Home मनोरंजन Asha Bhosale : आशा भोसले यांच्याबाबत ‘या’ गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?
मनोरंजन

Asha Bhosale : आशा भोसले यांच्याबाबत ‘या’ गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

58

भारतीय संगीत क्षेत्रातील अतिशय महान गायिका आशा भोसले यांचे 12 एप्रिल रोजी मुंबईत निधन झाले आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या बातमीमुळे चित्रपटसृष्टीतील कलाकारांसह त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये गाणे गाताना त्यांनी आपल्या आवाजाने त्या चित्रपटांना अक्षरशः चार चाँद लावले. बऱ्याचदा तर त्यांची गाणीच चित्रपटाची ओळख बनली. आशा ताईंनी आपल्या जादुई आवाजाने सगळ्यांनाच मंत्रमुग्ध केले. लता मंगेशकरनंतर सर्वच आशा भोसले यांच्या आवाजाचे चाहते होते. मात्र आज अखेर हा आवाज कायमचा थांबला. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला, मात्र तरी त्या सक्रिय होत्या. काही दिवसांपूर्वीच त्या सचिन तेंडुलकरच्या मुलाच्या अर्जुनच्या लग्नात दिसल्या. त्यानंतर त्यांनी संजय नार्वेकर यांच्या नाटकाच्या प्रयोगाला देखील हजेरी लावली होती. आशा ताई गेल्यानंतर सर्वच लोकं त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहे. सोशल मीडियावर देखील ताईंचे गाणे, त्यांचे व्हिडिओ कमालीचे व्हायरल होत आहे. (Asha Bhosle)

आशा भोसले यांनी तब्बल 20 हून अधिक भाषांमध्ये 15 हजारांहून अधिक गाणी गायली. तब्बल आठ दशकांहून अधिक काळ आशा भोसले यांनी आपल्या आवाजाची जादू प्रेक्षकांवर चालवली. जगात सर्वाधिक गाणी रेकॉर्ड केल्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आशाताईंच्या नावावर आहे. आशा भोसले यांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची ‘व्हर्सटॅलिटी’ . त्या प्रत्येक प्रकारचं गाणं अत्यंत कुशलतेने गाऊ शकत होत्या. त्यांनी शास्त्रीय संगीतापासून कव्वालीपर्यंत, कॅबरेपासून पॉपपर्यंत प्रत्येक जॅनरमध्ये गाणी गायली आहेत. आशा भोसले यांनी ‘द क्रोनोस क्वार्टेट’ आणि ‘बॉय जॉर्ज’ यांसारख्या कलाकारांसोबत देखील काम केलं आहे. त्यांची ‘पिया तू अब तो आजा’, ‘दम मारो दम’, ‘ये मेरा दिल’, ‘चुरा लिया है तुमने’, ‘इन आंखों की मस्ती के’ आणि ‘दिल चीज क्या है’ ही गाणी आजही अमर आहेत. (Todays Marathi Headline)

Asha Bhosale

लता मंगेशकर यांना भारताची गानकोकिळा म्हटले जायचे, तर आशा भोसले यांना व्हर्सेटाइल आवाज असे म्हटले जात असे. या दोघींनी हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीसह इतर अनेक भाषांमध्ये हजारो गाणी गायली. मात्र या दोघी बहिणींच्या बाबतीत एक योगायोग घडून आल्याचे दिसते. 6 फेब्रुवारी 2022 रोजी रविवारी, वयाच्या 92 व्या वर्षी लता मंगेशकर यांचे ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले होते. त्याचप्रमाणे, नेमक्या 4 वर्षांनी म्हणजे 22 एप्रिल 2026 रोजी रविवारीच वयाच्या 92 व्या वर्षी आशा भोसले यांचेही निधन झाले. त्यांनीही मुंबईतील याच रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. हा एक अनोखा योगायोग ठरला आहे. (Top Stories)

आशा ताईंचे क्रिकेट विश्वासी अतिशय खास नाते होते. त्यांनी एका क्रिकेटपटूसोबतही हिंदी गाणे गायले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या क्रिकेटपटूने देखील आपल्या कारकिर्दीत हजारोहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. आशा भोसले यांनी हे गाणे २००६ च्या आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी दरम्यान गायले होते. हे गाणे अवघ्या साडेचार तासांत रेकॉर्ड करण्यात आले होते. एक ऑस्ट्रेलियन मुलगा भारतीय मुलीच्या प्रेमात पडल्यावर काय होते यावर आधारित हे गाणे आहे. आशा ताईंनी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ब्रेट ली याच्यासोबत यू आर द वन फॉर मी हे गाणे गायले आहे. हे गाणे खुद्द ब्रेट लीने हिंदीमध्ये गायले होते. मैदानावर १०३४ विकेट्स घेणाऱ्या ब्रेटलीने आशा ताईंसोबत गायलेले हे गाणे आजही क्रिकेट आणि संगीत प्रेमींच्या आवडीचे आहे. ब्रेट लीच्या गोलंदाजीसोबतच त्याची आशा ताईंसोबतची केमिस्ट्री चाहत्यांनी भोवली होती. (Top Trending Headline)

आशा भोसले या एक सर्वोत्कृष्ट गायिका तर होत्याच शिवाय त्यांनी अभिनेत्री म्हणून देखील काम केले होते. आशा यांनी वयाच्या 79 व्या वर्षी अभिनेत्री म्हणून चित्रपटांमध्ये पदार्पण केले होते. त्यांनी एका चित्रपटात मुख्य अभिनेत्री ही भूमिका साकारली होती. 2013 साली आलेल्या ‘माई’ नावाच्या फॅमिली ड्रामामध्ये आशा भोसले यांनी अभिनय केला. अभिनेत्री म्हणून हा त्यांचा पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटात त्यांची प्रमुख भूमिका होती. लीड ॲक्ट्रेस म्हणून हा त्यांचा पहिलाच चित्रपट होता. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

गाजावाजा स्पेशलमनोरंजन

Marathi Legends : या तिन्ही मराठी दिग्गजांनी साऊथचं अख्खं मार्केट खाल्लय !

बॉलिवूडमध्ये एक छोटासा रोल मिळाल्यावर मराठी कलाकारांना मीपणा येतो, अशा कमेंट्स मराठी...

गाजावाजा स्पेशलमनोरंजन

Marathi Cinema : ११० मराठी चित्रपटांनी फक्त ९९ कोटी कमावले…

२०२५ हे वर्ष तसं मराठी इंडस्ट्रीसाठी फार खास राहिलं नाही. काही आयकॉनिक...

मनोरंजन

Dhurandhar : धुरंधरचा बॉक्स ऑफिसवर धुरळा !

२०२५ हे वर्ष खऱ्या अर्थाने अभिनेता अक्षय खन्ना याचं ठरलंय असं म्हणायला...

मनोरंजन

Dharmendra : ….जेव्हा अंडरवर्ल्डलाच धर्मेंद्र यांनी धमकी देऊन केले होते गारद

‘ही मॅन’ अशी ओळख असलेल्या धर्मेंद्र यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!