Home लाईफ स्टाईल Temple : भारतातील ‘या’ मंदिरांमध्ये भाविकांना दिला जातो अजब प्रसाद
लाईफ स्टाईल

Temple : भारतातील ‘या’ मंदिरांमध्ये भाविकांना दिला जातो अजब प्रसाद

0

मंदिरांच्या देश अशी ओळख असलेल्या भारतात विविध देवतांची अगणित मंदिरं आहेत. मुख्य म्हणजे या प्रत्येक मंदिराची वैशिष्ट्ये आणि इतिहास अतिशय खास आहे. जेव्हा जेव्हा आपण मंदिरात जातो तेव्हा तेव्हा देवासाठी फुले हार प्रसाद, ओटी आदी अनेक गोष्टी घेऊन जातो आणि देवाला अर्पण करतो. मंदिरात देवाचे दर्शन झाल्यानंतर आपल्याला प्रसाद दिला जातो. प्रसाद ही प्रत्येक मंदिराची खासियत असते. आता प्रसाद म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर येतो तो शिरा, खडीसाखर, लाडू, खिरापत, पेढे, फळं, सुकामेवा आदी. बहुतांश मंदिरांमध्ये यापैकी काही गोष्टी प्रसाद म्हणून भाविकांमध्ये वाटप केल्या जातात. मात्र भारतात असे देखील खास मंदिरं आहेत, जे त्यांच्या अतिशय हटके प्रसादासाठी संपूर्ण देशात प्रसिद्ध आहेत. (Temple)

जीविका माताजी मंदिर, राजकोट
भारतात एक मंदिर असे आहे, जिथे प्रसाद म्हणून चक्क पिझ्झा, सँडविच दिले जाते. ऐकून आश्चर्य वाटले ना..? पण हे खरे आहे. राजकोटमधील रापुताना येथील जीविका माताजी मंदिर अंदाजे ६५-७० वर्षे जुने आहे. भाविक येथे त्यांच्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यासाठी येतात. पूर्वी या मंदिरात फक्त नारळ आणि साखर प्रसाद अर्पण केला जात असे. मात्र काही काळाने मुलांना आकर्षित करण्यासाठी, आता बर्गर, सँडविच आणि पिझ्झा सारखे नानाविध फॅन्सी स्वादिष्ट पदार्थ अर्पण केले जातात. या अशा हटके प्रसादामुळे हे मंदिर खूपच लोकप्रिय आहे. (Marathi)

Temple

जय दुर्गा पीठम मंदिर, चेन्नई
चेन्नईतील पडप्पाई येथील जय दुर्गा पीठम मंदिरातही भक्त पिझ्झा, बर्गर आणि सँडविच देवाला अर्पण करतात. या मंदिराची स्थापना हर्बल ऑन्कोलॉजिस्ट के. श्री श्रीधर यांनी केली होती. भक्त त्यांच्या जन्मतारखेची नोंदणी देखील करू शकतात आणि त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना प्रसाद म्हणून केक दिला जातो. तथापि, सर्व प्रसाद पूर्ण शुद्धतेने आणि पवित्र स्वयंपाकघरात तयार केला जातो आणि देवाला अर्पण केला जातो. (Latest Marathi Headline)

Temple

थेक्कन पलानी बालसुब्रमण्य मंदिर अलेप्पी
केरळ राज्यातील अलेप्पी शहरात असलेले थेक्कन पलानी बालसुब्रमण्य मंदिर हे एक अद्वितीय धार्मिक स्थळ आहे जिथे भक्त भगवान मुरुगनला चॉकलेट अर्पण करतात. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे भगवान मुरुगन यांच्या बालरूपाची पूजा केली जाते, ज्यांना ‘मंचा मुरुगन’ म्हणून ओळखले जाते. दरवर्षी भक्त चॉकलेटने भरलेले बॉक्स आणतात आणि भगवान मुरुगनच्या चरणी अर्पण करतात. पूजा झाल्यानंतर, तेच चॉकलेट भक्तांना प्रसाद म्हणून वाटले जातात. ही परंपरा भक्तांसाठी विशेष श्रद्धा आणि श्रद्धेचे प्रतीक बनली आहे. (Top Stories)

Temple

=========

Tulshi Pujan : २५ डिसेंबरला साजरे होणाऱ्या तुळशी पूजनाचे महत्त्व

Tulsi Types : जाणून घ्या तुळशीचे ५ प्रकार आणि त्यांचे औषधी गुणधर्म

=========

चायनीज काली मंदिर, कोलकाता
कोलकात्यातील टेंग्रा परिसरात असलेले हे मंदिर ‘चिनी काली मंदिर’ म्हणून प्रसिद्ध आहे. ६० वर्षांपूर्वी या शहरातील एका चिनी कुटुंबातील एक मूल आजारी पडले. खूप ठिकाणी उपचार घेऊनही फरक पडत नसल्याने त्याचे पालक त्याला अशा ठिकाणी घेऊन गेले जिथे एका झाडाखाली दोन काळे दगड होते, ज्यांची लोक माता काली म्हणून पूजा करायचे. त्यांनी अनेक दिवस आई कालीची प्रार्थना केली आणि तो मुलगा बरा झाला. या लोकांनी त्यांच्या खाद्यसंस्कृतीप्रमाणे काली मातेला नूडल्सचा नैवेद्या अर्पण करण्यास सुरुवात केली, जी हळूहळू मंदिराची परंपरा बनली. (Social News)

Temple

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

लाईफ स्टाईल

Gold : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याला एवढे महत्त्व का आहे?

आज अक्षय्य तृतीया. साडे तीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेचे ओळख...

Parshuram
लाईफ स्टाईल

Parshuram : भगवान परशुरामांबद्दलची रंजक तथ्ये

परशुराम यांना भगवान विष्णू यांचा सहावा अवतार समजले जाते. मान्यतेनुसार भगवान विष्णू...

लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला ‘ही’ कामे करून पुण्य कमवा

वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक...

लाईफ स्टाईल

Vallabhacharya : वल्लभाचार्य जयंती – कोण होते कृष्णभक्त वल्लभाचार्य?

आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची अकरावी तिथी अर्थात. आज चैत्र महिन्यातील एकादशीचा...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!