Home लाईफ स्टाईल Chardham : चारधाम यात्रा 2026 चे रजिस्ट्रेशन कसे करावे?
लाईफ स्टाईल

Chardham : चारधाम यात्रा 2026 चे रजिस्ट्रेशन कसे करावे?

1

हिंदू धर्मामध्ये तीर्थयात्रेला मोठे महत्त्व आहे. विविध अध्यात्मिक, धार्मिक किंवा पवित्र मानल्या जाणाऱ्या स्थळांना भेट देऊन दर्शन घेणे म्हणजे तीर्थयात्रा. हिंदू धर्मामध्ये जेव्हा तीर्थयात्रेबद्दल बोलले जाते तेव्हा सर्वात आधी डोक्यात येते ती चार धाम यात्रा. हिंदू धर्मात चार धाम यात्रेला मोठे महत्त्व आहे. उत्तराखंडमधील यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या चार पवित्र हिमालयातील तीर्थक्षेत्रांच्या यात्रेला छोटी चारधाम यात्रा म्हणतात. (Chardham)

ही यात्रा म्हणजे हिंदू धर्मातील मोक्ष मिळवून देणारी सर्वात मोठी तीर्थयात्रा मनाली जाते. दरवर्षी लाखो लोकं या यात्रेला जातात. प्रत्येक व्यक्तीने आयुष्यात एकदा तरी चार धाम यात्रा केलीच पाहिजे असे म्हटले जाते. लवकरच 2026 च्या चार धाम यात्रेला सुरुवात होत आहे. त्यासाठी नोंदणी करणे अनिवार्य आहे. चारधाम यात्रा 2026 साठी नोंदणी प्रक्रिया 6 मार्चपासून सुरू करण्यात आली आहे. (Chardham yatra)

अधिकृत मोबाइल ॲप किंवा पर्यटन पोर्टलच्या माध्यमातून यात्रेसाठी इच्छुक असलेले भाविक सहजपणे आपली नोंदणी करू शकतात. सरकारने यावर्षीही नोंदणीची प्रक्रिया सोपी आणि सुलभ ठेवली आहे, ज्यामुळे देशभरातील भाविकांना यात्रेचे नियोजन करणे अधिक सोपे होणार आहे. या वर्षी चारधाम यात्रा 19 एप्रिलपासून सुरू होत आहे. परंपरेनुसार याच दिवशी यमुनोत्री आणि गंगोत्री धामचे दरवाजे भाविकांसाठी उघडले जातील. त्यानंतर 22 एप्रिल रोजी केदारनाथ धाम आणि 23 एप्रिल रोजी बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडले जातील. (Marathi)

सध्या सरकारने ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे, तर ऑफलाइन नोंदणी 17 एप्रिलपासून सुरू केली जाईल. चारधाम यात्रा इतर यात्रांसारखी अजिबातच नाहीये. या यात्रेमध्ये हवामानाशी संबंधित अनेक अडथळे कायम येत असतात. त्यामुळेच सरकार या यात्रेसाठी आधी नोंदणी करायला सांगते. जेणेकरून प्रशासन प्रवाशांची संख्या, सुरक्षा आणि गर्दीचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करू शकेल. (Todays Marathi Headline)

Chardham

चारधाम यात्रेची ऑनलाइन नोंदणी कशी करावी?
उत्तराखंड सरकारच्या registrationandtouristcare.uk.gov.in या वेबसाइटवर जाऊन नोंदणी करू शकतात. यासाठी, आधी वेबसाइटवर खाते तयार करावे लागते. त्यानंतर, प्रवासाची तारीख, धाम आणि प्रवाशांची माहिती भरावी लागते. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर नोंदणी स्लिप डाउनलोड करता येते. (Top Marathi Headline)

यासोबतच भाविक Tourist Care Uttarakhand हे मोबाइल ॲप डाउनलोड करूनही नोंदणी करू शकतात. ॲपमध्ये खाते तयार केल्यानंतर प्रवासाशी संबंधित माहिती भरावी लागते आणि तिथूनच प्रवास पास डाउनलोड करता येतो. सर्वात सोपा मार्ग म्हणजे सरकारने व्हॉट्सॲपद्वारेही नोंदणीची सुविधा दिली आहे. यासाठी 8394833833 या क्रमांकावर “Yatra” असे लिहून मेसेज पाठवावा लागतो. यानंतर चॅटबॉट प्रवाशांकडून आवश्यक माहिती विचारतो आणि त्याच आधारावर नोंदणी पूर्ण होते. (Social Updates)

