Home लाईफ स्टाईल Beauty Treatment : Botox ट्रीटमेंट म्हणजे नक्की काय? काय आहे याचे फायदे
लाईफ स्टाईल

Beauty Treatment : Botox ट्रीटमेंट म्हणजे नक्की काय? काय आहे याचे फायदे

0

प्रत्येक स्त्रीलाच आपण सुंदर दिसावे असे वाटत असते. वय वाढले तरी आपण कायम चिरतरुण दिसावे यासाठी प्रत्येक स्त्री प्रयत्न करत असते. चेहऱ्यावर वयानुसार सुरकुत्या पडणे, त्वचा सैल होणे, डाग पडणे, चेहरा काळा होणे आदी अनेक त्रास जाणवायला लागतात. मात्र हा बदल कोणत्याही स्त्रीला न आवडणारा आहे. त्यामुळे आपण कायम सुंदर दिसावे यासाठी फक्त पार्लरमध्ये जाऊन विविध ट्रीटमेंट घेणे देखील लाभदायक ठरत नाही. यासाठीच सध्या काही ब्युटी ट्रीटमेंट खूपच लोकप्रिय होताना दिसत आहे. बोटॉक्स कॉस्मेटिक ट्रीटमेंट ही यातलीच एक उपचार पद्धती आहे. (Beauty Tretment)

आपण अनेकदा या बोटॉक्स कॉस्मेटिक ट्रीटमेंटबद्दल ऐकले असेल. मनोरंजनविश्वातील बहुतांश अभिनेत्री ही बोटॉक्स कॉस्मेटिक ट्रीटमेंट करून आपले सौंदर्य टिकवण्याचा प्रयत्न करतात. अनेक अभिनेत्री मीडियासमोर हे मान्य करतात तर काही करत नाही. मात्र बोटॉक्स कॉस्मेटिक ट्रीटमेंट बॉलिवूडमध्ये आणि आता सामान्य महिलांमध्ये हळूहळू खूपच लोकप्रिय होताना दिसत आहे. मात्र बोटॉक्स कॉस्मेटिक ट्रीटमेंट नक्की आहे काय? तिचे काय फायदे आणि तोटे आहेत? चला जाणून घेऊया. (Botox Treatment)

बोटॉक्स आणि फिलर्स या ट्रीटमेंटचा वापर करून त्वचेची निगा राखणं शक्य आहे. ही एक प्रकारची अँटिएजिंग ट्रीटमेंट आहे. या ट्रीटमेंटमुळं कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. तसेच ही ट्रीटमेंट वेदनारहित मानली जाते. सध्याच्या काळात विशेषतः तरुणींमध्ये ही ट्रीटमेंट चर्चेचा विषय ठरली आहे. बोटॉक्स हे एक न्यूरोटॉक्सिक प्रथिन आहे जे क्लोस्ट्रिडियम बोटुलिनम या जीवाणूद्वारे तयार होते. बोटॉक्सच्या परिणामकारकतेचे मूलभूत तत्त्व हे स्नायूंच्या आकुंचनांना तात्पुरते प्रतिबंधित करण्याच्या क्षमतेमध्ये आहे. चेहरा अधिक चांगला दिसावा आणि त्यावर वृद्धत्वाची लक्षणं दिसू नयेत, यासाठी ही ट्रीटमेंट फायदेशीर ठरते. बोटॉक्स ट्रीटमेंट चेहऱ्यावरील स्नायूंना रिलॅक्स करते. (Marathi)

बोटॉक्स म्हणजे काय?
बोटॉक्स हे एक प्रकारचे इंजेक्शन असते. हे इंजेक्शन बोटुलिनम नावाच्या औषधापासून बनवले जाते. या औषधामुळे नसांवर परिणाम होतो आणि मसल्स लवचिक बनतात. त्यामुळे याचा वापर कॉस्मेटिक सर्जरी आणि वैद्यकिय अभ्यासात केला जातो. या इंजेक्शनमुळे सुरकुत्या कमी होतात आणि मायग्रेनच्या दुखण्यापासून आराम मिळतो. पण, या बोटॉक्स ट्रिटमेंटची प्रभाव खूप कमी महिने राहतो कालांतराने हळूहळू पूर्णपणे नाहीसा होत जातो. (Top Marathi Headline )

