Home राशीभविष्य Horoscope : राशिभविष्य! आज ‘या’ राशींना होणार आर्थिक लाभ
राशीभविष्य

Horoscope : राशिभविष्य! आज ‘या’ राशींना होणार आर्थिक लाभ

1

आज ७ मार्च शनिवार. आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. आजचा दिवस हा हनुमान आणि शनी महाराज यांना समर्पित आहे. आजचा दिवस कोणत्या राशींसाठी कसा असेल हे जाणून घेऊया.

मेष
तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. घाईघाईने गोष्टी करू नका; यश निश्चित मिळेल. आरोग्याच्या बाबतीत थोडी विश्रांती घेणं गरजेचं आहे. कामाच्या धावपळीत स्वतःसाठी वेळ काढा. आज तुम्हाला रागावर कंट्रोल करावा लागेल अन्यथा त्रास होऊ शकतो.

वृषभ
आज तुम्ही तुमची अपूर्ण कामे वेळेवर पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न कराल. नोकरीत तुम्हाला बॉस कडून प्रशंसा ऐकायला मिळेल. आज व्यवसायात संधीचे सोने करणे तुमच्या हातात राहील, नवीन ओळखी होतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे, पण पैशांच्या बाबतीत थोडा संयम ठेवा.

मिथुन
आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक उर्जेने भरलेला असेल. आयुष्यात मोठा बदल होईल. तब्येतीची काळजी घ्या आणि मनाच्या शांततेसाठी ध्यानधारणा करा. फॅमिलीसोबत तुम्ही बाहेर फिरायला जाल त्यामुळे तुमचा मूड चांगला असेल.

कर्क
खाजगी नोकरी करणाऱ्यांना आज पदोन्नती मिळेल. तुमचा बॉस तुमचा पगार देखील वाढवू शकतो. घाईघाईने घेतलेल्या निर्णयामुळे भविष्यात पश्चात्ताप होऊ शकतो, म्हणून प्रत्येक निर्णय घेण्याआधी नीट आणि काळजीपूर्वक विचार करा. आज तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल कारण आज तुमची तब्बेत बिघडण्याची शक्यता आहे.

सिंह
आज तुमचा दिवस उत्तम असेल. एखादा गुंतागुंतीचा जुना प्रश्न सुटू शकतो. उत्तम संधी मिळण्यासाठी कष्टाला पर्याय नाही कुटुंबासोबत वेळ घालवल्यामुळे तुम्हाला मनातून शांत वाटेल. आर्थिक व्यवहारात मात्र आज सावध राहा.

कन्या
आजचा दिवस फायदेशीर असेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला काहीतरी नवीन करून दाखवण्याची संधी मिळेल. आज तुम्हाला अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता आहे. कामाच्या दृष्टीने आजचा दिवस फायदेशीर ठरू शकतो.

तूळ
आज कुटुंबात शुभ कार्य ठरण्याची शक्यता आहे. तुमच्या गोड बोलण्याने मधुर स्वभावाने तुम्ही लोकांना तुमच्याकडे आकर्षित कराल. आज तुम्हाला कर्तव्यापेक्षा भावनांना जास्त महत्त्व द्यावे. पैशांच्या बाबतीत जपून राहा आणि खर्चावर नियंत्रण ठेवा.

वृश्चिक
आज तब्येतीच्या तक्रारी जाणवू शकतात. घरात कदाचित किरकोळ वाद निर्माण होऊ शकतो. आजचा दिवस ताळमेळ आणि सहकार्याचा आहे. तुमच्या मेहनतीचं चीज होण्याचा आजचा दिवस आहे. आज प्रतिष्ठित व्यक्तींशी तुमची भेट होऊ शकते.

धनु
आज तुम्ही कुटुंबासोबत खास वेळ घालवाल, यामुळे तुम्हाला एक नवीन ऊर्जा मिळेल. तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा खूपच मजबूत होईल. आज जोखीम घेणे टाळा.

मकर
आज पैशाशी संबंधित निर्णय घेताना साधवगिरी बाळगा. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल, मात्र त्यासाठी संयम लागेल. कामात तुम्हाला क्रिएटिव्हिटी दाखवण्याची संधी मिळेल. नवीन नोकरीची संधी मिळू शकते.

कुंभ
आज आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी संवाद वाढवा. आज अचानक जवळच्या लोकांशी अनपेक्षित भेट होऊ शकते. विद्यार्थ्यांकडून करिअरबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

मीन
करिअरमध्ये नवीन कल्पनांमुळे चांगल्या संधी चालून येतील. महिलांना कुटुंबात तडजोडीचे धोरण स्वीकारावे लागेल. आजचा दिवस पैशांशी संबंधित गोष्टींसाठी लाभदायक असेल. कायदेशीर कामात यश मिळण्याची शक्यता आहे. प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अनेक जवळच्या लोकांची मदत होईल.

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!

📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा

Related Articles

राशीभविष्य

Horoscope : जाणून घ्या तुमचे आजचे राशिभविष्य

28 मार्च शनिवार. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाचा दहावा दिवस आहे. शनिवार हनुमानजींचा...

राशीभविष्य

Horoscope : आजचा दिवस ‘या’ राशींसाठी लाभदायक

आज 21 मार्च शनिवार तर आज चैत्र नवरात्रातील तिसरा दिवस असून आज...

राशीभविष्य

Horoscope : आजचा दिवस मेष ते मीन राशींसाठी कसा असेल?

आज 13 मार्च शुक्रवार. आजचा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित असून आजच्या दिवशी...

राशीभविष्य

Horoscope : फेब्रुवारीचा शेवटचा दिवस ‘या’ राशींसाठी ठरणार विशेष

आज २८ फेब्रुवारी शनिवार. शनिवार हा हनुमान आणि शनिदेव यांना समर्पित असलेला...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!