Home सामाजिक Braj Holi Celebrations : ब्रजभूमीमध्ये होळी उत्सवाची सुरुवात
सामाजिक

Braj Holi Celebrations : ब्रजभूमीमध्ये होळी उत्सवाची सुरुवात

0

जानेवारी महिना संपत आला की अवघी ब्रजभूमी भगवान कृष्णाच्या नामघोषात रंगून जातो. वसंत पंचमीच्या दिवसापासून या ब्रजभूमीमध्ये गुलाल उधळला जातो, आणि जगप्रसिद्ध फग महोत्सवाची सुरुवात होते. यावर्षीही अवघ्या ब्रजभूमीमध्ये वसंत पंचमीच्या निमित्तानं फग उत्सावाची सुरुवात झाली आहे. आता पुढचे चाळीस दिवस या ब्रजभूमीत “जग होरी, ब्रज होरा,” या गाण्यासह गुलाल उधळण्यात येणार आहे. ब्रजभूमीचा हा फग महोत्सव एवढा प्रसिद्ध आहे की, आत्तापासूनच येथे मोठ्या संख्येनं पर्यटक दाखल झाले आहेत. यात परदेशी पर्यटकांची संख्याही मोठी आहे. वसंत पंचमीपासून सुरु झालेला हा महोत्सव आता पुढच्या पौर्मिमेपर्यंत सुरु रहाणार आहे. यामध्ये सर्वांच्या आकर्षणाचा दिवस लढमार होळीचा रहणार आहे. या लढमार होळीसाठी ब्रजमध्ये तयारी सुरु झाली आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण ब्रजभूमीमध्ये अलिकडे जे रंग वापरले जात आहेत, ते पूर्णतः नैसर्गिक असावेत, असा आग्रह करण्यात येत आहे. त्यामुळेच नैसर्गिकरित्या रंग मोठ्या प्रमाणात तयार करण्यात येत आहेत. ( Braj Holi Celebrations )

भगवान कृष्णाचे शहर मथुरा, वृदांवन, बरसानामध्ये फग महोत्सवाची सुरुवात झाली आहे. पुढचे चाळीस दिवस या ब्रजभूमीमध्ये रंग, आनंद आणि भक्तीचा एक अनोखा संगम दिसणार आहे. ब्रजभूमीत वसंतपंचमीच्या शुभ मुहूर्तावर फग महोत्सव, म्हणजेच ब्रजच्या जगप्रसिद्ध होळीची उत्सवात झाली आहे. वसंत ऋतूच्या आगमनाचा हा सोहळा साजरा करतांना येथील प्रत्येक रस्ता गुलालाच्या रंगाने रंगून गेला होता. या फग महोत्सावची सुरुवात वृंदावनमधील जगप्रसिद्ध ठाकूर बांके बिहारी मंदिरापासून झाली. येथे भगवान कृष्णाला गुलाल लावण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. मंदिराच्या पुजाऱ्यांनी भाविकांवर गुलाल शिंपडण्यास सुरुवात करताच, संपूर्ण परिसर “बांके बिहारी लाल की जय” च्या जयघोषाने दुमदुमून गेला. या सोहळ्यानिमित्त बांके बिहारी मंदिराला पिवळ्या रंगाच्या फुलांनी सजवण्यात आले होते. सोबतच ठाकूरजींनी वसंत ऋतूचा पोशाख घालण्यात आला होता. आता पुढचे चाळीस दिवस अशाच पिवळ्या रंगामध्ये ठाकूरजींचा शृंगार करण्यात येणार आहे. सोबतच मंदिरामध्ये होळीची गाणीही म्हटली जातात. हाच सर्व सोहळा बघण्यासाठी मोठ्यासंख्येनं येथे देशविदेशातले भाविक गर्दी करतात.

