Home गाजावाजा स्पेशल Shimga : कोकणात शिमग्याला पुजला जाणारा ‘संकासुर’ आहे तरी कोण?
गाजावाजा स्पेशल

Shimga : कोकणात शिमग्याला पुजला जाणारा ‘संकासुर’ आहे तरी कोण?

72

कोकण कायमच आपल्या सौंदर्यासाठी आणि इथल्या वैविध्यपूर्ण संस्कृतीसाठी ओळखले जाते. कोकणावर देवाने मुक्तहस्ताने सौंदर्य उधळले तर आहेच सोबतच इथल्या संस्कृतीने देखील जगावर जादू केली आहे. कोकणात गणेशोत्सवानंतरच सर्वात मोठा सण म्हणून होळीची ओळख आहे. जसे चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणाची वाट धरतात, तसेच होळीसाठी देखील लोकं दरवर्षी न चुकता कोकणात येतात. कोकणात होळीच्या सणाला शिमगा असे म्हटले जाते. होळीच्या सणाची खरी मजा कोकणात असते, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण होळीच्या काळात येथे होलिका दहन तर होतेच सोबतच पालखी देखील नाचवली जाते. कोकणातील शिमग्यामध्ये कायम ‘संकासुर’ या राक्षसाचे नाव घेतले जाते. पालखी महोत्सवामध्ये कायमच एक खास वेशभूषा करून संकासुर आपल्याला पाहायला मिळतो. (Shimga)

कोकणातील शिमगा उत्सवात आपल्याला डोक्यावर शंकूसारखी काळी टोपी, पांढरी दाढी, लोंबणारी लाल जीभ, अंगभर काळे कपडे, कंबरेला घुंगरू अशी राक्षसासारखी वेशभूषा केलेला माणूस गावभर फिरून लहान मुलांना घाबरवत असतो, हे आपण प्रत्यक्ष किंवा व्हिडिओमधून पाहिलेच असेल. पण हे सर्व कोकणच्या लोककलेचा आणि संस्कृतीचा एक भाग आहे. याच राक्षसाचे नाव आहे संकासूर आहे. कोकणातील या सणाच्या काळात ठिकठिकाणी संकासूराची वेशभूषा घातलेली लोकं होळीभोवती नाचत असतात. घरोघरी जात असतात. यांना अनेकांना हा संकासूर नेमका आहे तरी कोण हे माहीतच नाही? कोकणातल्या काही भागांमध्ये त्याला पुजले देखील जाते? तर काही भागांमध्ये त्याला भगवान श्रीकृष्ण यांच्यासोबत जोडल्याचे देखील दिसते. मग नक्की जाणून घेऊया याच शंकासुराबद्दल. (Todays Marathi Headline)

Shimga

संकासूर ही कोकणातील एक लोककला आहे. काळ्या रंगाचं वस्त्र घालून टोपी आणि पांढरी दाढी ठेवलेला, एक राक्षस गावात फिरत असतो. तो नाचत, सगळ्याचे मनोरंजन करतो. कोकणात शिमग्याला प्रत्येक गावात देवाची पालखी निघते. याच पालखीसोबत राक्षस कुळातला एक राक्षस म्हणजेच संकासूर फिरत असतो. संकासूर हा राजा होता आणि त्याने त्याची संपत्ती लोकांमध्ये वाटली. त्याने ज्ञानदानाचे मोठे काम केले असे येथील लोक सांगतात. कोकणात याच संकासुराला गावाचा रक्षक असल्याचे देखील मानले जाते. तो अनेकांना त्याच्या वेठीने म्हणजेच त्याच्या खास चिंध्यापासून बनवलेल्या काठीने मारत असतो, त्याचा हाच मार इथे चक्क आशीर्वाद समजला जातो. लहान लहान मुलं त्याच्याभोवती गिरक्या घालतात मात्र काही मुलं त्याला प्रचंड घाबरतात देखील! गेल्या शेकडो वर्षांपासून ही संकासुराची परंपरा कोकणात सुरूच आहे. या संकासूराला नवस ही केला जातो. नवस पूर्ण झाल्यावरती लोक मनोभावे नवस पूर्ण ही करतात, असा हा संकासूर दिसायला देवांसारखा नसला तरी देखील लोकं त्याला देव मानतात. (Social Updates)

