संतांची भूमी म्हणून महाराष्ट्राची जगभर ओळख आहे. महाराष्ट्रामध्ये आजवर अनेक जगप्रसिद्ध संत होऊन गेले, ज्यांनी आपल्या वागण्या, बोलण्यातून कायमच समाजाला योग्य मार्ग दाखवला. याच संतांपैकी एक महत्त्वाचे संत म्हणजे, ‘संत तुकाराम’. संत परंपरेतील सर्वात वरचे आणि मोठे नाव म्हणजे संत तुकाराम. तुकाराम महाराजांनी कायमच साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ठेवली. विठ्ठल नावाने त्यांचे संपूर्ण आयुष्यच व्यापून गेले होते. संत तुकाराम हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत – कवी होते. त्यांंचा जन्म देेेहु या गावात वसंत पंचमीला-माघ शुद्ध पंचमीला झाला. पंढरपूरचा विठोबा हे तुकारामांचे आराध्यदैवत होते. तुकारामांना वारकरी ‘जगद्गुरू’ म्हणून ओळखतात. (Marathi)
‘जे का रंजले गांजले! त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा! देव तेथेची जाणावा!’ या उक्तीप्रमाणे त्यांनी त्यांचे आयुष्य जगले. मुखात केवळ विठ्ठल नाम आणि कर्तव्याला कायम पुढे. असे हे तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले आहेत. सदेह वैकुंठाला जाण्याचे भाग्य विष्णू अवतार असलेल्या ना श्रीरामांना मिळाले नाही श्रीकृष्णांना. हे भाग्य लाभले ते जगद्गुरू तुकाराम महाराजांना. फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ-गमन झाले असे मानले जाते. म्हणजेच संत तुकाराम यांना देव सदेह वैकुंठी घेऊन गेल्याची मान्यता आहे. या दिवसालाच ‘तुकाराम बीज’ म्हणून संबोधले जाते. (Latest Marathi Headline)

नुकताच ‘तुकाराम बीज’ हा दिवस साजरा करण्यात आला. संत तुकाराम हे सतराव्या शतकातील एक वारकरी संत, कवी होते. संत तुकारामांनी आपल्या साहित्यातून आणि कीर्तनांतून समाजाला अचूक मार्गदर्शन करण्याचे काम केले. संत तुकाराम बीजच्या दिवशी भाविक हे तुकाराम महाराजांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतात, नमन तसेच अभिवादन करतात. मात्र, संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठात गेले की नाही? याबाबत काहींची वेगळी मते आहेत. संत साहित्याचे अभ्यासक यांच्या मते, संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमन किंवा इतर बाबतीत कोणतेही ठोस पुरावे नसल्याचं बोलले जाते. (Top Stories)
संत तुकाराम यांचे देहू या आपल्या जन्म गावातच वैकुंठ गमन केले. त्या परिसरात एक मंदिर आहे. याच मंदिराच्या शेजारी एक नांदुरकी वृक्ष आहे. असे म्हटले जाते की, तुकाराम महाराज यांनी आपला देह ठेवण्यासाठी पांडुरंगाचे नामस्मरण केले. हे नामस्मरण त्यांनी नांदुरकी वृक्षाच्या छायेखाली केले. तुकाराम महाराज यांचे वैकुंठ गमन हे ग्रामस्थांच्या समोर झाले आणि तेव्हापासून ग्रामस्थ या नांदुरकी वृक्षासमोर नतमस्तक होतात. इतकेच नाही तर तुकाराम बीजच्या दिवशी आजही हा वृक्ष तुकाराम बिजेला बरोबर दुपारी १२:०२ वाजता तुकोबाराया वैकुंठाला गेले, त्या वेळी प्रत्यक्ष हलतो आणि याची अनुभूती सहस्रो भक्तगण घेतात. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics