आपल्याकडे वीकेंडला कोणालाही विचारले की विकेंडचा प्लॅन काय आहे? यावर जवळपास सर्वांचे उत्तर एकसमान आणि ते म्हणजे, डीमार्टला जाणार आहे. घरातील स्त्रीसोबत नवरा, भाऊ, मुलगा आदी पुरुषांना देखील डीमार्टला इच्छा असो वा नसो जावेच लागते. मध्यमवर्गीय कुटुंबांची जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीची पहिली पसंती म्हणजे डीमार्ट आहे. डीमार्ट म्हणजे महिलांचे फिरण्याचे आणि शॉपिंग करण्याचे अतिशय आवडते ठिकाण आहे. घरातील वाणसामानापासून ते विविध इलेक्ट्रॉनिक वस्तूंपर्यंत सर्वच लहान मोठ्या वस्तू मिळण्याचे सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध ठिकाण म्हणून डीमार्टची ओळख आहे. (DMart)
विकेंडला तर डीमार्टमधे पाय ठेवायला देखील जागा नसते. सामान घेतल्यानंतर बिल करण्यासाठी अनेक तास रांगेमध्ये उभे राहावे लागते. त्यामुळे डीमार्टला जाण्याचा कंटाळा अनेकांना येतो, पण जाण्याशिवाय देखील पर्याय नसतो. पण आजच्या घडीला अतिशय प्रचलित असणाऱ्या या डीमार्टच्या नावाचे खास सिक्रेट तुम्हाला माहिती आहे का? डीमार्टच्या नावाचा फुल फॉर्म जास्त कोणाला माहिती नसेल. आज आम्ही तुम्हाला याच डीमार्टचा फुल्ल फॉर्म सांगणार आहोत. (Marathi)
डीमार्टचे मालक राधाकिशन दमानी हे आहेत. त्यांनी गरीबांना अगदी कमी दरात सामान मिळवून देण्याच्या हेतून पहिले डीमार्ट सुरु केले होते. या डीमार्टला मिळालेल्या यशानंतर हळूहळू एक एक ब्रांच वाढवण्यात आली होती. डीमार्टचा फुल फॉर्म आहे ‘दमानी मार्ट’. हे नाव त्याचे संस्थापक राधाकिशन दमानी यांच्या आडनावावरून (Damani) ठेवण्यात आले आहे. सुरुवातीला ‘दमानी मार्ट’ असे नाव ठेवण्यात आले होते. नंतर ते लोकप्रियतेसाठी साधे आणि आकर्षक ‘डीमार्ट’ असे छोटे केले गेले. (Marathi NEws)

‘फोर्ब्स’ कडून अलीकडे जगातील सर्वाधिक श्रीमंत लोकांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीनुसार भारतातील सर्वाधिक टॉप 10 श्रीमंत लोकांमध्ये राधाकिशन दमानी यांचा सुद्धा नंबर लागतो. ‘फोर्ब्स’ ने जारी केलेल्या 2025 मधील जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत ते 122 व्या क्रमांकावर आहेत. या यशामागची व्यक्ती म्हणजे राधाकिशन दमानी. ते सध्या भारतातील चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती जवळपास 1.78 लाख कोटी रुपये आहे. (Top Marathi News)
1980 च्या दशकात शेअर बाजारात गुंतवणूक करून कोट्यवधी कमावल्यानंतर त्यांनी 2002 मध्ये मुंबईत पहिले डी-मार्ट उघडले. त्यांचा एकच फंडा आहे की ग्राहकांना जास्तीत जास्त फायदा द्या. याच यादीनुसार जर पाहिलं तर ते भारतातील सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या यादीत नवव्या क्रमांकावर आहेत. त्यांच्याकडे एकूण 15.4 अब्ज डॉलर इतकी संपत्ती आहे. ते डी मार्ट चे संस्थापक आहेत. (latest Marathi HEadline)
डी-मार्टचे बहुतेक स्टोअर्स स्वतःची मालकीची इमारत घेते किंवा खरेदी करते. त्यामुळे भाडे वाचते आणि हा फायदा थेट ग्राहकांना स्वस्त किमतीत मिळतो. म्हणूनच इथे रोजच्या जीवनात लागणाऱ्या सध्या गोष्टींपासून ते टीव्ही-फ्रीजपर्यंत सर्व काही इतर दुकानांच्या तुलनेत लक्षणीय स्वस्त मिळते.आज देशभरात डी-मार्टची 375 हून अधिक शाखा आहेत. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र-तेलंगणा, कर्नाटक, तमिळनाडू, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली-एनसीआर अशा 11 हून अधिक राज्यांत त्यांचा विस्तार झाला आहे. (Top Stories)
========
Hotel : हॉटेलमध्ये चेक-इन कधीही केले तरी चालते, पण चेकआऊट नेहमी १२ वाजताच का होते?
========
राधाकिशन दमानी यांनी २००२ मध्ये मुंबईतील पवई येथे पहिले डीमार्ट स्टोअर सुरू केले. त्यांचा मुख्य उद्देश होता की भारतीय कुटुंबांच्या गरजा लक्षात घेऊन दर्जेदार वस्तू कमी किंमतीत उपलब्ध करून देणे. आज डीमार्ट Avenue Supermarts Limited (ASL) या कंपनीच्या अंतर्गत चालते, ज्याचे मुख्यालय मुंबईत आहे. कंपनीकडे डीमार्ट, डीमार्ट मिनिमॅक्स, डीमार्ट प्रेमिया इत्यादी ब्रँड्स आहेत. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics