पौर्णिमा ही हिंदू पंचांगानुसार शुक्ल पक्षातील १५ वी तिथी असते. या दिवशी चंद्र पूर्ण गोलाकार आणि प्रकाशित असतो. सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी आल्यावर सूर्य-पृथ्वी-चंद्र १८० अंशावर असतात, तेव्हा ही स्थिती निर्माण होते. दर महिन्याला येणारी पौर्णिमा धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते, ज्यामध्ये पूजा, उपवास आणि दान यांसारखे उपक्रम केले जाता. उद्या अर्थात १ फेब्रुवारी रोजी माघ महिन्यातील पौर्णिमा असणार आहे. हिंदू धर्मात माघ महिन्यातील पौर्णिमेचे विशेष महत्त्व आहे. (Magh Purnima)
या वर्षी माघ पौर्णिमा रविवार, १ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे. पंचांगानुसार, पौर्णिमा तिथी १ फेब्रुवारी रोजी सकाळी ०५.५२ वाजता सुरू होणार आहे आणि २ फेब्रुवारी रोजी दुपारी ०३.३८ पर्यंत असणार आहे. माघ पौर्णिमेला चंद्र संध्याकाळी ५ वाजून ४६ मिनिटांनी उगवेल. चंद्र उगवल्यानंतर चंद्राला अर्घ्य देण्याची प्रथा आहे. यावर्षीची माघ पौर्णिमा तर आणखी खास असणार आहे, कारण या दिवशी ‘रवि पुष्य योग’ नावाचा शुभ संयोग जुळून येत आहे. हिंदू धर्म ग्रंथांमध्ये सांगितले आहे की जगाचे पालन करता गंगेच्या पाण्यात राहतात यामुळेच माघ पौर्णिमेच्या दिवशी गंगेत स्थान केल्यास पुण्य प्राप्त होते. तसेच माघ पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेव आणि लक्ष्मीची ही पूजा केली जाते. (Marathi)
माघ महिन्यात ही पौर्णिमा येत असल्याने याला माघी पौर्णिमा असेही म्हणतात. प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी भगवान सत्यनारायण, देवी लक्ष्मी आणि चंद्रदेव यांची पूजा करण्याची परंपरा आहे. मात्र माघ महिना भगवान विष्णूला अतिशय प्रिय असल्याने या महिन्यातील पौर्णिमेचे महत्त्व अधिकच वाढते. या दिवशी पवित्र नदीत स्नान करून दान केल्याने बत्तीसपट पुण्य मिळते. म्हणून याला बत्तीसी पौर्णिमा असेही म्हणतात. मान्यता आहे की, या दिवशी गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या संगमात स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. तसेच, देवी लक्ष्मी, भगवान विष्णू आणि शंकराची पूजा केल्याने सुख-समृद्धी प्राप्त होते. (Todays Marathi Headline)

माघ पौर्णिमा पूजाविधी
माघ पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्मा मुहूर्तावर उठून सूर्योदयापूर्वी गंगेत स्नान करावे. गंगेत स्नान करणे शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करा. आंघोळीनंतर ॐ घृणि सूर्याय नमः या मंत्राचा उच्चार करताना सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. यानंतर लक्ष्मी-नारायणाची पूजा करा. देवाला हळदी-कुंकू, रोळी, फळे, फुले, पंचगव्य, सुपारी, दुर्वा इत्यादी वस्तू अर्पण करा. शेवटी आरती आणि प्रार्थना. दिवसभरात शक्य तितके दान करा. संध्याकाळी चंद्राला अर्घ्य अर्पण करावे. गंगा स्नानासोबतच माघ पौर्णिमेच्या दिवशी दान करणे हे खूप महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी वस्त्र, अन्न आणि गहू दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की माघ पौर्णिमेच्या दिवशी वस्त्र, अन्न आणि गहू दान केल्याने विष्णूंचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. (Top Marathi News)
माघ पौर्णिमा कथा
पौराणिक कथेनुसार, कांतिका नगरात धनेश्वर नावाचा ब्राह्मण राहत होता. मिळालेल्या दानावर तो आपले जीवन व्यतीत करायचा. या ब्राह्मण आणि त्याच्या पत्नीला मूलबाळ नव्हते. एके दिवशी त्याची पत्नी भिक्षा मागण्यासाठी शहरात गेली, परंतु सर्वांनी तिला वांझ म्हणून भिक्षा देण्यास नकार दिला. त्यानंतर कोणीतरी त्या ब्रह्मणाच्या पत्नीला १६ दिवस कालिका देवीची पूजा करण्यास सांगितले. त्यानुसार या ब्राह्मण जोडप्याने सांगितल्याप्रमाणे पूजाविधी केली. त्यांच्या पूजेने प्रसन्न होऊन १६ व्या दिवशी देवी कालिका प्रकट झाली. देवीने त्या ब्राह्मणाच्या पत्नीला गर्भवती होण्याचा आशीर्वाद दिला आणि तिला तिच्या क्षमतेनुसार प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी दिवा लावायला सांगितले. ३२ पौर्णिमा हे दिवे लावण्यास सांगितले. (Latest Marathi Headline)
त्यानुसार, ब्राह्मणाने झाडावरून आंब्याचे फळ तोडून आपल्या पत्नीला पूजेसाठी दिले. त्याच्या पत्नीने पूजा केली आणि परिणामी ती गर्भवती झाली. त्यानंतर देवी कालिकाने सांगितल्या प्रमाणे प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी ती ब्राह्मण पत्नी दिवा लावत असे. देवी कालिकेच्या कृपेने त्या ब्राह्मण दाम्पत्याला पुत्ररत्न प्राप्त झाले. त्याचे नाव देवदास ठेवण्यात आले. देवदास मोठा झाल्यावर काशीला त्याच्या मामाकडे शिकायला गेला. आणि कालंतराने त्याची फसवणूक होत त्याचा विवाह लावून देण्यात आला. (Top Stories)
========
हे देखील वाचा : Temple : ५६ फूट उंच गणेपतीची मूर्ती असणारे ‘हे’ आहे आशिया खंडातील सर्वात मोठे गणेश मंदिर
Braj Holi Celebrations : ब्रजभूमीमध्ये होळी उत्सवाची सुरुवात
========
देवदास हा अल्पवयीन असताना त्याचे फसवून लग्न केले गेले. काही काळानंतर काळ त्याचा जीव घेण्यासाठी आला. पण ब्राह्मण जोडप्याने पौर्णिमेच्या दिवशी उपवास केले होते. आणि या व्रताच्या प्रभावाने काळ त्याचे काहीही नुकसान करू शकला नाही. या कथेनुसार पौर्णिमेच्या दिवशी मनोभावाने व्रत केल्यास मनुष्याला सर्व संकटांपासून मुक्ती मिळते आणि त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. (Social News)
( टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
- Magh Purnima
- magh purnima 2026
- magh purnima date
- magh purnima date 2026
- magh purnima importance
- magh purnima katha
- magh purnima marathi information
- magh purnima ritual
- magh purnima significance
- magh purnima tithi
- magh purnima vrat
- what is magh purnima
- माघ पौर्णिमा
- माघ पौर्णिमा २०२६
- माघ पौर्णिमा कथा
- माघ पौर्णिमा कधी आहे?
- माघ पौर्णिमा तारीख
- माघ पौर्णिमा तिथी
- माघ पौर्णिमा दान
- माघ पौर्णिमा महत्त्व
- माघ पौर्णिमा माहिती
- माघ पौर्णिमा मुहूर्त
- माघ पौर्णिमा म्हणजे काय?