तामिळनाडू येथील नामक्कल अंजनेय़र मंदिरात होणा-या चमत्काराची सर्वत्र चर्चा आहे. नमक्कल अंजनेयर मंदिर हे ५ व्या शतकातील मंदिर असून ते भगवान हनुमानाला समर्पित आहे. येथील हमुमानाची मूर्ती ही सुरुवातीला १८ फूट होती, आता ती त्याहून अधिक उंच झाल्याची माहिती आहे. ही मूर्ती एकाच दगडात कोरलेली आहे. हात जोडून उभे असलेले रामभक्त हनुमान हे या मंदिरात भविकांना विश्वरूप मुद्रेत दर्शन देतात. देशातील सगळ्यात उंच असलेल्या या हमुमानाच्या मूर्तीवर छप्पर बांधण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला गेला. मात्र या मूर्तीवरील छप्पर कधीही कायम राहिले नाही. नमक्कल अंजनेयर मंदिरामध्ये हनुमान जयंतीचा उत्सवही मोठ्या प्रमाणात साजरा होतो. पंगुणी उथिराम नावाचा हा उत्सव येथे मार्च ते एप्रिल महिन्यातील १५ दिवसात होतो. यावेळी हनुमानांसाठी वडा आणि मलईचा प्रसाद दाखवला जातो. हा प्रसाद ग्रहण करण्यासाठी देशभरातील हनुमान भक्त नमक्कल अंजनेयर मंदिरात गर्दी करतात. ( Namakkal Anjaneyar )

तामिळनाडूतील नमक्कल हनुमान मंदिर त्याच्या अनोख्या वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे. या मंदिरात हनुमानाच्या मूर्तीची उंची दररोज वाढत असल्याचे सांगण्यात येते. सध्या नमक्कल अंजनेयर मंदिरातील हुनमानाची मूर्ती ही २० फूट उंच झाली आहे. इतिहासकारांच्या मते, ही जगातील सर्वात जुन्या मूर्तींपैकी एक असून मूर्ती काळ्या ग्रॅनाइटच्या एका तुकड्यात कोरलेली आहे. मोकळ्या आकाशाखाली स्थापित या मूर्तीवर कुठल्याही प्रकारचे छप्पर हे टिकून रहात नाही. ही मूर्ती रोज वाढत असल्यामुळे यामध्ये प्रत्यक्ष हनुमानांचा वास असल्याची महती सांगण्यात येते. शिवाय येथे पूजा केल्यावर मंदिरातील हनुमानाची पूजा केल्याने माता सीता, लक्ष्मण, भगवान शंकर आणि शनी यांचे आशीर्वाद मिळतात. त्यामुळेच तामिळनाडूतील नमक्कल हनुमान मंदिरात देशभरातील हनुमान भक्त मोठ्या संख्येनं येतात. मंदिराच्या पुजा-यांच्या मते, भगवान हनुमान नमक्कलमध्ये त्यांच्या स्वयं-प्रकट स्वरूपात प्रकट झाले आहेत. त्यामुळेच त्यांना त्यांच्या डोक्यावर कुठलेही छप्पर मान्य नाही. या मूर्तीवर अनेकवेळा छप्पर बांधण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले आहेत. या मूर्तीच्या मागे एका व्यासपीठाला दोन मोठे खांब आहेत. त्यावरुन भगवान हनुमानाला अभिषेक केला जातो. आणखी एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या समोरील लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरातही छप्पर नाही. त्यामुळे या दोन मंदिरांमागे काय गुढ आहे, याची उत्सुकता भाविकांना असते.
नमक्कल अंजनेयर मंदिराचा इतिहास हा सुमारे १५०० वर्षांचा आहे. हे मंदिर नमक्कल किल्ल्याच्या पायथ्याशी आहे. नरसिंह स्वामी मंदिरापासून सुमारे शंभर मीटर अंतरावर हे हनुमान मंदिर आहे. येथून हनुमान हात जोडून लक्ष्मी नरसिंह स्वामींना नमस्कार करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. या स्वरूपामुळे नमक्कल हनुमानाला त्यांची विशिष्ट ओळख मिळाली आहे. असे मानले जाते की, वाईट सवयी, व्यसन आणि मानसिक दुर्बलतेने ग्रस्त असलेल्या लोकांना नमक्कल हनुमानाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांच्यामध्ये सकारात्मक बदल घडून येतो. ( Namakkal Anjaneyar )
=======
हे देखील वाचा : Bhramaramba Mallikarjuna Temple: शिव शक्तीचे एकमेव मंदिर
=======
या मंदिराबाबत एक आख्यायिकाही सांगण्यात येते, त्यानुसार भक्त प्रल्हादचे रक्षण करण्यासाठी, भगवान विष्णूने नरसिंह टेकडीवर हिरण्यकशिपूचा वध केला. त्यानंतर, भगवान नरसिंह बराच काळ याच ठिकाणी राहिले. त्यांचा राग शांत करण्यासाठी ते दंडकारण्याच्या जंगलात फिरत होते. या काळात, देवी लक्ष्मीने भगवान हनुमानाला नरसिंहाच्या रूपात भगवान विष्णूचे दर्शन मिळावे अशी प्रार्थना केली. भगवान हनुमानाने शालिग्रामच्या रूपातील मूर्ती लक्ष्मीच्या हातात ठेवली आणि कृपया त्याची काळजी घ्या. मी लवकरच परत येईन, असे सांगितले. त्यानंतर माता लक्ष्मीने शालिग्रामची मूर्ती नृसिंह पर्वताच्या जागी ठेवली. शालिग्राम वाढू लागला आणि त्याने डोंगराचे आकार धारण केले. हनुमान परत येईपर्यंत शालिग्राम स्वतःच एक डोंगर बनला होता. त्यानंतर भगवान नृसिंहांनी देवी लक्ष्मीला आणि हनुमानाला दर्शन दिले. तेव्हापासून, भगवान हनुमान या पर्वताचे रक्षण आणि सेवा करण्यासाठी येथेच वास्तव्याला राहिल्याचे सांगितले जाते. आता या नमक्कल अंजनेयर मंदिरामध्ये एप्रिलम महिन्यात येणा-या हनुमान जयंतींसाठी तयारी सुरु करण्यात आली आहे. या मंदिरात हा सोहळा तब्बल १५ दिवस साजरा होतो. त्यासाठी हनुमानाचे लाखो भाविक नमक्कल अंजनेयर मंदिर येतात. या भाविकांच्या सुविधांसाठी प्रशासनातर्फे विविध सुविधा करण्यात येत आहेत. ( Namakkal Anjaneyar )
सई बने
- 5th century temple
- abhishek ritual
- devotees pilgrimage
- growing statue
- Hanuman idol
- Hanuman Jayanti celebrations
- Hiranyakashipu.
- Lakshmi Narasimha Temple
- miracle
- Namakkal Anjaneyar Temple
- Namakkal Fort
- Narasimha hill
- open sky shrine
- Panguni Uthiram festival
- Prahlad legend
- Ram devotee
- roof cannot stay
- self-manifested Hanuman
- Shaligram story
- single granite rock
- spiritual belief.
- tallest Hanuman murti
- Tamil Nadu
- Vishwaroop darshan