Home आंतरराष्ट्रीय American Soldiers: अमेरिकन सैनिकांचे मानसिक खच्चीकरण…
आंतरराष्ट्रीय

American Soldiers: अमेरिकन सैनिकांचे मानसिक खच्चीकरण…

0

अमेरिका आणि इराण यांच्यामधील युद्ध कधीही सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासाठी अमेरिकेने इराणची नाकेबंदी करण्यासाठी आधुनिक युद्धनौकांद्वारे इराणच्या समुद्री सीमा बंद करण्याचा प्रयत्न केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या नागरिकांना, “मी तुमच्यासोबत आहे, आपण कधीही खामेनींचे सरकार उलथून टाकू,” असा संदेश दिला आहे. मात्र ट्रम्प एकीकडे युद्धाची भाषा करत असताना अमेरिकन सैनिकांचे मत युद्धाच्या विरोधात असल्याचे समोर येत आहे. फार काय, अमेरिकेचे सर्वोच्च लष्करी अधिकारी आणि जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफचे अध्यक्ष जनरल डॅन केन यांनी राष्ट्रीय सुरक्षा टीमला इराणविरुद्ध मोठी लष्करी कारवाई अमेरिकेला दीर्घ आणि गुंतागुंतीच्या युद्धात अडकवू शकते, असा इशारा दिला आहे. या सर्व परिस्थितीत अमेरिकन सैनिकांचे मानसिक खच्चीकरण होत असल्याचे दिसत आहे. अमेरिकेने आपले सर्वात आधुनिक विमानवाहू जहाज यूएसएस जेराल्ड आर. फोर्ड मध्यपूर्वेत पाठवले आहे. मात्र या जहाजावर तैनात असलेल्या सैनिकांवर मानसिक ताण प्रचंड वाढला आहे.

यातील काही सैनिक वर्षभरापासून त्यांच्या कुटुंबियांपासून दूर आहेत. त्यातच इराणबरोबर युद्ध सुरू झाल्यास आणखी काही महिने कुटुंबियांना भेटता येणार नाही, याची जाणीव त्यांना आहे. या सर्वांमध्ये या आधुनिक युद्धनौकेवर शौचालयांची स्थितीही गंभीर झाली आहे. सैनिकांना शौचालय वापरण्यासाठी ४० ते ४५ मिनिटे रांगेत उभे राहावे लागत आहे. या सर्वांमुळे त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होत आहे. इराणला धडा शिकवण्यासाठी उत्सुक असलेल्या ट्रम्प यांच्यासाठी या सैनिकांनी आता “युद्ध नको” असा अप्रत्यक्ष संदेश दिला आहे. अमेरिका इराणवर कधीही हल्ला करेल, अशी अटकळ व्यक्त होत असताना अमेरिकन सैनिकांमध्ये मात्र प्रचंड अस्वस्थता आहे. इराणवरील संभाव्य कारवाईसाठी मध्यपूर्वेत पोहोचलेल्या अमेरिकन मरीनसमोरील समस्या वाढल्या आहेत. त्याचा तिथे तैनात असलेल्या सैनिकांच्या मनस्थितीवर परिणाम झाला आहे. गेल्या वर्षापासून हे सैनिक आपल्या कुटुंबांपासून दूर आहेत. युद्ध सुरू झाल्यास त्याचा शेवट लवकर होणार नाही, अशी भीती त्यांना वाटते. त्यामुळेच “युद्ध नको” असा सूर उमटत आहे.

