Home लाईफ स्टाईल Shivpuja : जाणून घ्या शिवपूजनात बेलपत्राचे महत्व
लाईफ स्टाईल

Shivpuja : जाणून घ्या शिवपूजनात बेलपत्राचे महत्व

0

आपण सर्वांनीच मोठ्या उत्साहाने महाशिवरात्रीचा मोठा सण साजरा केला. महाशिवरात्र म्हणजे शिव आणि पार्वतीच्या विवाहाचा सोहळ्याचा दिवस. दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री येते. या दिवशी शिवभक्त उपवास करतात, रात्रभर जागरण करतात आणि शिवलिंगाची विशेष पूजा करतात. शिवाच्या पूजेमध्ये सर्वात जास्त महत्त्व असते ते बेलपत्राला. त्रिदल असलेल्या बेलाच्या पानाशिवाय महादेवाची पूजा कधीच पूर्ण होत नाही. असे म्हटले जाते की, शंकराला केवळ मनोभावे बेलपत्र अर्पण करून त्यांची पूजा केली तरी आपली इच्छा पूर्ण होते. मात्र शंकराला बेल का वाहिला जातो याचे कारण तुम्हाला माहिती आहे का? (Shivpuja)

शिवाला बेल वाहण्यामागे एक आख्यायिका सांगितली जाते, समुद्र मंथनाच्या वेळी भगवान शीव यांनी विष प्राशन केले होते. तेव्हा त्यांच्या घश्यात जळजळ होऊ लागली. बेलाच्या पानामध्ये विष निवारक गुणधर्म आहेत म्हणून त्यांना डोक्यावर बेलाचे पान ठेवण्यात आले, जेणेकरून विषाचा प्रभाव कमी होईल. असे मानले जाते की तेव्हापासून भोलेनाथ यांना बेलाचे पान देण्याची परंपरा सुरू झाली. दुसर्‍या आख्यायिकेनुसार, बेलाच्या पानाची तीन पाने भगवान शिवच्या तीन डोळ्यांचे प्रतीक आहेत. म्हणजेच शिवचेच स्वरुप असलेले बेलाचे पान खूप पवित्र मानले जाते. (Marathi)

बेलाच्या पानामध्ये तीन पाने एकत्र जोडलेली आहेत. हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जाते. तसेच, बेलाच्या पानांचा संदर्भ बऱ्याच पुराणात केला आहे. पण त्याचे वैभव शिवपुराणात सविस्तरपणे सांगितले आहे. शिवपुराणात म्हटले आहे की बेलाचे पान हे भगवान शंकराचे प्रतीक आहे. देव स्वत: त्याच्या महिम्याचा स्वीकार करतात. असा विश्वास आहे की जो कोणी बेलाच्या झाडाच्या मुळाजवळ शिवलिंग ठेऊन भोलेनाथाची पूजा करतो तो नेहमी आनंदी असतो. त्याच्या कुटुंबावर कधीही संकट येत नाही. (Top Trending News)

Shivpuja

बेलपत्राच्या उत्पत्तीची एक कथा स्कंद पुराणात आढळून येते. एका पौराणिक कथेनुसार, एकदा पार्वती देवीच्या घामाचे काही थेंब पृथ्वीवर पडले आणि त्यातून बेलाच्या झाडाची निर्मिती झाली. बेलवृक्षाच्या मूळाशी गिरिजा देवी, खोडात महेश्वर देवी, फाद्यांमध्ये दक्षयायनी देवी, पानांमध्ये पार्वती देवी, फुलांमध्ये गौरी देवी आणि फळांमध्ये कात्यायणी देवीचा वास असतो, अशी मान्यता आहे. तसेच यामध्ये महालक्ष्मी देवीचा वास असतो, असेही सांगितले जाते. शिव-पार्वती पूजनात अर्पण केलेल्या बेलाच्या पानामुळे दोन्ही देवतांचे शुभाशिर्वाद लाभतात, अशी मान्यता आहे. (Top Marathi News)

