Home मनोरंजन कोण होणार करोडपती कार्यक्रमाच्या नवीन पर्वात झाले आहेत ‘हे’ बदल, आता तुम्हीही होऊ शकता करोडपती! 
मनोरंजन

कोण होणार करोडपती कार्यक्रमाच्या नवीन पर्वात झाले आहेत ‘हे’ बदल, आता तुम्हीही होऊ शकता करोडपती! 

12
कोण होणार करोडपती
Image Credit : millionaire.fandom.com

प्रश्नांची उत्तरं देत करोडपती होण्याची सूवर्णसंधी देणारा खेळ म्हणजे कोण होणार करोडपती. ज्ञान आणि मनोरंजनाचा हा अद्भूत असा खेळ! याच कोण होणार करोडपती या कार्यक्रमाचं नवं पर्व (Kon Honaar Crorepati 2022) प्रेक्षकांच्या भेटीला येतंय. तुमचं ज्ञान तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहचवू शकतं, हे या कार्यक्रमातून प्रेक्षकांना पाहायला मिळालं. यंदाच्या पर्वाचं सूत्रसंचालनही अभिनेते सचिन खेडेकर करणार आहेत.

‘प्रत्येक खेळात कोणी जिंकतं कोणी हरतं, पण या खेळात फक्त स्पर्धक जिंकतो’; असं सांगणारा कार्यक्रमाचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. त्यात कोण होणार करोडपतीच्या यंदाच्या पर्वात प्रेक्षकांना कार्यक्रमात सहभागी होण्याची आणि जिंकण्याची वाढीव संधी मिळणार आहे. 

Big B Amitabh Bachchan Appreciate kon honaar crorepati

कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी स्पर्धकांना कार्यक्रम सुरु होण्याआधी विशिष्ट कालावधीत विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्यावी लागतात. त्या प्रश्नाची उत्तरं देणाऱ्या स्पर्धकांना पुढे कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळते. यंदा हे प्रश्न २३ फेब्रुवारीपासून सुरु होतील. कोण होणार करोडपती कार्यक्रमाच्या नवीन पर्वामध्ये (Kon Honaar Crorepati 2022) काही बदल झाले आहेत. यंदाच्या पर्वाची खासियत अशी की, प्रेक्षकांना १४ प्रश्नांची उत्तरं देता येणार आहेत. 

====

हे ही वाचा: हरहुन्नरी कलाकार: सचिन खेडेकर

====

यापूर्वीच्या पर्वांमध्ये स्पर्धकांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी केवळ १० प्रश्नांची उत्तरं देता यायची, पण आता त्यांना १४ प्रश्नांची उत्तरं देता येणार आहेत. म्हणजेच कार्यक्रमात सहभागी होण्याचे चान्सेस आता वाढतील. तसंच ही प्रश्नावली १० दिवस प्रसारीत व्हायची आता १४ दिवस १४ प्रश्न विचारले जाणार आहेत. सोनी मराठीकडून मिळालेल्या माहितीनुसार बरेच स्पर्धक रजिस्ट्रेशन करु शकत नाही कारण रजिस्ट्रेशन करेपर्यंतच रजिस्ट्रेशनची वेळ संपायची. त्यामुळेच यंदा जास्तीत जास्त स्पर्धकांना कार्यक्रमात सहभागी होता यावं याकरता हा कालावधी १० दिवसांवरुन १४ दिवसांवर आणला आहे.

Kon Honaar Crorepati host Sachin Khedekar meets veteran actor and KBC host Amitabh  Bachchan on the shooting sets - Times of India

करोडपती बनण्याचं स्वप्न सगळेच पाहतात, पण प्रत्येकाला तशी संधी मिळतेच असं नाही. पण आपल्याला असलेल्या ज्ञानाच्या आधारे ते स्वप्न सत्यात उतरवण्याची संधी ‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम सामान्य प्रेक्षकांना उपलब्ध करून देत आला आहे. आता नवीन पर्वत झालेल्या बदलांमुळे (Kon Honaar Crorepati 2022) ही संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहे. 

====

हे ही वाचा: या महत्वाच्या कारणांसाठी आवर्जून बघा ‘शार्क टॅंक इंडिया’

====

सोनी टीव्हीवर दाखवला जाणारा रिअलिटी शो कौन बनेगाा करोडपती, प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अमिताभ बच्चन करतात. त्यांचा हा अंदाज प्रेक्षकांना भावतो. त्यामुळे की काय हा शो प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. याच कार्यक्रमाच्या धर्तीवर काही वर्षांपूर्वी ‘कोण होणार करोडपती’ हा मराठी रिअलिटी शो सुरू करण्यात आला होता. प्रसिद्ध अभिनेता सचिन खेडेकर यांचं सूत्रसंचालन असलेल्या या शोची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. आता लवकरच हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🗳️ तुमची निवड करा
तुम्ही कोणत्या विषयावरील लेख जास्त वाचता?
📚 खालीलपैकी कोणत्या विषयावरील ब्लॉग तुम्हाला वारंवार वाचायला आवडतात?
💡 एक किंवा अधिक पर्याय निवडा:

Related Articles

मनोरंजन

Asha Bhosale : आशा भोसले यांच्याबाबत ‘या’ गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

भारतीय संगीत क्षेत्रातील अतिशय महान गायिका आशा भोसले यांचे 12 एप्रिल रोजी...

गाजावाजा स्पेशलमनोरंजन

Marathi Legends : या तिन्ही मराठी दिग्गजांनी साऊथचं अख्खं मार्केट खाल्लय !

बॉलिवूडमध्ये एक छोटासा रोल मिळाल्यावर मराठी कलाकारांना मीपणा येतो, अशा कमेंट्स मराठी...

गाजावाजा स्पेशलमनोरंजन

Marathi Cinema : ११० मराठी चित्रपटांनी फक्त ९९ कोटी कमावले…

२०२५ हे वर्ष तसं मराठी इंडस्ट्रीसाठी फार खास राहिलं नाही. काही आयकॉनिक...

मनोरंजन

Dhurandhar : धुरंधरचा बॉक्स ऑफिसवर धुरळा !

२०२५ हे वर्ष खऱ्या अर्थाने अभिनेता अक्षय खन्ना याचं ठरलंय असं म्हणायला...

⚙️ Font Size

100%
WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!