महाभारातामधील कुंती आणि कर्णाची कथा आपल्या सर्वांनाच माहित आहे. पांडवांची आई असलेल्या कुंतीचा कर्ण हा पहिला मुलगा. परंतु कुंतीने त्याला समाजाकडून बदनामी होण्याच्या भीतीमुळे नदीत सोडून दिले. हाच कर्ण राधा आणि अधिरथ यांच्या हाती लागला आणि त्यांना त्याचा राधेय म्हणून सांभाळ केला. पुढच्या काळात दुर्योधनासोबत त्याची मैत्री झाली आणि कर्ण अंग देशाचा राजा झाला. असाच एक कर्ण सध्या महाराष्ट्रात फिरत असून त्याला त्याच्या आईला भेटायचे आहे. या नव्या काळातील कर्णाचे नाव फाल्गुन बिन्नेंडिज्क आहे. फाल्गुन हे ४१ वर्षीय आहेत. त्यांना जन्मानंतर अवघ्या तीन दिवसांनी त्यांच्या जन्मदात्या आईनं सोडून दिलं. पण या बाळाचं भाग्य उज्ज्वल होतं. ( Falgun Binnendijk )

एका अनाथआश्रमात हे तीन दिवसाचं बाळ आल्यावर त्याच्यावर उपचार करण्यात आले, आणि त्याला मुंबईला हलवण्यात आलं. मुंबईत नेदरलॅंडमधील एका दाम्पत्यानं या बाळाला दत्तक घेतलं. बाळाचं नाव अनाथाश्रमात फाल्गुन ठेवण्यात आले होते. दत्तक घेतलेल्या आईवडिलांनी हे नाव बदलले नाही. त्यामुळे या बाळाचा भारतासोबतचा धागा कायम राहिला. आता हेच बाळ डच महापौर म्हणून मानाच्या स्थानावर विराजमान झाले आहे. तरी आपली मुळं शोधण्याची इच्छा त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळेच आपल्या आईला फक्त बघायची इच्छा ठेऊन फाल्गुन यावेळी तिस-यांदा भारतात आले आहेत.
नेदरलँड्सचे भारतीय वंशाचे महापौर फाल्गुन बिन्नेंडिज्क यांची चर्चा सध्या सर्वत्र आहे. फाल्गुन बिन्नेंडिज्क यांना आधुनिक कर्णाची उपमा देण्यात येत आहे. नेदलॅंण्डमध्ये पालन पोषण झाले असले तरी फाल्गुन यांनी भारतीय संस्कृतीसोबत आपले नाते कायम ठेवले आहे. त्यामुळेच त्यांनी महाभारत वाचले. त्यातूनच त्यांना त्यांच्या भारतातल्या जन्मदात्रीची आठवण येऊ लागली. मग फाल्गुन आपल्या या आईला, फक्त एकदा तरी बघायचे आहे, तिला माझी खुशाली द्यायची आहे, याचा ध्यास घेऊन भारतात आले आहेत. वास्तविक ही फाल्गुन यांचा हा तिसरा भारत दौरा आहे. गेल्या दोनवेळी आईला शोधण्यात त्यांना अपयश आले, मात्र यावेळी आपण आपल्या जन्मदात्रीला नक्की शोधणार असा विश्वास त्यांना आहे. ४१ वर्षांपूर्वी नागपूरमधील एका आश्रयगृहात सोडून देण्यात आलेल्या फाल्गुन बिन्नेंडिज्क यांचा प्रवास हा अनोखा आहे. ( Falgun Binnendijk )
१० फेब्रुवारी १९८५ रोजी, महाराष्ट्रातील नागपूर येथे त्यांचा जन्म झाला. पण त्यांची आई ही अविवाहीत होती. त्यामुळे बाळाचा जन्म झाल्यावर आनंद होण्याऐवजी या आईला भीती अधिक वाटली. समाजात बदनामी होईल, या भीतीनं आईनं आपल्या अवघ्या तीन दिवसाच्या मुलाला नागपूरच्या अंबाझरी रोडवरील मातृ सेवा संघामध्ये सोडून दिले. यावेळी या बाळाची आई, २१ वर्षाची होती. ज्या नर्सच्या हातात या बाळाची जबाबदारी आली, तिनं या सर्व नोंदी करुन घेतल्या आणि बाळाचे नावही ठेवले. फाल्गुन असे नाव बाळाला देण्यात आले. हिंदू कॅलेंडरनुसार, बाळाला त्याची आई अनाथाश्रमात सोडून गेली तेव्हा फाल्गुन महिना होता. त्यामुळे त्याच महिन्याचे नाव बाळाला मिळाले, आणि हा बाळ फाल्गुन म्हणून ओळखला जाऊ लागला.
सुरुवातीचे काही दिवस फाल्गुनवर नागपूरच्या याच अनाथाश्रमात उपचार करण्यात आले. त्याची प्रकृती सुधारल्यावर काही आठवड्यांनंतर, फाल्गुनला मुंबईत आणण्यात आले. इथे फाल्गुनला दत्तक देण्यात आले. मुंबईला आलेल्या एका डच जोडप्याने त्याला दत्तक घेतले. ते त्याला नेदरलँड्सला घेऊन गेले. फाल्गुनला चांगले घर मिळाले, चांगले पालक मिळाले. त्यांनी त्याला उत्तम शिक्षण दिले. पण फाल्गुनचे नाव बदलले नाही, आणि त्याला दत्तक घेतले आहे, हे सत्यही त्याच्यापासून लपवले नाही. शाळेत अभ्यास करतांना त्याला भारताबद्दल माहिती मिळाली. मग नकाशातून भारत देश भेटू लागला. ( Falgun Binnendijk )
=======
हे देखील वाचा : Spain’s Crown Princess Leonor : स्पेनला मिळणार परीसारखी राणी
=======
तेव्हापासून त्याचे भारताबद्दल आकर्षण वाढले आणि आपल्या जैविक आईबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता वाढली. वैयक्तिक जीवनात त्याची उत्तम प्रगती होत होती. त्याच्या आईवडिलांनी त्याला सर्वोत्तम सुविधा दिल्या. सार्वजनिक क्षेत्रात काम करण्याची ओढ फाल्गुनला पहिल्यापासून होती, त्यामुळे शिक्षण झाल्यावर त्यानं राजकारणात प्रवेश केला. आता फाल्नुन अॅमस्टरडॅमपासून ३० किमी अंतरावर असलेल्या हीमस्टेडचे महापौर आहेत. त्यांचे लग्न झाले असून त्यांना चार मुले आहेत.
मात्र या सर्वात फाल्गुन हे आपल्या आईला कधीही विसरले नाहीत. त्यांनी २००६ मध्ये वयाच्या १८ व्या वर्षी भारतात आले होते. त्यानंतर २०१७ मध्ये, फाल्गुन भारतात आले. त्यांनी नागपूरमधील मातृ सेवा संघशी संपर्क साधला. तेव्हा त्यांना त्यांची जन्मतारीख सापडली, पण त्यांच्या आईला शोधण्यात अपयश आले. आता तिस-या फेरीत फाल्गुन हे आपल्या पत्नीसह भारतात आईला शोधण्यासाठी आले आहेत. यावेळी आपली आई नक्की भेटेल, आईला भेटल्यावर मला तिला मी चांगला आहे, काळजी करु नकोस, एवढंच सांगायचं आहे, असे फाल्गुन भावनिकपणे सांगत आहेत. म्हणूनच या आधुनिक कर्णाची आणि त्याच्या आईची भेट घडवून आणण्यासाठी अवघ्या सोशल मिडियावर मेसेजचा पाऊस पडत आहे. ( Falgun Binnendijk )
सई बने
- 1985 birth Nagpur
- abandoned newborn Nagpur
- adoption records
- adoption to Netherlands
- Ambazari Road
- Amsterdam nearby
- birth mother search
- Dutch couple adopted
- Dutch mayor
- emotional reunion hope
- Falguni Binnendijk
- family life four children.
- Heemstede mayor
- identity roots journey
- Indian culture connection
- Indian-origin politician
- Mahabharata Kunti Karna comparison
- Matru Seva Sangh
- modern Karna story
- Mumbai adoption
- name Falguni kept
- orphanage story
- searching biological mother
- social media help
- third India visit
- unwed mother stigma