यूएसएस जेराल्ड आर. फोर्ड ही अमेरिकन नौदलाची सर्वात मोठी आणि आधुनिक युद्धनौका आहे. गेल्या आठ महिन्यांपासून ही युद्धनौका एकाच ठिकाणी तैनात असून तिची मुदतही वाढवण्यात आली आहे. या युद्धनौकेवर सुमारे पाच हजार सैनिक तैनात असून त्यामध्ये महिला सैनिकांचीही मोठी संख्या आहे. ही विमानवाहू नौका गेल्या वर्षी जूनपासून समुद्रात आहे. जेराल्ड आर. फोर्डला प्रथम भूमध्य समुद्रात पाठवण्यात आले, नंतर कॅरिबियन मोहिमेसाठी वळवण्यात आले. त्यानंतर पुन्हा अटलांटिक ओलांडून तिला मध्यपूर्वेकडे पाठवण्यात आले असून इराणला रोखण्यासाठी ती तैनात आहे. या जहाजावरील सैनिकांची तैनाती सामान्यतः सहा महिन्यांसाठी असते; मात्र ती मुदत उलटून गेली आहे. इराणविरुद्ध युद्ध सुरू झाल्यास आणखी काही महिने या जहाजावरील सैनिकांना तिथेच राहावे लागणार आहे. त्यामुळे त्यांच्यात अस्वस्थता वाढली आहे. अनेक सैनिक मानसिक ताणाखाली आहेत. काही सैनिकांच्या घरी लहान बाळाचा जन्म झाला आहे, तर काहींच्या प्रियजनांचा मृत्यू झाला आहे. अशा वेळी कुटुंबासोबत नसल्याची खंत त्यांना जाणवत आहे.

=======

हे देखील वाचा : El Mencho: ड्रग्ज माफियाला प्रेयसीनं दिला दगा

=======

जेराल्ड आर. फोर्ड ही युद्धनौका अत्यंत संवेदनशील असल्याने तिची माहिती गुप्त ठेवली जाते. त्यामुळे या जहाजावरील सैनिकांना कुटुंबीयांशी सातत्याने संपर्क साधणे शक्य होत नाही. या सर्वांमध्ये जहाजावरील सोयीसुविधांवरही परिणाम होत आहे. सध्या या आधुनिक जहाजावर शौचालयांची कमतरता भासत असल्याची माहिती आहे. जहाजावर सांडपाण्याची समस्या गंभीर झाली आहे. जहाजावर सुमारे ६५० शौचालये असून त्यामध्ये व्हॅक्यूम तंत्रज्ञानाचा वापर केला जातो; मात्र तांत्रिक बिघाडामुळे त्यापैकी अनेक शौचालये वापरण्यायोग्य राहिलेली नाहीत. परिणामी, शौचालय वापरण्यासाठी सैनिकांना किमान ४५ मिनिटे रांगेत उभे राहावे लागत आहे. जेराल्ड आर. फोर्ड हे जहाज सुमारे १३ अब्ज डॉलर्स खर्चून बांधण्यात आले आहे आणि ते अमेरिकन इतिहासातील सर्वात महागडे विमानवाहू जहाज मानले जाते. मात्र त्यातील वाढत्या समस्यांमुळे अमेरिकेच्या सैन्य प्रमुखांनाही चिंता वाटू लागली आहे. अमेरिकेचे सर्वोच्च लष्करी अधिकारी आणि जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफचे अध्यक्ष जनरल डॅन केन यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षा टीमला इराणवर हल्ला करणे म्हणजे व्हेनेझुएलामध्ये कारवाई करणे नव्हे; असे युद्ध झाल्यास अमेरिकन सैनिकांच्या मनस्थितीची विशेष काळजी घ्यावी लागेल, असा सल्ला दिला आहे.

– सई बने

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

Katrina Kaif
आंतरराष्ट्रीय

Jiang Xueqin : चीनच्या नॉस्ट्राडॅमसने सांगितले ट्रम्पचे भविष्य

अमेरिका-इराण युद्धामध्ये पंधरा दिवसांचा विराम आला आहे. यात चीनची भूमिका असल्याची माहिती...

Jewellery
आंतरराष्ट्रीय

Jared Kushner : ट्रम्पचा जावई आहे तरी कोण

अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धावर कायमचा विराम आणण्यासाठी पाकिस्तानची राजधानी...

Mobile
आंतरराष्ट्रीय

First Lady Melania Trump : अमेरिकेच्या फर्स्ट लेडीसाठी शाही सवारी

इराणमध्ये सत्तांतर करण्याच्या हेतूने अमेरिकेने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणविरुद्ध लष्करी मोहीम...

आंतरराष्ट्रीयगाजावाजा स्पेशल

US-Iran War : अमेरिका नमली की इराण घाबरलं ?

America, Israel आणि Iran यांचे युद्ध गेले ४० दिवस चालू आहे. रोजच्या...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!