Home गाजावाजा स्पेशल Christmas : येशू ख्रिस्तांचा जन्मदिन असलेल्या ख्रिसमस सणाचे महत्त्व
गाजावाजा स्पेशल

Christmas : येशू ख्रिस्तांचा जन्मदिन असलेल्या ख्रिसमस सणाचे महत्त्व

1
Rakesh Kishore

‘विविधतेत एकता’ असणार्‍या आपल्या देशामध्ये प्रत्येक धर्माचे लोक आपापले सण मोठ्या उत्सहाने साजरा करतात. मुख्य म्हणजे इतर धर्मीय लोक देखील कोणतीही धर्माची मर्यादा न पाळता वेगवेगळे सण साजरे करताना दिसतात. प्रत्येक वर्षातला शेवटचा सण म्हणून ख्रिसमस म्हणजेच ‘नाताळ’ या सणाला ओळखले जाते. ख्रिश्चन धर्मियांचा अतिशय मोठा आणि महत्त्वाचा सण म्हणून ख्रिसमस प्रसिद्ध आहे. संपूर्ण जगात २५ डिसेंबरला हा सण साजरा केला जातो. नाताळ हा सण ख्रिश्चन बांधवांचा वर्षातील सर्वात मोठा उत्सव आहे. या दिवसासाठी ख्रिश्चन बांधव अनेक दिवसांपासून जय्यत तयारी करतात. (Christmas)

२५ डिसेंबर रोजी येशू ख्रिस्त यांचा जन्म झाला होता. त्यामुळे येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस ‘ख्रिसमस’ म्हणून साजरा करतात. ख्रिश्चन धर्माचे लोक येशू ख्रिस्तांना ईश्वराचा मुलगा मानले जाते. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळच्या पोप पहिला ज्युलियसने ‘२५ डिसेंबर’ हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. त्या वेळेपासून नाताळ हा दिवस २५ डिसेंबर या तारखेला साजरा केला जाऊ लागला. जगाच्या बऱ्याच मोठ्या भागात हा सण मध्यरात्री साजरा केला जातो, तर काही ख्रिश्चन अनुयायी व काही ख्रिस्ती पंथ मात्र सायंकाळी हा सण साजरा करतात. सर्वात प्रथम इ.स.पू. ३३६ मध्ये रोम येथे ख्रिसमस हा सण साजरा झाला असे मानले जाते. (Marathi)

जोसेफ आणि मेरी यांच्या पोटी बेथलेहेम येथे येशूचा जन्म झाला होता. मेरीला एक स्वप्न पडलं होतं. ज्यामध्ये तिनं प्रभुचा पुत्र येशूला जन्म देण्याची भविष्यवाणी केली होती, असा दावा त्यांचे अनुयायी करतात. रोमन ख्रिश्चन इतिहासकार सेक्स्टस ज्युलियस आफ्रिकनस यांच्या मते, आईनं केलेल्या भविष्यवाणीनंतर प्रभु येशू बरोबर ९ महिन्यांनंतर २५ डिसेंबर रोजी पृथ्वीवर जन्माला आले. त्यामुळं २५ डिसेंबर हा ‘ख्रिसमस डे’ म्हणून ओळखला जातो. (Todays Marathi Headline)

Christmas

येशूंनी संपूर्ण समाजाला प्रेम व मानवतेची शिकवण देणारे येशू हे ख्रिस्ति धर्माचे संस्थापक मानले जातात. येशू ख्रिस्त यांचा जन्म बेथलेहेम शहरात झाला. हे इस्राईल देशातील एक छोटंसे गाव आहे. ह्याच गावात ख्रिस्तांचा अर्थात प्रभू येशू यांचा जन्म झाला. ह्या दिवशी इथून लोकं रात्रीच्या समयी मिरवणूक काढून जेरूसेलम गांवी पहाटेच्या सुमारास पोहोचतात. ख्रिसमसचा शब्दश: अर्थ आहे ‘क्राइस्ट्स मास’ अर्थात येशुच्या जन्मानिमित्त करण्यात येणारी सामूहिक प्रार्थना. ख्रिस्ती लोकांसाठी हा सण आनंदाचा आणि हर्षाचा सण आहे, जशी पौर्णिमा व अमावस्या या तिथी जश्या चंद्रावर अवलंबून असतात. तसा प्रकार ख्रिस्ति कालगणनेत नाही, ख्रिस्ति कालगणेत सूर्याला अधिक महत्व दिले जाते. (Marathi News)

दर वर्षी २५ डिसेंबर रोजी नाताळ हा सण साजरा केला जातो. ह्या दिवशी ख्रिस्ती बांधवांचे लाडके प्रभू येशू यांचा जन्म झाला होता. काही ठिकाणी हा सण ६, ७ किंव्हा १९ जानेवारी ला एपिफानी म्हणून साजरा करतात. हा सण १२ दिवसांचा असून ख्रिसमस्टाईड पर्वाची सुरुवात होते. जगाभरात हा सण साजरा होतो. काही ठिकाणी मध्यरात्री हा सण साजरा केला जातो. तर काही ठिकाणी संध्याकाळी हा सण साजरा केला जातो. नाताळ हा शब्द नातूस म्हणजे जन्म या लॅटिन शब्दापासून बनला आहे. (Latest Marathi News)

