Home लाईफ स्टाईल Face : नाक आणि ओठांच्या मधोमध असलेल्या भागाला काय म्हणतात?
लाईफ स्टाईल

Face : नाक आणि ओठांच्या मधोमध असलेल्या भागाला काय म्हणतात?

58
Long Distance Relationship
Long Distance Relationship

आपले शरीर हे अनेक अवयवांनी बनले आहे. प्रत्येक अवयव आपले शरीर अधिक उत्तम राखण्यासाठी सतत त्याचे योजलेले कार्य करत असतो. पृथ्वीवरील असलेले आपण सर्व मनुष्य हे जरी एकसारखे दिसायला नसले तरी त्यांची ठेवण आणि सर्व अवयव हे एकसारखेच असतात. आता आपल्या शरीरामध्ये अनेक लहान मोठे अवयव काम करतात. काही अवयवांना काम नसले तरी ते नुसते असणे देखील महत्त्वाचे असते. आपल्याला आपल्या मोजक्याच अवयवांची माहिती असते. मोजक्याच अवयवांचे कार्य माहिती असते. मात्र आपल्या शरीरात असे देखील काही अवयव आहेत, ज्याकडे आपण कधी लक्ष देखील देत नाही, आणि जरी लक्ष दिले तरी ते का आहे, असा प्रश्न देखील आपल्याला पडत नाही. मात्र आज आम्ही तुम्हाला आपल्या शरीरातील एका अशाच अवयवांबद्दल माहिती देणार आहोत, ज्याकडे आपण रोज बघतो मात्र त्याची आपल्याला काहीच माहिती नाहीये. (Face)

आपल्या चेहऱ्यावरील प्रत्येक लहान-मोठ्या रेषेला एक शास्त्रीय महत्त्व असते. अशीच एक विशेष रेषा म्हणजे नाक आणि वरच्या ओठाच्या मध्यभागी असणारी उभी खाच. याच खाचेला वैद्यकीय भाषेत फिल्ट्रम असे म्हणतात. याला ओष्ठखात म्हणजेच ओठांच्या खालचा भाग असा होतो. हा शब्द बोलायला थोडा अवघड आहे. फिल्ट्रम आपल्या नाकाच्या अगदी खाली आणि आपल्या ओठांच्या वर आहे. त्यावर दोन पाईप सारख्या लाइन आहेत. ही रेषा केवळ सौंदर्यात भर घालत नाही, तर ती मानवाच्या गर्भातील विकासाची कहाणी सांगते. भ्रूणशास्त्रानुसार आईच्या गर्भात असताना मानवी चेहऱ्याचा विकास हा एखाद्या कोलाजप्रमाणे होतो. (Marathi)

Face

नाक आणि ओठांच्या मधील जागेचं काम देखील ठरलेलं आहे. ही जागा अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडते. माणसाचे ओठ हे सौंदर्यासोबतच चव, शब्दोच्चार आदींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. तुम्ही एका गोष्ट निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल, उन्हाळ्यात किंवा व्यायाम केल्यावर शरीराला घाम आला तरी ओठांना कधीच घाम येत नाही. उलट उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात ओठ कोरडे पडतात. यामागे देखील खास कारण आहे. आपल्या शरीरात नाक आणि ओठांच्या मधोमध एक भाग असतो. ही रेषा चेहर्‍याच्या समरूपतेसाठी महत्त्वाची मानली जाते. ही रेषा चेहऱ्याचे सौंदर्य वाढवते. यामुळे चेहरा अधिक तरुण आणि आकर्षक दिसतो. (Latest Marathi Headline)

फिल्ट्रम फक्त सौंदर्यच खुलवत नाही तर आपल्या आरोग्याबद्दलही सांगते. काही आजारांमध्ये याचा आकार बदलतो. उदाहरणार्थ, फीटल अल्कोहल सिंड्रोम. आजकाल सौंदर्य आणि फेशिअल फीचर्सबद्दल लोक जागरूक आहेत. योग्य फिल्ट्रम असणे हे नैसर्गिक सुंदरतेचे एक लक्षण मानले जाते. जर ही प्रक्रिया गर्भात नीट पूर्ण झाली नाही, तर मुलांचे ओठ किंवा टाळू दुभंगलेली असू शकते. मानवामध्ये या रेषेचा कोणताही विशेष उपयोग नसला, तरी प्राण्यांसाठी ती जीवनावश्यक आहे. कुत्रे, मांजर आणि काही इतर सस्तन प्राण्यांमध्ये फिल्ट्रमद्वारे नाकातील ओलावा वरच्या ओठापर्यंत पोहोचवला जातो. यामुळे त्यांचे नाक नेहमी ओले राहते, जे हवेतील वासाचे कण पकडण्यासाठी आणि वासाची दिशा ओळखण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरते. (Top Stories)

=======

Namaskar : महिलांनी साष्टांग नमस्कार का करू नये?

=======

अनेक संस्कृतींमध्ये या रेषेबद्दल मनोरंजक दंतकथा आहेत. काही लोककथांनुसार, जन्माच्या वेळी देवाचा स्पर्श किंवा देवदूताने लावलेले बोट म्हणजे ही रेषा आहे, असे मानले जाते. मात्र, विज्ञानाने हे सिद्ध केले आहे की, ही पूर्णपणे एक नैसर्गिक शारीरिक प्रक्रिया आहे. ओठ हा शरीरातला एकमेव भाग असतो ज्याला कधीच घाम येत नाही. घाम येण्यासाठीच्या स्वेट ग्लँड ओठांमध्ये नसतात, त्यामुळे ओठाला घाम येत नाही. शरीराच्या इतर अवयवांच्या तुलनेत उन्हाळ्यात किंवा कडाक्याच्या थंडीत ओठ लवकर कोरडे पडतात. पण त्यांना घाम येत नाही. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

लाईफ स्टाईल

Gold : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याला एवढे महत्त्व का आहे?

आज अक्षय्य तृतीया. साडे तीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेचे ओळख...

Parshuram
लाईफ स्टाईल

Parshuram : भगवान परशुरामांबद्दलची रंजक तथ्ये

परशुराम यांना भगवान विष्णू यांचा सहावा अवतार समजले जाते. मान्यतेनुसार भगवान विष्णू...

लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला ‘ही’ कामे करून पुण्य कमवा

वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक...

लाईफ स्टाईल

Vallabhacharya : वल्लभाचार्य जयंती – कोण होते कृष्णभक्त वल्लभाचार्य?

आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची अकरावी तिथी अर्थात. आज चैत्र महिन्यातील एकादशीचा...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!