यामध्ये जो रंग खेळला जातो, तो नैसर्गिक साधनांनी तयार केलेला असावा असा नियम आहे. वसंत ऋतू उत्सवादरम्यान, भगवान ठाकूरजींना तेसूच्या फुलांपासून बनवलेला नैसर्गिक गुलाल अर्पण केला जातो. निसर्ग आणि त्याचे पावित्र्य जपण्यासाठी ही परंपरा गेल्या अनेक वर्षापासून ब्रजभूमीमध्ये पाळली जात आहे. तेसूच्या फुलांपासून बनवलेला रंग केवळ पर्यावरणपूरकच नाही तर भगवान श्रीकृष्णाच्या काळातील परंपरांशी देखील जोडलेला असल्याचे मानले जाते. याबाबत येथील स्थानिक कथाही सांगतात, शिवाय यावर स्थानिक भाषेमध्ये गाणीही लिहिलेली आहेत. वसंतोत्सवाच्या दिवशी, ब्रजमधील प्रमुख मंदिरांमध्ये ठाकूरजींना पिवळ्या वस्त्रांनी सजवले जाते, त्यामागेही निसर्गासोबत एकरुप होण्याची भावना जपण्यात आलेली आहे. पिवळा रंग वसंत ऋतू, ऊर्जा आणि आनंदाचे प्रतीक मानला जातो. त्यातूनच ही परंपरा चालत आलेली आहे. ( Braj Holi Celebrations )

=======

हे देखील वाचा : Temple : ५६ फूट उंच गणेपतीची मूर्ती असणारे ‘हे’ आहे आशिया खंडातील सर्वात मोठे गणेश मंदिर

=======

नांदगाव-बरसाणा येथे, राधारानी आणि कन्हैयाच्या पायावर गुलाल ठेऊन होळीची सुरुवात होते. वसंत पंचमीला राधारानी आणि कन्हैयाच्या पायांवर गुलाल लावण्यात आला आणि गोस्वामी समुदायाने सामुदायिक गायन सुरु करत होळीच्या शुभेच्छा दिल्या. नांदगाव आणि बरसाना येथील पुरुष आणि महिला जगप्रसिद्ध लठमार होळीच्या तयारीलाही लागले आहेत. त्यासाठी लाढ्या तयार करण्यास सुरुवात झाली आहे.

२४ फेब्रुवारी रोजी नांदगावमध्ये फाग निमंत्रण महोत्सव होईल, त्यानंतर बरसानामध्ये लाठमार होळी होणार आहे. २५ फेब्रुवारी रोजी बरसानामध्ये जगप्रसिद्ध लठमार होळी आणि २६ फेब्रुवारी रोजी नांदगावमध्ये लठमार होळी होईल. या जगप्रसिद्ध लठमार होळीसाठी हुरियारे आणि हुरियारीन त्यांच्या पारंपारिक पोशाख, गाणी आणि विधींसह तयारी करत आहेत. लठमार होळी हा केवळ रंगांचा उत्सव नाही तर राधा आणि कृष्णाच्या दैवी खेळाचे प्रदर्शन करणारा एक सजीव रंगमंच या भागात मानण्यात येतो. या सर्व सोहळ्याला पाहण्यासाठी ब्रजमध्ये आत्तापासूनच मोठ्या संख्येनं पर्यटक दाखल होऊ लागले आहेत. ( Braj Holi Celebrations )

सई बने

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

Health Care
सामाजिक

Chardham Yatra : चारधाम यात्रेची तयारी सुरू

उत्तराखंडची चारधाम यात्रा १९ एप्रिल रोजी सुरू होणार आहे. अक्षय तृतीयेचा मुहूर्त...

सामाजिक

Yamunotri Dham : यमुनोत्री धामची रहस्ये

उत्तराखंड राज्यातील चारधाम यात्रेचे हिंदू धर्मात मोठे महत्त्व आहे. यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ...

सामाजिक

Narmadeshwar Mahadev Temple : रंग बदलणारे शिवलिंग

उत्तर प्रदेशामध्ये भगवान शंकराची अनेक मंदिरे आहेत. या मंदिरांच्या स्थापनेमागे पौराणिक कथा...

सामाजिक

Chilkur Balaji Temple : अनोखे व्हिसा मंदिर

प्रभू श्रीरामांचे परमभक्त असलेल्या महाबली हनुमानांचा जन्मोत्सव २ एप्रिल रोजी साजरा होणार...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!