Home लाईफ स्टाईल Vastu Tips : घ्ररात वास्तुदोष असल्यास नक्कीच करून बघा ‘हे’ सोपे फायदेशीर उपाय
लाईफ स्टाईल

Vastu Tips : घ्ररात वास्तुदोष असल्यास नक्कीच करून बघा ‘हे’ सोपे फायदेशीर उपाय

0

अनेकांच्या घरामध्ये सतत वाद होत असतात, सतत आजारपण येत असते, घरात प्रसन्न वाटत नाही, नकारात्मक ऊर्जा असल्याची भावना मनामध्ये असते, आर्थिक अडचणी, आर्थिक नुकसान आदी विविध प्रकारच्या समस्या असतात. यावर बरेच उपाय करून देखील आपल्याला काही अपेक्षित परिणाम दिसत नाही. मात्र तुम्हाला माहिती आहे का की या सर्व गोष्टी वास्तूदोष असल्याचे संकेत आहेत. जर तुमच्या वास्तूमध्ये काही दोष असेल तर या गोष्टी घडतात. वास्तुदोष दिसून येत नाही पण त्याचे संकेत मिळतात, जर हे संकेत तुम्ही वेळेवर ओळखले आणि त्यावर उपाय केले तर नक्कीच तुम्ही वास्तुदोषापासून मुक्ती मिळवू शकता. मुख्य म्हणजे घरात कोणत्याही प्रकारची तोडाफोड न करत ही तुम्ही वास्तुदोषांवर मात करू शकता. मग वास्तुदोष निवारण्यासाठी काय करावे? यावर कोणते उपाय आहेत? (Vastu Tips)

वास्तुदोष का होतो ?
घरात झाडूवर कधीही कोणतीही जड वस्तू ठेवू नये. तसेच, झाडू आदळून किंवा फेकून ठेवू नये. असं केल्याने वास्तुदोष लागू शकतो आणि घरात पैसा टिकणं बंद होते. वास्तुशास्त्रानुसार, तुटलेली भांडी, पलंग किंवा फर्निचर वापरणं चांगलं मानलं जात नाही. घरात ठेवलेल्या तुटलेल्या वस्तू वास्तुदोषाचं कारण बनू शकतात. यामुळे पैशाचं नुकसान होतं आणि पैसा टिकणं बंद होते. कधीही सूर्योदय झाल्यानंतर झोपत राहू नये. असं केल्याने वास्तुदोष निर्माण होऊ शकतो आणि पैशाचं नुकसान होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे नेहमी सूर्योदयापूर्वी उठून जावं. वास्तुशास्त्रानुसार, घराच्या देवघरात कधीही सुकलेली फुलं किंवा हार ठेवू नयेत. असं केल्याने अशुभ फळ मिळतं. त्यामुळे देवी-देवतांना वाहिलेली फुलं आणि हार दुसऱ्या दिवशी देवघरातून काढून टाकावीत. (Religious)

वास्तुदोष दूर करण्यासाठी सोपे उपाय
– वास्तूदोष दूर करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे घरात झाडे लावावी. घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी घरात तुळस, मनी प्लांट, कडूलिंबाचे रोप लावावे. (Marathi)
– स्वयंपाकघरासाठी दक्षिण-पूर्व हे सर्वोत्तम दिशा आहे. आणि उत्तर-पश्चिम दिशा यासाठी दुसरा पर्याय आहे. जर स्वयंपाकघर चुकीच्या जागेवर बांधलेलं असेल तर अग्निकोणात एक बल्ब लावून त्याला सकाळी आणि संध्याकाळी नक्कीच जाळावे.
– वास्तुदोष दूर करण्यासाठी तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या एका बाजूला केळीचं झाड आणि दुसऱ्या बाजूला तुळशीचे रोप लावा. हा उपाय केल्याने वास्तुदोषातून सुटका मिळू शकते. यामुळे घरातील वातावरण सकारात्मक राहते आणि कुटुंबातील सदस्यांमध्येही प्रेम टिकून राहते. या उपायामुळे तुम्हाला आयुष्यात प्रगती मिळू शकते. (Todays Marathi Headline)