Beauty Treatment

बोटॉक्स ट्रिटमेंट केल्यानंतर त्वचेवरील डाग दूर होतात तर फिलर्स केल्यामुळे चेहऱ्यावरील खोलवर असलेल्या सुरकुत्या निघून जातात. चेहऱ्यावर फिलर्स केल्यानंतर मसाज करू नये. तसेच चेहऱ्यावरील त्वचेला संसर्ग झाला असेल तर फिलर्स करू नये. ही ट्रिटमेंट घेतल्यानंतर काही दिवस धूळीत आणि कडक उन्हात जाऊ नये. बोटॉक्स ट्रिटमेंट करताना तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि त्यांच्या देखरेखी खाली करावी. त्वचेच्या आरोग्यासाठी बोटॉक्स ट्रीटमेंट फायदेशीर ठरते. (Latest Marathi News)

चेहरा पातळ करण्यासाठीदेखील ट्रीटमेंट उपयुक्त ठरते. बोटॉक्स ट्रीटमेंट केल्यानंतर काही तास संबंधित भागावर मसाज करणं टाळावे. या ट्रीटमेंट नंतर सौंदर्य प्रसाधनं वापरण्याची जास्त गरज भासत नाही. तसेच फिलर्स ट्रीटमेंट घेतल्यानंतर मृत त्वचा तजेलदार होण्यास मदत होते. या ट्रीटमेंटमध्ये त्वचेच्या पृष्ठभागावर लहान आणि पातळ सुईने इंजेक्शन दिले जाते. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतात. या दोन्ही ट्रीटमेंट सुंदर दिसण्याची इच्छा असणाऱ्यांकरिता वरदान आहेत. उपकरणांव्दारे केल्या जाणाऱ्या या ट्रीटमेंटमुळे चेहरा आणि त्वचा सुंदर आणि आकर्षक होते. ही ट्रीटमेंट घेताना कोणत्याही स्वरुपाचा त्रास किंवा नुकसान होत नाही. बोटॉक्सचे उपचार गर्भवती महिला, स्तनपान करणाऱ्या महिला आणि चेहऱ्याचे मसल्स कमकुवत असणाऱ्या महिला यांनी करून घेऊ नयेत. (Top Trending Headline)

बोटॉक्स कोणत्या अवयवावर करतात?
– नाक
– भुवयांच्यामध्ये
– कपाळ
– ओठ
– हनुवटी
– जबड्याची रेषा
– मान

बोटॉक्समुळे होणारे फायदे
– सुरकुत्या कमी होतात
– अति घाम येणे थांबते (Top Stories)
– पाठदुखीपासून आराम
– त्वचेचा पोत सुधारतो
– मानदुखीवर परिणामकारक
– पायांमध्ये होणारी वेदना थांबते
– संधिवातापासून सुटका

=========

Beauty Tips : सनस्क्रिन की मॉइश्चराइजर…मेकअप करण्यापूर्वी चेहऱ्याला आधी काय लावावे?

Bhendi Water Benefits : भेंडीचे पाणी प्यायल्याने काय होते? वाचा फायदे आणि तोटे

Healthy Lifestyle Tips : घरबसल्या फक्त 15 मिनिटे करा ब्रिदिंग एक्सरसाइज, वजनही होईल कमी

=========

बोटॉक्सचे दुष्परिणाम
– इंजेक्शनच्या ठिकाणी सूज, वेदना आणि लालसरपणा
– त्वचेवर लालसरपणा
– डोकेदुखी
– मानदुखी
– मूत्रपिंडाशी संबंधित समस्या (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

लाईफ स्टाईल

Gold : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याला एवढे महत्त्व का आहे?

आज अक्षय्य तृतीया. साडे तीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेचे ओळख...

Parshuram
लाईफ स्टाईल

Parshuram : भगवान परशुरामांबद्दलची रंजक तथ्ये

परशुराम यांना भगवान विष्णू यांचा सहावा अवतार समजले जाते. मान्यतेनुसार भगवान विष्णू...

लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला ‘ही’ कामे करून पुण्य कमवा

वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक...

लाईफ स्टाईल

Vallabhacharya : वल्लभाचार्य जयंती – कोण होते कृष्णभक्त वल्लभाचार्य?

आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची अकरावी तिथी अर्थात. आज चैत्र महिन्यातील एकादशीचा...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!