भोलेनाथांना बेलाचे पान अर्पण करताना, ‘त्रिदल त्रिगुणाकार त्रिनेत्रं च त्रिधायुतम | त्रीजन्मपापसंहारम बिल्वपत्रं शिवार्पणम ‘ या पौराणिक मंत्राचा जप करा. या मंत्राचा अर्थ असा आहे की तीन गुण, तीन डोळे, त्रिशूल धारण करणारे आणि तीन जन्मांचे पाप नष्ट करणारे हे भगवान शिव, तुम्हाला तीन पाने असलेले बेलाचे पान अर्पण करतो. रुद्राष्टाध्यायी असलेला हा मंत्र म्हणत असतांना बेलाचे पान अर्पण करण्याचे विशेष महत्व आहे. (Latest Marathi Headline)

बेलाची पाने तोडताना शिवाचे नामस्मरण केले पाहिजे. याशिवाय, चतुर्थी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी, संक्रांत आणि अमावास्या या तिथींना तसेच सोमवारी बेलाची पाने तोडू नयेत, असे सांगितले जाते. तीन पान असलेलेच बेलपत्र शंकराला अर्पण करावे. मात्र, तीन पाने नसलेले बेलाचे पान शंकराला वाहू नये, असेही सांगितले जाते. शिवपुराणात सांगितले आहे की, जो व्यक्ती बेलाचे झाड लावतो, त्याची संतती वाढते. शिवाय जो व्यक्ती बेलाचे झाड तोडतो, त्या व्यक्तीला अनेक प्रकारच्या दु:खांचा सामना करावा लागतो. याशिवाय बेलाच्या झाडाखाली बसून भगवान भोलेनाथ किंवा शिवलिंगाची पूजा करणाऱ्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. (Top Stories)

======

Kedarnath : ‘या दिवशी उघडणार केदारनाथ मंदिराचे दरवाजे

======

शिवपुराणात असा उल्लेख आहे की, मृत व्यक्तीचा मृतदेह अंतिम संस्कारासाठी नेत असताना त्याला बेल वृक्षाच्या सावलीखालून नेले तर मोक्ष आणि शिवलोक प्राप्त होतो. यासोबतच पितरांचा आशीर्वाद मिळावा आणि पितृदोषापासून मुक्ती मिळण्यासाठी बेलाच्या झाडाला नियमित पाणी अर्पण करावे. धार्मिक मान्यतांनुसार, बेलाच्या झाडाची उत्पत्ती माता पार्वतीच्या घामापासून झाल्याचे मानले जाते. माता पार्वतीची सर्व रूपे बेल वृक्षात वास करतात, असे मानले जाते. बेल वृक्षाच्या पानांत माता पार्वती, देठांमध्ये माहेश्वरी, फुलांमध्ये गौरी, फांद्यांमध्ये दक्षिणायनी, मुळांमध्ये गिरजा, फळांमध्ये कात्यानी आणि संपूर्ण बेल वृक्षामध्ये देवी लक्ष्मी वास करते. (Social News)

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

लाईफ स्टाईल

Gold : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याला एवढे महत्त्व का आहे?

आज अक्षय्य तृतीया. साडे तीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेचे ओळख...

Parshuram
लाईफ स्टाईल

Parshuram : भगवान परशुरामांबद्दलची रंजक तथ्ये

परशुराम यांना भगवान विष्णू यांचा सहावा अवतार समजले जाते. मान्यतेनुसार भगवान विष्णू...

लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला ‘ही’ कामे करून पुण्य कमवा

वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक...

लाईफ स्टाईल

Vallabhacharya : वल्लभाचार्य जयंती – कोण होते कृष्णभक्त वल्लभाचार्य?

आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची अकरावी तिथी अर्थात. आज चैत्र महिन्यातील एकादशीचा...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!