याबद्दल एक आख्ययिका देखील सांगितली जाते. पुराणात हयग्रीव नावाचा दैत्य होता. त्याने ब्रम्हदेवाकडून वेद पळवले आणि समुद्रात शंखात जाऊन तो लपला. यानंतर भगवान विष्णू यांनी मत्स्य अवतार घेऊन त्याचा वध केला. हा हयग्रीव म्हणजेच संकासूर…असं म्हटलं जातं की हा ज्ञानदानाचं कामदेखील केलं होतं. काहींच्या मते तर संकासूर हा पराक्रमी आणि कष्टकरी राजा होता. त्यातच संकासुराला नवस बोलण्याची आणि फेडण्याची प्रथादेखील आहे. (Top Trending Headline)

काही भागांमध्ये संकासुराला भगवान श्रीकृष्ण यांचाही अवतार मानतात. त्याची दंतकथा अशी की, भगवान श्रीकृष्णाने ६५ दिवस सांदीपनी ऋषी यांच्याकडे वास्तव्य केलं. यावेळी त्यांनी सर्व विद्या संपादित केल्या. अखेरच्या दिवशी श्रीकृष्णाने सांदीपानी ऋषीना गुरुदक्षिणाबाबत विचारणा केली. तेव्हा त्यांनी सांगितलं की, माझा मुलगा समुद्राने गिळला आहे, तो मला हवा. मग श्रीकृष्ण समुद्राकडे गेले आणि समुद्राकडे गेल्यानंतर त्यांनी विचारणा केली कि सांदिपनी ऋषींचा मुलगा आम्हाला दे. समुद्रदेव म्हणाला की. मी तो गिळलेला नाही. परंतु माझ्या पोटामध्ये एक असुर आहे. (Top Stories)

=======

Shimga : कोकणचो शिमगो…कोकणातील पालखी परंपरा

=======

त्या असुराने गिळला असावा, त्याप्रमाणे भगवान श्री कृष्णाने सागरामध्ये उडी मारली. त्या असुराला ठार मारलं. पण त्याच्या पोटामध्ये तो मुलगा काही सापडला नाही. तेव्हा श्रीकृष्ण यांना आपल्याकडून चूक झाल्याची जाणीव झाली आणि त्यांनी त्या असुराला वरदान दिला की, तुझ्या केवळ दर्शनाने पाप नष्ट होतील, संकट दूर होतील. तुझी फाल्गुन महिन्यात पूजा केली जाईल. आणि हाच तो संकासूर आहे, ज्याची पूजा रत्नागिरी भागात केली जाते. दक्षित कोकणात फक्त संकासूर नाचवले जातात. किंवा दशावतार आणि इतर नाटकांमध्ये ते दिसून येतात. (Social News)

(टीपः हा लेख केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. आम्ही यातील तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

गाजावाजा स्पेशल

Akshaya Tritiya : जाणून घ्या अक्षय्य तृतीयेच्या दिवसाचे धार्मिक महत्त्व

हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीयेचा सण येत्या...

आंतरराष्ट्रीयगाजावाजा स्पेशल

US-Iran War : अमेरिका नमली की इराण घाबरलं ?

America, Israel आणि Iran यांचे युद्ध गेले ४० दिवस चालू आहे. रोजच्या...

गाजावाजा स्पेशल

Ekadshi : वैशाख महिन्यात येणाऱ्या वरुथिनी एकादशीचे महत्त्व

हिंदू धर्मात एकादशीला खूप महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता...

Flight Ticket Booking
गाजावाजा स्पेशल

E-Arrival Card नक्की काय आहे? कोणासाठी महत्वाचा आणि कोणती कागदपत्रे सादर करावी याबद्दल घ्या जाणून

E-Arrival Card :  भारतातील विमानतळ प्रवेश प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल होत आहे....

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!