Home आंतरराष्ट्रीय Epstein Files: एपस्टाईन फाईलमध्ये चक्क करीनाचे नाव
आंतरराष्ट्रीय

Epstein Files: एपस्टाईन फाईलमध्ये चक्क करीनाचे नाव

2

जेफ्री एपस्टाईन हे नाव आलं की सध्या युरोप-अमेरिकेमध्ये अनेकांच्या कपाळाला आढ्या पडत आहेत. पण आता या फाईलमध्ये असे एक नाव पुढे आले आहे की, तमाम भारतीयांची उत्सुकता ताणली गेली. अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणा-या या एपस्टाईनची प्रेयसी असलेल्या या करीनाच्या नावावर एपस्टाईननं आपली बहुतांश इस्टेट करुन ठेवली आहे. एवढेच नाही तर या करीनाच्या नावावर करोडो रुपयांची किंमत असलेला हिराही ठेवला आहे. अर्थात ही करीना म्हणजे, करीना कपूर खान ही भारतीय अभिनेत्री नसून एपस्टाईनची प्रेयसी असलेल्या करीनाचे पूर्ण नाव करीना शुलियाक आहे. अनेक तरुणींचे आय़ुष्य उद्धवस्त करणारा एपस्टाईन या करीनासोबत विवाहही करणार होता. त्यासाठीच त्यानं त्याच्या संपत्तीमधील मोठा भाग करीनाच्या नावावर केली होता. एपस्टाईन फाईलमधून हा धक्कादायक खुलासा झाल्यावर करीना शुलियाक कोण आहे, याची चौकशी सुरु झाली आहे. ( Epstein Files )

एपस्टाईन फाईलमधून रोज कुठले ना कुठले खुलासे होत आहेत. यातून युरोप अमेरिकेतील अनेक प्रतिष्ठितांचा काळा चेहरा उघड होत आहे. पण आता याच एपस्टाईन फाईलमधून जेफ्री एपस्टाईन सुखी वैवाहिक आयुष्याचे स्वप्न बघत होता हेही उघड झाले आहे. अनेक अल्पवयीन मुलींना आयुष्यातून उठवणारा हा जेफ्री नावाचा राक्षस एका करीना नावाच्या तरुणीच्या प्रेमात पडला होता. जेफ्री या करीनाच्या प्रेमात इतका होता की, त्यानं त्याच्या मालमत्तेमध्ये सर्वात मोठी वारस म्हणून या करीनाचे नाव टाकले आहे. जेफ्री एपस्टाईनच्या मृत्यूच्या फक्त दोन दिवस आधी म्हणजे, ८ ऑगस्ट २०१९ रोजी स्थापन झालेल्या ट्रस्टमध्ये जेफ्रीने आपली संपत्ती याच करीनाच्या नावावर केली आहे. एपस्टाईनच्या जन्मवर्षावरून या ट्रस्टचे ‘१९५३ ट्रस्ट’ असे नाव ठेवण्यात आले आहे.

आत्तापर्यंत जेफ्री एपस्टाईनची किती संपत्ती आहे, याचे मोजमाप करता आलेले नाही. जेफ्रीच्या नावावर एक अख्खे बेट आहेच, पण त्याचे युरोपमधील अनेक देशांसह दुबईमध्येही मोठी संपत्ती असल्याची माहिती आहे. या सर्व स्थावर मालमत्तेची विक्री करण्यात आली आहे. २०१९ मध्ये एपस्टाईनचा फेडरल तुरुंगात मृत्यू झाला. त्यावेळी, एपस्टाईनच्या इस्टेटची किंमत अंदाजे ५,००० कोटींपेक्षा जास्त होती. या संपत्तीसाठी एपस्टाईनने त्याची प्रेयसी, करीना शुलियाक, हिचे नाव प्राथमिक लाभार्थी म्हणून दिले होते. करीना ही बेलारूसमधील ३६ वर्षीय दंतचिकित्सक आहे. करीना आणि जेफ्री यांची २०१२ मध्ये भेट झाली होती. त्यानंतर जेफ्रीनं अनेकवेळा करीनीच्या दंतविद्यालयाला मदत केल्याचेही उघड झाले आहे. एपस्टाईनचा तुरुंगातून शेवटचा फोनही याच करीनाला गेला होता. करीनासोबत लग्न करण्याच्या तयारीत असलेल्या जेफ्रीनं तिच्यासाठी ३३ कॅरेटचा हिरा देखिल खरेदी केला होता. जेफ्रीच्या नोंदिनुसार करीनाला ८४० कोटी मिळणार होते. सोबत एपस्टाईनच्या एका घराचाही समावेश आहे. जेफ्री आणि करीनानंतर याच घरात रहाण्याचा विचार करत असल्याची माहिती आहे. ( Epstein Files )

करीना शुलियाक सोबत एपस्टाईनच्या ट्रस्टमध्ये एकूण अंदाजे ४० ते ४३ लाभार्थींची यादी असून यातील काही नावे गुप्त ठेवण्यात आली आहे. ज्या लाभार्थींची नावे उघड झाली आहेत, त्यामध्ये एपस्टाईनचे दीर्घकाळचे वकील डॅरेन इंडाइक यांचे नाव आहे. डॅरेन यांच्या नावे ५० दशलक्ष रुपये ठेवलेले आहेत. त्यानंतर इन-हाऊस अकाउंटंट रिचर्ड कान यांना २५ दशलक्ष आहेत. तर एपस्टाईनचा भाऊ मार्क एपस्टाईन यांना १० दशलक्ष ठेवलेले आहेत. एपस्टाईनच्या सर्व काळ्याकृत्यामधील साथीदार असलेल्या घिसलेन मॅक्सवेल साठी एपस्टाईनने १० दशलक्ष ठेवले आहेत. घिसलेनला २०२१ मध्ये एपस्टाईनसोबत अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणात सहभागी झाल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले असून तिला २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे.

=======

हे देखील वाचा : Gates & Epstein Friendship : गेट्स पती पत्नींमधील तो तिसरा….

=======

सोबतच एपस्टाईननं हार्वर्ड विद्यापीठातील गणिताचे प्राध्यापक मार्टिन नोवाक यांना ५ दशलक्ष डॉलर्स ठेवले आहेत. त्यामुळे प्राध्यापक मार्टिन नोवाक यांचा नेमका संबंध काय, याचीही चर्चा सुरु झाली आहे. एपस्टाईनच्या जवळच्या सहका-यांच्या नावानं या ट्रस्टमध्ये आर्थिक तरतूद कऱण्यात आली आहे. ट्रस्टच्या कर्मचा-यांसाठीही आर्थिक तरतूद आहे. मात्र २०० हून अधिक मुलींचे आयुष्य एपस्टाईननं उद्धवस्त केले, त्यांच्या नावानं त्यानं काहीही ठेवलेले नाही. तथापि, एपस्टाईनच्या मृत्यूनंतर त्याच्या मालमत्तेतून लक्षणीय रक्कम काढून घेण्यात आली आहे. पीडितांना भरपाई म्हणून १२१ दशलक्ष डॉलर्स देण्यात आले आहेत. वैयक्तिक वसाहतींवर ४९ दशलक्ष डॉलर्स खर्च करण्यात आले. याव्यतिरिक्त, कर, कायदेशीर शुल्क आणि इतर खर्चामुळे एपस्टाईनच्या मालमत्तेत लक्षणीय घट झाल्याची माहिती आहे. ( Epstein Files )

सई बने

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

Katrina Kaif
आंतरराष्ट्रीय

Jiang Xueqin : चीनच्या नॉस्ट्राडॅमसने सांगितले ट्रम्पचे भविष्य

अमेरिका-इराण युद्धामध्ये पंधरा दिवसांचा विराम आला आहे. यात चीनची भूमिका असल्याची माहिती...

Jewellery
आंतरराष्ट्रीय

Jared Kushner : ट्रम्पचा जावई आहे तरी कोण

अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धावर कायमचा विराम आणण्यासाठी पाकिस्तानची राजधानी...

Mobile
आंतरराष्ट्रीय

First Lady Melania Trump : अमेरिकेच्या फर्स्ट लेडीसाठी शाही सवारी

इराणमध्ये सत्तांतर करण्याच्या हेतूने अमेरिकेने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणविरुद्ध लष्करी मोहीम...

आंतरराष्ट्रीयगाजावाजा स्पेशल

US-Iran War : अमेरिका नमली की इराण घाबरलं ?

America, Israel आणि Iran यांचे युद्ध गेले ४० दिवस चालू आहे. रोजच्या...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!