Home आंतरराष्ट्रीय America VS Venezuela : सद्दामच्या वाटेवर मादुरो…
आंतरराष्ट्रीय

America VS Venezuela : सद्दामच्या वाटेवर मादुरो…

0

१३ डिसेंबर २००३ रोजी इराकचे सर्वेसर्वा सद्दाम हुसेन यांना एका गुप्त बंकरमधून अमेरिकन सैन्याने पकडले. हे ऑपरेशन रेड डॉन झाल्यावर सद्दाम हुसेन यांच्यावर मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांचा खटला चालवण्यात आला. ३० डिसेंबर २००६ रोजी माजी  यांना फाशी देण्यात आली. सद्दाम हुसेन यांची आठवण होण्याचे कारण म्हणजे, आणखी एका देशाचे राष्ट्राध्यक्ष याच वाटेनं जात आहेत. अमेरिकेसोबत व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांचे संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. अमेरिकेने राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या कुटुंबावर नवीन निर्बंध लादले आहेत. (America VS Venezuela)

मादुरो यांच्या कुटुंबातील अनेकांच्या तेलाच्या जहाजांवर अमेरिकेनं कारवाई केली आहे. आता हा पाश अमेरिकने व्हेनेझुएलाच्या सरकारवर आवळत घेतला असून लवकरच निकोलस मादुरोंवरही थेट कारवाई होणार असल्याची अटकळ आहे. त्यामुळे त्यांच्यावरही सद्दाम हुसेन यांच्याप्रमाणेच खटला चालवला जाणार असल्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिका आणि व्हेनेझुएला मधील तणाव आता चिंताजनक वाढला आहे. अमेरिकन प्रशासनानं व्हेनेझुएलाचे अध्यक्ष मादुरो आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या तेल कंपन्यांवर नवीन निर्बंध लादले आहेत. यामुळे अमेरिकेवर एकाधिकारशाहीचा आरोप लावण्यात आला आहे. असेच निर्बंध अमेरिकेनं इराकचे माजी राष्ट्राध्यक्ष सद्दाम हुसेन यांच्या कुटुंबियांवरही लादले होते, त्यानंतरं सद्दाम यांना अटक करुन अमेरिकेने त्यांना फाशीची शिक्षा दिली. तशीच गत मादुरो यांची होणार आहे का, अशी चर्चा सुरु झाली आहे. (International News)

निकोलस मादुरो यांच्या पत्नी आणि पुतण्यांच्या संबंधिक सहा शिपिंग कंपन्या आणि तेल टँकरवर हे निर्बंध घालण्यात आल्यानं खळबळ उडाली. निर्बंध टाकतांना या कंपन्यांनी मादुरो सरकाराला आर्थिक मदत केली, आणि त्याचा मादुरो यांनी गैरवापर केला, असा ठपका ठेवण्यात आला आहे. अमेरिका आता व्हेनेझुएलाचे कच्चे तल वाहून नेणारे टँकर जप्त करीत आहे. व्हाईट हाऊसने पुष्टी केली आहे की “स्किपर” नावाचा टँकर जप्त करण्यात आला असून तो आता अमेरिकेच्या बंदरात नेला जाईल आणि त्यावरील तेल जप्त केले जाईल. अमेरिकेने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्यावर दबाव वाढवत असताना उचलेल्या या पावलामुळे मादुरो याच्या सत्तेचे शेवटचे दिवस असल्याची चर्चा सुरु झाली आहे. (America VS Venezuela)

त्यातच मादुरो यांच्या भ्रष्ट्राचारी राजवटीला त्यांचे दोन्ही पुतणे मदत करत असल्याचाही आरोप अमेरिकेनं ठेवला आहे. शिवाय व्हेनेझुएलाच्या तेलाची वाहतूक केल्याचा आरोप असलेल्या पनामाचे व्यापारी रॅमन कॅरेटेरोवर देखील निर्बंध घालण्यात आले आहेत. मादुरोंचे दोन पुतणे, फ्रँकी फ्लोरेस आणि एफ्रेन कॅम्पो यांना यापूर्वी ड्रग्ज तस्करीमध्ये अटक करण्यात आली होती. २०१५ मध्ये, हैतीमध्ये ड्रग्ज तस्करीच्या आरोपाखाली या दोघांनाही अटक करण्यात येऊन १८ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. मात्र मादुरो यांनी त्यांच्या सुटकेसाठी खूप प्रयत्न केले. अखेर २०२२ मध्ये व्हेनेझुएला आणि अमेरिकेतील कैद्यांच्या देवाणघेवाणीत मादुरो यांच्या या दोन पुतण्यांची सुटका करण्यात आली. अर्थात या शिक्षेनंतरही फ्रॅंकी आणि एफ्रेन हे सुधारले नसल्याचे अमेरिकेचे मत आहेत. (International News)

मादुरो यांच्या भ्रष्ट्राचाराच्या योजना राबवण्यासाठी या दोन पुतण्यांचीची मदत अधिक होत आहे. त्यामुळेच त्यांच्यावर निर्बंध लावण्यात आल्याचे स्पष्टीकरण अमेरिकन सरकारतर्फे देण्यात आले आहे. मात्र व्हेनेझुएलानं हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. व्हेनेझुएलाच्या प्रचंड तेल साठ्यांवर ताबा मिळवण्यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे, त्यासाठीच ट्रम्प अनेक निर्बंध लावत असल्याचे मादुरो यांनी एका पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. यासोबत मादुरो यांनी आपल्याला अमेरिकेकडून धोका असल्याचेही सांगितले आहे. इराकच्या सद्दम हुसेन यांचा पाडाव कऱण्यासाठी अमेरिकेनं हिच निती वापरली होती. त्यामुळे मादुरो यांनी अमेरिका हल्ला करणार असल्याची शंका व्यक्त करुन आपल्या देशातील सैन्याला तयार रहाण्याच्या सूचना केल्या आहेत. (America VS Venezuela)

=======

हे देखील वाचा :  Saudi Arabia : सौदीचे वाळवंट जलमय !

=======

इकडे अमेरिकेने गेल्या अनेक महिन्यांपासून कॅरिबियनमध्ये मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केले आहे. अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या जवळ आपली सर्वात मोठी विमानवाहू युद्धनौका यूएसएस जेराल्ड फोर्ड तैनात केली आहे. यामुळे या दोन्ही देशांमधील तणाव युद्धापर्यंत जाणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. (International News)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

Katrina Kaif
आंतरराष्ट्रीय

Jiang Xueqin : चीनच्या नॉस्ट्राडॅमसने सांगितले ट्रम्पचे भविष्य

अमेरिका-इराण युद्धामध्ये पंधरा दिवसांचा विराम आला आहे. यात चीनची भूमिका असल्याची माहिती...

Jewellery
आंतरराष्ट्रीय

Jared Kushner : ट्रम्पचा जावई आहे तरी कोण

अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धावर कायमचा विराम आणण्यासाठी पाकिस्तानची राजधानी...

Mobile
आंतरराष्ट्रीय

First Lady Melania Trump : अमेरिकेच्या फर्स्ट लेडीसाठी शाही सवारी

इराणमध्ये सत्तांतर करण्याच्या हेतूने अमेरिकेने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणविरुद्ध लष्करी मोहीम...

आंतरराष्ट्रीयगाजावाजा स्पेशल

US-Iran War : अमेरिका नमली की इराण घाबरलं ?

America, Israel आणि Iran यांचे युद्ध गेले ४० दिवस चालू आहे. रोजच्या...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!