Vastu Tips
– तुम्ही तुमच्या घरातील देवघरात स्फटिकाचे शिवलिंग आणून त्याची नियमितपणे पूजा करा. तसेच, पूजास्थळ नेहमी स्वच्छ ठेवा. तिथे घाण ठेवल्यास व्यक्तीला वास्तुदोषाचा सामना करावा लागू शकतो. वास्तुशास्त्रानुसार, घरात स्फटिकाचे शिवलिंग असल्यास सर्व प्रकारचे नकारात्मक प्रभाव नष्ट होतात आणि घरात सुख-समृद्धी वाढते. (Top Marathi News)
– घराच्या आग्नेय दिशेला पाण्याने भरलेले मातीचे भांडे ठेवल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल. घरामध्ये मीठ आणि तुरटी टाकून त्याची पुसणी केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.
– धार्मिक ग्रंथांमध्ये वास्तूशास्त्राचे अनेक नियम सांगितले आहेत ज्यांचे पालन केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होईल. कडुलिंबाचे झाड मंगळ ग्रहाचा प्रभाव ठरवते. म्हणून, दक्षिण दिशेला एक मोठे कडुलिंबाचे झाड असावे. जर दक्षिणाभिमुखी घरासमोर दाराहून दुप्पट अंतरावर हिरवेगार कडुलिंबाचे झाड असेल किंवा घराच्या आकारापेक्षा दुप्पट आकाराचे दुसरे घर असेल तर ते दक्षिण दिशेचा प्रभाव नियंत्रित करते. (Latest Marathi Headline)
– वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजावर शेंदूर लावून नऊ बोटे लांब आणि नऊ बोटे रुंद स्वस्तिकाचे चिन्ह बनवा. असे केल्याने आजूबाजूला येणारी नकारात्मक ऊर्जा संपते आणि वास्तुदोषही दूर होतात. प्रत्येक मंगळवारी हा उपाय केल्याने मंगळ ग्रहाशी संबंधित दोषही दूर होतात.
– घरात पैसा येत असेल पण टिकत नसेल, तर मीठाचा एक छोटासा उपाय करू शकता. एका काचेच्या बरणीत समुद्री मीठ भरून त्यात एक-दोन लवंगा टाका. या उपायाने आर्थिक अडचणी दूर होऊ शकतात. यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहतो, ज्यामुळे समृद्धी येते.
– घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला तुपाचे दिवे ठेवल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते. जर तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एका भांड्यात पाणी ठेवले असेल आणि सकाळी ते पाणी घराबाहेर फेकून द्या. त्यामुळे कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारते. घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी घराच्या नैऋत्य दिशेला दिवा लावणे फायदेशीर ठरते. (Top Trending News)

========

Shivpuja : जाणून घ्या शिवपूजनात बेलपत्राचे महत्व

========
– आरोग्य संबंधित समस्यांपासून मुक्ती हवी असेल, तर आजारी व्यक्तीच्या डोक्याजवळ काचेच्या भांड्यात मूठभर मीठ ठेवा. त्यानंतर रोज हे मीठ बदला आणि वापरलेले मीठ नदीत किंवा नाल्यात फेकून द्या. हा उपाय सतत केल्याने फायदा दिसून येतो.
– घराची नियमित साफसफाई करून चारही बाजूने सुगंधीत वातावरण निर्मिति करण्यासाठी सुगंधाचा उपयोग करा. जिथे अस्वच्छता असते तिथे राहु हा ग्रह अशांत राहतो आणि जिथे दुर्गंधी असते तिथे शुक्र ग्रह अशांत राहतो खासकरुन टॉयलेट आणि बाथरूम स्वच्छ ठेऊन सुगंधीत करणे कधीही योग्य. (Social News)

(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

लाईफ स्टाईल

Gold : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याला एवढे महत्त्व का आहे?

आज अक्षय्य तृतीया. साडे तीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेचे ओळख...

Parshuram
लाईफ स्टाईल

Parshuram : भगवान परशुरामांबद्दलची रंजक तथ्ये

परशुराम यांना भगवान विष्णू यांचा सहावा अवतार समजले जाते. मान्यतेनुसार भगवान विष्णू...

लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला ‘ही’ कामे करून पुण्य कमवा

वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक...

लाईफ स्टाईल

Vallabhacharya : वल्लभाचार्य जयंती – कोण होते कृष्णभक्त वल्लभाचार्य?

आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची अकरावी तिथी अर्थात. आज चैत्र महिन्यातील एकादशीचा...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!