येशूने दिलेली शिकवण अद्वितीय होती. त्यांनी शिकवले की, इतरांना क्षमा करा, जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो, त्याच्याकडे दुसरा गाल करा. तुम्ही आपल्या शत्रूवर देखील प्रेम करा, आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. तुमचे दोष काढण्यात येऊ नयेत म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे. त्यांची पूर्ण शिकवण नवीन करारात पाहायला मिळते. (Top Marathi News)

Christmas

प्राचीन युरोपीय देशांमध्ये लोक हिवाळ्यात हिरव्या झाडांना घरात ठेवून त्यांची पूजा करायचे. यामुळे ते निसर्गाशी आपली जवळीक व्यक्त करायचे. घरामध्ये झाडे सजवण्याची परंपरा १७०० च्या उत्तरार्धापर्यंत जर्मनीमध्ये होती. प्रोटेस्टंट रिफॉर्मेशनचे नेते मार्टिन ल्यूथर यांना रात्रीचे आकाश घरामध्ये पुन्हा तयार करण्याच्या प्रयत्नात झाडांच्या फांद्यामध्ये मेणबत्त्या जोडण्याचे श्रेय जाते. सामान्यतः असे मानले जाते की राणी व्हिक्टोरियाच्या पत्नी प्रिन्स अल्बर्टने ख्रिसमस ट्री १८४० मध्ये इंग्लंडमध्ये आणला होता. तथापि, पहिला रेकॉर्ड केलेला ख्रिसमस ट्री डिसेंबर १८०० मध्ये जॉर्ज तिसरा याची पत्नी राणी शार्लोट यांनी उभारला होता. (Latest Marathi Headline)

19व्या शतकाच्या मध्यापर्यंत मेणबत्त्या, घरगुती सजावट, मिठाई आणि भेटवस्तूंनी सुशोभित केलेले ख्रिसमस ट्री मध्यमवर्गीय लोकांमध्ये लोकप्रिय झाले होते. ख्रिसमस ट्री हा ख्रिसमस सणाच्या मुख्य आकर्षणांपैकी एक आहे. हा झाड ख्रिस्ती धर्मीयांसाठी पवित्रतेचे आणि आनंदाचे प्रतीक आहे. दरवर्षी २५ डिसेंबरला ख्रिसमस साजरा करताना ख्रिसमस ट्रीला रंगीत दिवे, तारे, सजावटीचे सामान, आणि भेटवस्तूंनी सजवले जाते. ख्रिसमस ट्रीचे हिरवेपण जीवन आणि शाश्वततेचे प्रतीक आहे. कठीण परिस्थितीतही हिरवे राहणे म्हणजे संघर्षांवर मात करण्याचे प्रतीक. झाडाच्या शिखरावर तारा ठेवला जातो, जो येशूंच्या जन्मावेळी आकाशात दिसलेल्या तेजस्वी ताऱ्याचे प्रतीक आहे. हा तारा मार्गदर्शनाचे प्रतीक मानला जातो. दिवे अंध:कार दूर करून प्रकाश आणण्याचे प्रतीक आहेत. (Top Marathi Headline)

========

America VS Venezuela : सद्दामच्या वाटेवर मादुरो…

========

ख्रिसमसच्या दिवशी ख्रिस्ती धर्मीय लोक सकाळी चर्चमध्ये जाऊन विशेष प्रार्थना करतात. ते प्रभु येशूंच्या शिकवणींना आठवतात आणि त्यांच्या उपदेशांवर चिंतन करतात. ख्रिसमसच्या दिवशी कुटुंबातील सदस्य, मित्र आणि आप्तस्वकीय यांच्यासोबत भेटवस्तूंची देवाणघेवाण केली जाते. यामुळे परस्पर नातेसंबंध अधिक दृढ होतात. ख्रिसमसच्या निमित्ताने गोड गाणी व आनंददायक नृत्य सादर केले जाते. ख्रिसमस गाण्यांमध्ये प्रभु येशूंचे स्तुतीगीत असते. ख्रिसमसच्या निमित्ताने स्वादिष्ट खाद्यपदार्थ तयार केले जातात. त्यात केक, कुकीज, चॉकलेट्स, गोड पदार्थ, वाइन आणि पारंपरिक पदार्थ यांचा समावेश असतो. ख्रिसमस हा सण आफ्रिका, आग्नेय आशिया, युरोप, अमेरिका अशा जगभरातील सर्व खंडांमध्ये उत्साहाने साजरा केला जातो. भारतात गोव्यामध्ये ख्रिश्चन धर्माचे लोक मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे गोव्यात नाताळ सण दिमाखात पार पडतो. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

गाजावाजा स्पेशल

Akshaya Tritiya : जाणून घ्या अक्षय्य तृतीयेच्या दिवसाचे धार्मिक महत्त्व

हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीयेचा सण येत्या...

आंतरराष्ट्रीयगाजावाजा स्पेशल

US-Iran War : अमेरिका नमली की इराण घाबरलं ?

America, Israel आणि Iran यांचे युद्ध गेले ४० दिवस चालू आहे. रोजच्या...

गाजावाजा स्पेशल

Ekadshi : वैशाख महिन्यात येणाऱ्या वरुथिनी एकादशीचे महत्त्व

हिंदू धर्मात एकादशीला खूप महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता...

Flight Ticket Booking
गाजावाजा स्पेशल

E-Arrival Card नक्की काय आहे? कोणासाठी महत्वाचा आणि कोणती कागदपत्रे सादर करावी याबद्दल घ्या जाणून

E-Arrival Card :  भारतातील विमानतळ प्रवेश प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल होत आहे....

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!