चारधाम यात्रेसाठी नोंदणी आणि यात्रेशी संबंधित माहिती देण्यासाठी सरकारने हेल्पलाइन क्रमांकही जारी केला आहे. जर कोणत्याही प्रवाशाला ऑनलाइन नोंदणीमध्ये अडचण येत असेल किंवा यात्रेशी संबंधित माहिती हवी असेल, तर तो 0135-1364 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकतो. या क्रमांकावर प्रवाशांना नोंदणी प्रक्रिया, यात्रा मार्ग, व्यवस्था आणि इतर आवश्यक माहितीबद्दल मदत दिली जाईल. (Top Marathi News)

वेबसाइटवर नोंदणी कशी करावी?
* सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट उघडा चारधाम यात्रेसाठी ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी मोबाइल किंवा संगणकात ब्राउझर उघडा आणि उत्तराखंड सरकारच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. वेबसाइट: https://registrationandtouristcare.uk.gov.in (Latest Marathi Headline)

* वेबसाइट उघडल्यानंतर, होमपेजवर रजिस्टर / साइन-अपचा पर्याय दिसेल. नवीन वापरकर्त्यांना यावर आधी आपले खाते तयार करावे.

* यानंतर तुम्हाला नोंदणी फॉर्ममध्ये आपले नाव, मोबाइल नंबर, ई-मेल आयडी आणि राज्य यांसारखी आवश्यक माहिती भरावी लागेल. (Top Trending News)

* फॉर्म भरल्यानंतर तुमच्या मोबाइल नंबरवर OTP येईल. OTP टाकताच तुमचे खाते सत्यापित होईल.

==========

Chaitra Navratra : चैत्र नवरात्र कधीपासून सुरू होत आहे?

==========

* खाते तयार झाल्यानंतर, त्याच वेबसाइटवर मोबाइल नंबर आणि पासवर्ड वापरून लॉग-इन करा. लॉग-इन करताच तुमचा डॅशबोर्ड उघडेल.

* डॅशबोर्डमध्ये Add / Register for Yatra चा पर्याय दिसेल. यावर क्लिक करून यात्रा नोंदणीची प्रक्रिया सुरू करा.

* आता ज्या धाममध्ये जायचे आहे, त्याची निवड करा आणि यात्रेची तारीख, प्रवाशांची संख्या आणि इतर आवश्यक माहिती भरा. एका खात्यातून कुटुंब किंवा गटातील इतर सदस्यांनाही जोडता येते. (Top Stories)

* प्रत्येक प्रवाशासाठी ओळखपत्र अपलोड करणे आवश्यक आहे. यासाठी आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यांसारखी कागदपत्रे वापरता येतात.

* सर्व माहिती भरल्यानंतर फॉर्म सबमिट करा. यानंतर तुमची चारधाम यात्रा नोंदणी स्लिप किंवा QR कोड पास तयार होईल, जो डाउनलोड करून प्रवासादरम्यान सोबत ठेवणे आवश्यक आहे. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

लाईफ स्टाईल

Gold : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याला एवढे महत्त्व का आहे?

आज अक्षय्य तृतीया. साडे तीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेचे ओळख...

Parshuram
लाईफ स्टाईल

Parshuram : भगवान परशुरामांबद्दलची रंजक तथ्ये

परशुराम यांना भगवान विष्णू यांचा सहावा अवतार समजले जाते. मान्यतेनुसार भगवान विष्णू...

लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला ‘ही’ कामे करून पुण्य कमवा

वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक...

लाईफ स्टाईल

Vallabhacharya : वल्लभाचार्य जयंती – कोण होते कृष्णभक्त वल्लभाचार्य?

आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची अकरावी तिथी अर्थात. आज चैत्र महिन्यातील एकादशीचा...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!