जगातील मोठ्या देशांपैकी एक म्हणून कायमच भारताचे नाव घेतले जाते. भारताने आपल्या खास वैशिष्ट्यांमुळे, निसर्गामुळे जगभरातील लोकांच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. भारतात अशी अनेक ठिकाणं आहेत, जी पाहून लोकांना आश्चर्याचा धक्का बसला नाही तरच विशेष. भारतातील अनेक ठिकाणांपैकी एका अतिशय खास आणि वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणाबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आजवर आपण जगात अनेक ठिकाणी गरम पाण्याचे झरे, नदी, तलाव असल्याचे ऐकले असेल. आज आम्ही तुम्हाला अशाच एका ठिकाणाबद्दल सांगणार आहोत. मात्र एक ट्विस्ट आहे. आता तो काय ते जाणून घेऊया. (Tourism)
भारतातील सर्वात लोकप्रिय आणि जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणजे लेह आणि लडाख. येथील थंडी आणि निसर्ग पाहून सगळ्यांनाच त्याची भुरळ पडते. याच लडाखमध्ये एक ठिकाण आहे, जे सध्या चांगलेच लोकप्रिय होताना दिसत आहे. हे ठिकाण म्हणजे ‘चुमाथांग गाव’. लडाख मधील चुमाथांग गाव सध्या कमालीचे गाजत आहे. सोशल मीडियावर देखील हे गाव खूपच व्हायरल होत आहे. यांचे कारण म्हणजे या गावात असलेली गरम पाण्याची नदी. आता तुम्ही म्हणाल या जगात गरम पाण्याचे नैसर्गिक स्रोत तर अनेक आहेत यात काय वेगळे. या गरम पाण्याचे नदीचे वैशिष्ट्य म्हणजे ही नदी जिथे स्थित आहे, तो संपूर्ण परिसर थंड आहे. नदीच्या आजूबाजूला मायनसमध्ये तापमान जाते, तरीही ही नदी गरम पाण्याने वाहत असते. (Top Marathi News)

या नदीमध्ये असलेल्या गरम पाण्यातून सतत वाफा निघत असतात. नदीतले पाणी हे केवळ गरम नाही तर उकळते पाणी आहे. चुमाथांग गाव लेहपासून जवळपास १३८ किलोमीटर अंतरावर आहे. हा परिसर सल्फरने समृद्ध असलेल्या गरम पाण्याच्या झऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. शास्त्रज्ञांच्या मते, येथील भूऔष्णिक झरे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील ज्वालामुखीच्या क्रियेमुळे तयार होतात. पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली असलेली उष्णता पाणी गरम करते आणि हे पाणी झरे आणि नद्यांच्या स्वरूपात बाहेर पडतात. आजूबाजूचे तापमान मायनस असताना आणि बाजूला असलेले पर्वत बर्फाने झाकलेले असताना, देखील या नदीतून वाफ निघतच राहते. (Latest Marathi HEadline)
=========
Kalyana Sundareswarar Temple : रंग बदलणारे चमत्कारी शिवलिंग
=========
स्थानिक लोक सांगतात की हिवाळ्यातही या गरम पाण्यात आंघोळ करता येते. त्यामुळे घरगुती वापरासाठी वेगळे पाणी गरम करण्याची आवश्यकता राहत नाही. चुमाथांगचे गरम पाणी केवळ तापमानामुळेच नव्हे तर त्याच्या औषधी गुणधर्मांमुळेही प्रसिद्ध आहे. स्थानिकांचा विश्वास आहे की या सल्फरयुक्त पाण्यात असलेले खनिज घटक त्वचेशी संबंधित अनेक समस्यांवर उपयोगी ठरतात. त्वचेची अॅलर्जी, खाज, पुरळ, तसेच सांधेदुखीच्या त्रासात या झऱ्यांमध्ये स्नान केल्याने आराम मिळतो, असे मानले जाते. याच कारणामुळे दूर-दूरहून लोक येथे खास आंघोळीसाठी येतात. पर्यटकांसाठी चुमाथांग गावचा अनुभव अतिशय वेगळा असतो. एका बाजूला बर्फाच्छादित उंच पर्वतरांगा आणि दुसऱ्या बाजूला गरम पाण्याच्या प्रवाहातून उठणारी वाफ हे दृश्य खरंच एक वेगळा आणि सुखद अनुभव देणारे आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा केव्हा लडाखला जाल तेव्हा नक्कीच चुमाथांग गावाला भेट द्या. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics