अमेरिकेमधील एरिया ५१ या ठिकाणाचा सर्वात जास्त शोध घेतला जातो. सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो नागरिक एरिया ५१ चे रहस्य काय आहे, हे उलगडण्याचा प्रयत्न करत आहेत. यामागे परग्रही हे मूळ कारण आहे. कारण अमेरिकेच्या सैन्याने परग्रहींची गुप्त माहिती याच एरिया ५१ मध्ये ठेवल्याची चर्चा आहे. शिवाय येथेच परग्रहींच्या यानावर संशोधन चालू असल्याचेही सांगितले जाते. आता याच एरिया ५१ बाबत एका मुलाखतीमध्ये अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी परग्रही नक्कीच आहेत, पण ते एरिया ५१ मध्ये नाहीत. त्यांना कुठे ठेवण्यात आले आहे, याची मला कल्पना नसल्याचे विधान केले. बराक ओबामा यांच्या या विधानाने मोठी खळबळ उडाली. कारण ओबामा अध्यक्ष असताना त्यांनी परग्रही एरिया ५१ मध्ये असल्याचे सूचित केले होते, अशी चर्चा होती. ( America’s Area 51 )

आता त्यांनी परग्रही अस्तित्वात असल्याचे मान्य केले, मात्र एरिया ५१ बाबत ठाम नकार दिला. त्यांच्या या विधानानंतर अमेरिकेचे सध्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जोरदार आक्षेप नोंदवला. आणि ट्रम्प गप्प बसणारे नव्हते. त्यांनी यूएफओ आणि परग्रहींबाबतची सर्व माहिती जाहीर करण्याचे आदेश दिले. या सर्वामुळे अमेरिकेने खरोखरच परग्रहींना लपवून ठेवले आहे का, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. “एलियन खरे आहेत” या बराक ओबामा यांच्या विधानानंतर ट्रम्प यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. शिवाय परग्रहींबाबतची सर्व माहिती सार्वजनिक करण्याचे आदेश दिले. हे प्रकरण ओबामा यांच्या एका मुलाखतीपासून सुरू झाले. पॉडकास्ट होस्ट ब्रायन टायलर कोहेन यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये ओबामा यांना परग्रही खरोखर अस्तित्वात आहेत का, असा प्रश्न विचारण्यात आला.
यावर ओबामा म्हणाले, “ते खरे आहेत, परंतु मी त्यांना पाहिले नाही आणि त्यांना एरिया ५१ मध्ये ठेवण्यात आलेले नाही.” ओबामा यांनी यापूर्वीही अमेरिकेच्या ताब्यात काही परग्रही असल्याचे संकेत दिले होते. मात्र या मुलाखतीत पुन्हा परग्रही असल्याचे कबूल केल्यामुळे त्यांच्यावर परग्रही दाखवण्याचा दबाव वाढू लागला. या सर्वात एरिया ५१ चा अनेक वेळा उल्लेख करण्यात आला. एरिया ५१ हा अमेरिकेच्या नेवाडा वाळवंटात स्थित एक अत्यंत गुप्त अमेरिकन हवाई दलाचा तळ आहे. अनेक दशकांपासून ही जागा यूएफओ आणि परग्रहींच्या कथांसाठी प्रसिद्ध आहे. यावर अनेक चित्रपट तयार झाले असून पुस्तकेही लिहिली गेली आहेत. बर्याच वेळा येथे रात्री रहस्यमय प्रकाश दिसल्याचे दावे करण्यात येतात. मात्र हा लष्करी हवाई तळ असल्याने काही हवाई दलाच्या कारवाया येथे होतात, असे अधिकृत स्पष्टीकरण देण्यात येते. त्यामुळे अमेरिकेत एरिया ५१ बाबत मोठी उत्सुकता आहे. ( America’s Area 51 )
=======
हे देखील वाचा : Kim Yo Jong : सत्तेसाठी क्रूर हुकूमशहाविरुद्ध उभी राहिली बहिण
=======
ओबामा यांनी एरिया ५१ चा उल्लेख केल्यानंतर ट्रम्प चिडले. त्यांनी या ठिकाणाशी संबंधित गुप्त फायली जाहीर करण्याची घोषणा केली. संघीय एजन्सींना त्यांनी परग्रही आणि यूएफओ संदर्भातील सर्व सरकारी माहिती जाहीर करण्याचे आदेश दिले. ट्रम्प यांनी पेंटागॉनचे प्रमुख पीट हेगसेथ आणि इतर एजन्सींना माहिती सार्वजनिक करण्याचे निर्देश देत, हे प्रकरण “अत्यंत मनोरंजक आणि महत्त्वाचे” असल्याचे म्हटले. ट्रम्प यांच्या या आदेशाचे अमेरिकेतील तरुण वर्गाने उत्साहात स्वागत केले. त्यांच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल झाले. त्यात ट्रम्प यांना परग्रहींबरोबर दाखवण्यात आले. काही मीम्समध्ये एपस्टाईन फाईल्सपासून लोकांचे लक्ष वळवण्यासाठी परग्रही ट्रम्प यांच्या मदतीला येणार असल्याचेही दाखवण्यात आले. मात्र राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव सर्व फायली जाहीर होतील का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. एरिया ५१ मध्ये परग्रहींच्या नावाखाली अमेरिकेने अनेक गुप्त लष्करी मोहीमा राबवल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे या सर्वांवरून आता खरोखर पडदा उठणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. ( America’s Area 51 )
सई बने
- alien existence claim
- alien spacecraft rumors
- Area 51 mystery
- Barack Obama interview
- Brian Tyler Cohen podcast
- classified military operations
- conspiracy theories America
- declassified documents demand
- Donald Trump reaction
- Epstein files distraction theory
- extraterrestrial life debate
- federal agency transparency
- global curiosity about aliens.
- hidden extraterrestrial evidence
- national security concerns
- Nevada secret base
- Pentagon files release
- political controversy USA
- secret defense research
- social media speculation
- UFO disclosure order
- unidentified flying objects
- US government secrecy
- US intelligence agencies
- young voters reaction