सध्या इस्राएल अमेरिका विरुद्ध इराण यांच्यात चालू असलेल्या युद्धाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. मुख्य म्हणजे या युद्धामध्ये इराणचे मुख्य नेते ८६ वर्षीय अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. कोण आहेत अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण जगाला मोठा धक्का बसला आहे. खामेनेई यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यही मारले गेले आहेत. सगळीकडे या बातमीने एकच खळबळ उडाली आहे. सध्या इराणमध्ये ४० दिवसांचा सार्वजनिक दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. खामेनेईंच्या निधनामुळे मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप आला आला आहे. आता इराणचे काय होणार याकडे सर्वांते लक्ष लागले आहे. (Ali Khamenei)
इराणच्या इस्लामिक गणराज्यात ‘सुप्रीम लीडर’ हे सर्वोच्च पद मानले जाते. देशाच्या परराष्ट्र धोरणापासून संरक्षण, न्यायव्यवस्था आणि माध्यमांपर्यंत सर्व महत्त्वाच्या निर्णयांवर अंतिम अधिकार सुप्रीम लीडरकडे असतो. अनेक दशकांपासून खामेनेई यांनी इराणच्या धार्मिक व्यवस्थेचं नेतृत्व केलं आणि देशाच्या राजकीय निर्णयांवर ठोस प्रभाव दाखवला. खामेनेई यांचा जन्म १९ एप्रिल १९३९ रोजी इराणच्या मशहद शहरात झाला. त्यांचे वडील सय्यद जावेद खामेनेई एक धार्मिक मौलवी होते तर आई खदिजेह मिरदामादी एका पारंपरिक, सुशिक्षित कुटुंबातील होत्या. ते आठ भावंडांमध्ये दुसरे होते. त्यांचं कुटुंब साधं होतं, पण घरात धार्मिक वातावरण होतं. याच वातावरणाने त्यांच्या विचारांना दिशा दिली. (Marathi)
खामेनेई यांनी वयाच्या चौथ्या वर्षी ‘मकतब’मध्ये शिक्षण सुरू केले. त्यांनी मशहदमध्ये प्राथमिक आणि उच्च धार्मिक शिक्षण घेतलं. १९५८ मध्ये ते ‘कोम’ शहरात गेले, जे शिया इस्लामिक शिक्षणाचं मोठं केंद्र मानलं जातं. इथे त्यांनी सय्यद हुसेन बोरुजेर्दी आणि रुहोल्लाह खोमेनी यांसारख्या विद्वानांच्या वर्गात शिक्षण घेतलं. शिक्षण पूर्ण करून ते ‘मुजतहिद’ बनले, म्हणजेच इस्लामिक कायद्याचे तज्ज्ञ झाले. अली खामेनेई यांनी ४ जून १९८९ पासून २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत इराणचे दुसरे सुप्रीम लीडर म्हणून काम केले. सुप्रीम लीडर बनण्यापूर्वी, ते १९८१ ते १९८९ पर्यंत इराणचे अध्यक्ष होते. (Todays Marathi Headline)

खामेनेई हे १९७९ च्या क्रांतीतील एक महत्त्वाचे नेते आणि रुहोल्लाह खोमेनी यांचे जवळचे विश्वासू होते. १९८१ मध्ये झालेल्या एका हत्येच्या प्रयत्नातून ते वाचले, पण त्यात त्यांचा उजवा हात लुळा पडला. त्यांच्या राजवटीत इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) मजबूत झाली, त्यांनी ‘अॅक्सिस ऑफ रेझिस्टन्स’ला पाठिंबा दिला आणि इराणच्या अणुकार्यक्रमाला गती दिली. त्यांच्या शासनाकाळात इराणचं प्रादेशिक धोरण आक्रमक मानलं गेलं. इस्रायल आणि अमेरिकेसोबतचे संबंध ताणले गेले. त्यांचे समर्थक म्हणतात की त्यांनी देशाची सार्वभौमता मजबूत केली, तर टीकाकारांच्या मते त्यांच्या काळात राजकीय स्वातंत्र्यावर गदा आली. २०२६ मध्ये झालेल्या कथित अमेरिका-इस्रायल एअरस्ट्राईकमधील त्यांच्या मृत्यूने प्रादेशिक राजकारणात आणखी अस्थिरता निर्माण केली. (Latest Marathi Headline)
खामेनेई यांचे खासगी आयुष्य अत्यंत गोपनीय आहे. त्यांनी १९६४ मध्ये फक्त एकच लग्न केले, त्यांच्या पत्नीचे नाव मन्सूरी खोजस्ते बाघेरझादेह आहे. ७८ वर्षीय मन्सूरी यांचा जन्म १९४७ मध्ये मशहद शहरातील एका धार्मिक फारसी कुटुंबात झाला. त्यांचे वडील मोहम्मद इस्माईल खोजस्ते बाघेरझादेह हे व्यवसायी होते, तर भाऊ हसन खोजस्ते बाघेरझादेह यांनी इराण ब्रॉडकास्टिंग (IRIB) मध्ये उपनिदेशकासारखी पदे भूषवली. मन्सूरी इस्लामचे काटेकोर पालन करतात आणि फारसी वंशाच्या आहेत. त्या सार्वजनिक जीवनापासून दूर राहतात, पण खामेनेई यांच्याशी त्यांचे नाते मजबूत मानले जाते. या दोघांना सहा मुलं आहेत मुस्तफा, मोजतबा, मसूद, मायसम ही चार मुलं तर होदा आणि बोशरा या दोन मुली. (Top Trending News)
=========
America’s Area 51: अमेरिकेनं जगापासून लपवलेलं एक सत्य
=========
फोर्ब्स आणि इतर अहवालांनुसार, खामेनेईंच्या नियंत्रणाखालील नेटवर्कची किंमत २०० अब्ज डॉलरपर्यंत असू शकते. ही संपत्ती अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या संपत्ती पेक्षा ही जास्त आहे. खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये सत्तेसाठी जोरदार लढाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खामेनेई त्यांचा मुलगा मोजतबा खामेनेई याला सर्वोच्च नेते म्हणून नियुक्त केले जाऊ शकते, अशी जोरदार चर्चा आहे. मात्र, यासोबतच अयातुल्ला अलीरेझा अराफी आणि मोहसेन अराकी यांसारखी दिग्गज नावेही शर्यतीत आहेत. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
- Ali Khamenei
- Ali Khamenei death
- Cleric and former President of Iran
- iran leader Ali Khamenei
- irans supreem leader Ali Khamenei
- know about Ali Khamenei
- who is Ali Khamenei
- अमेरिका इस्राएल विरुद्ध इराण
- अयातुल्ला अली खामेनेई
- अयातुल्ला अली खामेनेई निधन
- अयातुल्ला अली खामेनेई माहिती
- इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनेई?
- कोण होते अयातुल्ला अली खामेनेई?
- सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनेई