Home लाईफ स्टाईल Tourism : जाणून घ्या जगातील अशी ठिकाणं जिथे माणसांना आहे बंदी
लाईफ स्टाईल

Tourism : जाणून घ्या जगातील अशी ठिकाणं जिथे माणसांना आहे बंदी

0
Shreyas Iyer

रोजच्या धकाधकीच्या आणि त्याच त्याच रुटीनमधून निवांतपणा मिळावा यासाठी जसे जमेल तसे फिरण्याचे प्लॅन्स आखले जातात. अनेक लोकांचा तर फिरणे हा छंदच आहे. त्यामुळे सुट्टी मिळेल तशी फिरण्याची मजा घेतली जाते. बऱ्याच लोकांनी तर या संपूर्ण जगाला याच आयुष्यात बघण्याचा संकल्प देखील घेतला आहे. कधी आपण विविध शहरांमध्ये, राज्यांमध्ये, देशांमध्ये फिरायला जातो. आपण ज्या जागा, जी ठिकाणं पाहिली नाही ती बघायला प्राधान्य देतो. मात्र तुम्हाला माहित आहे का की, या जगामध्ये तुम्ही कितीही ठरवले की, संपूर्ण जग बघणार तरी तुम्ही तुमचा हा संकल्प पूर्ण करू शकत नाही. याचे कारण म्हणजे या जगात अशा काही जागा आहेत, जिथे मनुष्याला बंदी आहे. बंदी असलेली ही ठिकाणं इतकी रहस्यमयी, धोकादायक किंवा मौल्यवान आहेत की तिथे सामान्य माणसाला पाय ठेवण्याची परवानगीच नाही. ही ठिकाणे निसर्गरक्षण, मानवी सुरक्षितता, वैज्ञानिक संशोधन किंवा प्राचीन वारसा वाचवण्यासाठी बंद केली आहेत. जाणून घेऊया ही ठिकाणं कोणती. (Tourism)

सर्टसी आइसलँड
हे बेत आइसलँडच्या दक्षिण किनारपट्टीवर स्थित आहे. सन १९६३-१९६७ दरम्यान ज्वालामुखीच्या उद्रेकातून अटलांटिक महासागरातून अचानक निर्माण झालेले हे बेट आहे. मानवी हस्तक्षेपाशिवाय निसर्ग कसा विकसित होतो हे अभ्यासण्यासाठी आइसलँड सरकारने येथे मानवी प्रवेश पूर्णपणे बंद केला आहे. फक्त खास परवानगी असलेले काही शास्त्रज्ञच येथे पाय ठेवू शकतात. २००८ मध्ये युनेस्कोने याला जागतिक वारसा स्थळ घोषित केले. (Marathi News)

Tourism

स्नेक आयलंड, ब्राझील
ब्राझीलमधील ‘इल्हा दा कुइमादा ग्रंज’ हे स्नेक आयलंड म्हणून ओळखले जाणारे बेट जगातील सर्वात धोकादायक ठिकाणांपैकी एक आहे. साओ पाउलोच्या किनारपट्टीवर असलेले हे बेट मानवी वस्तीसाठी पूर्णपणे प्रतिबंधित आहे, कारण येथे हजारो विषारी ‘गोल्डन लान्सहेड’ साप आढळतात. साओ पाउलो किनारपट्टीपासून ३५ किमी दूर असलेल्या या बेटावर जगातील सर्वात विषारी साप – गोल्डन लान्सहेड वायपर, हजारोंच्या संख्येने आढळतात. यांच्या एकाच दंशात माणसाचा जीव जाऊ शकतो. जनसुरक्षितता आणि या दुर्मीळ प्रजातीच्या संरक्षणासाठी ब्राझील सरकारने सर्वसामान्यांसाठी येथे पूर्णपणे बंदी घातली आहे. फक्त परवानगी असलेले शास्त्रज्ञच येथे जाऊ शकतात. (Top Stories)

Tourism

एरिया 51, अमेरिका
नेवाडा वाळवंटातील हे अमेरिकेचे अत्यंत गुप्त लष्करी तळ आहे. प्रगत विमाने आणि संरक्षण तंत्रज्ञानाच्या चाचण्या येथे होतात. मोशन सेन्सर्स, सशस्त्र गस्त आणि हवाई देखरेख यामुळे येथे प्रवेश करणे अशक्य आहे. जवळ जाणाऱ्यांनाही कठोर शिक्षा होते. यामुळेच एरिया ५१ जगातील सर्वात रहस्यमयी ठिकाण मानले जाते. एरिया ५१ बद्दल नेहमीच विचित्र तर्क वितर्क लावले जातात की, तेथे नक्की काय असेल. काही वेळेस एरिया ५१ बद्दलच्या अफवा सुद्धा उडतात. अमेरिकेतील नेवाडाच्या वाळवंटात असलेल्या वायुसैन्याच्या या फॅसिलिटीचा उद्देश क्लासीफाइड आहे. मात्र या ठिकाणी मनुष्याला जाण्यास बंदी घालण्यात येते. काही वेळेस या ठिकाणाबद्दल विविध गोष्टी बोलल्या जातात. मात्र वास्तविकरित्या येथील प्रकृति ही नेहमीच रहस्यात्मक आहे. (Marathi News)

Tourism

स्वालबार्ड ग्लोबल सीड वॉल्ट, नॉर्वे
भविष्यात जगात होणाऱ्या विनाशकारी घटनांच्या शक्यता लक्षात घेता झाडांच्या बीजांना संरक्षित करण्यासाठी एक जागतिक भांडारच्या रुपात कार्य करते. या सुविधेचा उद्देश असा की, जैविक विविधतेचे रक्षण करणे. अशातच या ठिकणी सामान्य लोकांना जाण्यास सक्त मनाई केली जाते. हे केंद्र नैसर्गिक आपत्ती, युद्ध किंवा हवामान बदलामुळे पिकांच्या प्रजाती नष्ट झाल्यास त्यांचे जतन करण्यासाठी जगभरातील बियाणांचे नमुने सुरक्षित ठेवते. हे २००८ मध्ये सुरू झाले, जिथे ४५ लाख पेक्षा जास्त पिकांच्या जाती साठवण्याची क्षमता आहे. (Top Marathi News)

Tourism

लास्को गुहा, फ्रान्स
१७,००० वर्षांपूर्वीच्या प्रागैतिहासिक भित्तिचित्रांसाठी प्रसिद्ध ही गुहा १९४० मध्ये सापडली. मात्र येथे येणाऱ्या पर्यटकांच्या श्वासातील आर्द्रता आणि बुरशीमुळे चित्रे खराब होऊ लागल्याने १९६३ मध्ये फ्रान्स सरकारने ती कायमची बंद केली. आज फक्त मोजक्या शास्त्रज्ञांनाच नियंत्रित वातावरणात प्रवेश मिळतो. या गुहेत सुमारे १७,००० वर्षांपूर्वीची ६०० हून अधिक चित्रे आणि १५०० हून अधिक कोरीवकाम येथे आहे. (Top Trending Headline)

Tourism

सेंटिनल बेट, भारत
भारतातील उत्तर सेंटिनल बेटावर बाहेरील लोकांना प्रवेश दिला जात नाही. बंगालच्या खाडीत असलेले उत्तर सेंटिनल बेट सेंटिनली जातीच्या लोकांचे मूळ घर आहे. नेहमीच या जातीची लोक स्वत:ला जगापासून दूर ठेवत आले आहेत. असे राहण्यामागील कारण असे की त्यांच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने ते काही गंभीर आजारांचा सामना करू शकत नाहीत. हे एक संरक्षित क्षेत्र आहे. येथील जातीच्या लोकांची जीवनशैली आणि बाहेरील लोकांना संभाव्यपणे नुकसान पोहचू नये म्हणून बाहेरच्या व्यक्तींना येथे प्रवेश दिला जात नाही. (Social News)

Tourism

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

लाईफ स्टाईल

Gold : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याला एवढे महत्त्व का आहे?

आज अक्षय्य तृतीया. साडे तीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेचे ओळख...

Parshuram
लाईफ स्टाईल

Parshuram : भगवान परशुरामांबद्दलची रंजक तथ्ये

परशुराम यांना भगवान विष्णू यांचा सहावा अवतार समजले जाते. मान्यतेनुसार भगवान विष्णू...

लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला ‘ही’ कामे करून पुण्य कमवा

वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक...

लाईफ स्टाईल

Vallabhacharya : वल्लभाचार्य जयंती – कोण होते कृष्णभक्त वल्लभाचार्य?

आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची अकरावी तिथी अर्थात. आज चैत्र महिन्यातील एकादशीचा...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!