्लीनर वापरू नयेत. यामुळे पृष्ठभागावर ओरखडे पडू शकतात आणि उपकरणाची चमकही कमी होऊ शकते. त्याऐवजी मऊ कापड किंवा स्पंज वापरून हलक्या हाताने स्वच्छता करणे अधिक योग्य आहे. इंडक्शन कुकटॉप वापरताना या छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर उपकरणाची आयुष्य वाढते आणि स्वयंपाकही अधिक सुरक्षितपणे करता येतो. योग्य भांडी आणि योग्य पद्धत वापरणे हेच इंडक्शन स्टोव्ह सुरक्षित ठेवण्याचे सर्वात सोपे रहस्य मानले जाते. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!

📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा

Related Articles

व्यक्ती विशेष

First IAS Officer India : देशातील पहिले आयएएस अधिकारी कोण? रविंद्रनाथ टागोर यांच्याशी होता खास नातेसंबंध

First IAS Officer India : भारतातील प्रशासन व्यवस्थेचा इतिहास खूप समृद्ध आणि प्रेरणादायी...

Health Care
व्यक्ती विशेष

Healthy Lifestyle : दररोजच्या या 7 वाईट सवयींमुळे तुम्ही आजाराला देताय आमंत्रण

Healthy Lifestyle : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेकजण नकळत अशा काही वाईट सवयी अंगी...

Akbar
व्यक्ती विशेष

Mughal Emperor: मुघल इतिहासातील सर्वाधिक विवाह करणारा सम्राट!

Mughal Emperor And Marriage : भारतीय इतिहासात मुघल साम्राज्य हे वैभव, सत्ता...

Premchand Roychand Jain
व्यक्ती विशेष

Indian stock market : भारतीय शेअर बाजाराचा पहिला बिगबुल प्रेमचंद रॉयचंद जैन यांची प्रेरणादायी कहाणी

Indian Stock Market : भारतीय शेअर बाजाराचा पाया रचणाऱ्या महान उद्योगपतींपैकी एक...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!