Home लाईफ स्टाईल Chanakya : सतत अपयश येत असेल तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
लाईफ स्टाईल

Chanakya : सतत अपयश येत असेल तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

60

आजच्या काळात प्रत्येक जणं यश मिळवण्यासाठी झगडत आहे. प्रत्येकालाच आपल्या जीवनात, कामात, परीक्षेत यश मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र सगळ्यांनाच त्यांच्या प्रयत्नात यश मिळेल असे नाही. अनेकदा बऱ्याच लोकांना प्रयत्न करून देखील यश मिळत नाही. अशावेळी काही जणं निराश होतात तर काही जणं यश मिळवण्याच्या उद्देशाने पुन्हा अधिक जोमाने तयारीला लागतात. मात्र आजच्या काळात स्पर्धा इतकी वाढली आहे की, त्यात तग धरून राहणे, आणि जिंकण्याची पराकाष्ठा करणे आव्हानास्पद बनले आहे. प्रयत्न करून देखील यश मिळत नसलेल्या लोकांसाठी आचार्य चाणक्य यांनी काही गोष्टी सांगून ठेवल्या आहेत. आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात की माणसाच्या आयुष्यात अनेकदा असे कठीण प्रसंग येतात की, त्यावेळी नेमके काय करावे हे त्याला कळत नाही, तो निराश होतो. (Chanakya)

हा व्यक्तीच्या आयुष्यातील असा काळ असतो, ज्या काळात प्रत्येक ठिकाणी त्याचा पराभव होते असतो. मात्र अशा कठीण काळावर देखील तुम्ही मात करू शकता. मात्र त्यासाठी तुमच्याकडे काही गुण असणं गरजेचे आहे. चाणक्य म्हणतात तुम्हाला जर वारंवार आपयश येत असेल तर खचून जाऊ नका, अशा परिस्थितीमध्ये शांत राहा, तुम्हाला अपयश का येतं? त्याच्या कारणांचा शोध घ्या, त्या चुका पुन्हा करू नका. तुम्हाला यश नक्कीच मिळेल. आर्य चाणक्य म्हणतात की अपयशामधून तुम्हाला अनेक गोष्टी शिकायला मिळतात, त्यामुळे जर एखाद्या गोष्टीमध्ये अपयश आले तर प्रयत्न करणं सोडू नका असं चाणक्य यांनी म्हटले आहे. (Top Marathi News)

Chanakya

चाणक्य म्हणतात ज्या व्यक्तीकडे संयम असतो, तो व्यक्ती संपूर्ण जग जिंकण्याची ताकद ठेवतो. जेव्हा तुम्हाला एखाद्या कामात वारंवार अपयश येत आहे, तर अशावेळी खचून जाऊ नका, आणि ते कामही अर्धवट सोडू नका. फक्त एकच गोष्ट करा संयम ठेवा आणि योग्य वेळेची वाट पहा. योग्य वेळ येताच पुन्हा नव्या जोमाने ते काम करा तुम्हाला यश नक्की मिळणार. मात्र त्यासाठी तुमच्याकडे संयम नावाची गोष्ट असणं गरजेच आहे. चाणक्य म्हणतात की जो माणूस पूर्ण तयारीशिवाय कोणतंही काम सुरू करतो त्याला यश मिळत नाही. अपूर्ण तयारी नेहमीच पराभवाकडे घेऊन जाते. शिवाय बऱ्याच वेळा आपण कठोर परिश्रम करतो, परंतु चुकीच्या लोकांमुळे आपल्याला पराभवाचा सामना करावा लागतो. चुकीच्या संगतीमुळे मेहनत वाया जाते. वाईट संगत माणसाला योग्य मार्गापासून दूर नेते. (Latest Marathi Headline)

आर्य चाणक्य म्हणतात तुम्हाला जर वारंवार अपयश येत असेल तर येऊ द्या, मात्र तुम्ही खचून जाऊ नका, पराभवाच्या भीतीनं प्रयत्न करणं सोडू नका. कारण प्रयत्न सोडले तर ती तुमीच सर्वात मोठी हार असेल, पण तुम्ही जर सतत प्रयत्न करत राहिले तर एक दिवस यश निश्चितच तुमचं असणार आहे. आर्य चाणक्य म्हणतात तुम्ही पूर्ण क्षमतेने प्रयत्न करा, आपल्याला ही गोष्टी मिळवायचीच आहे, असं ठरवा आणि कामाला लागा. आत्मविश्वास ही मानवी जीवनातली सर्वात मोठी शिदोरी आहे. आत्मविश्वास असलेले लोक कधीच अपयशी ठरत नाहीत. आर्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार, आत्मविश्वास चांगला असेल तर व्यक्ती जीवनात कोणत्याही कठीण परिस्थितीचा सामना करण्यास सक्षम असते. (Top Stories)

==========

Flight Journey : फ्लाईटमध्ये बसल्यानंतर कान बंद का होतात?

==========

चाणक्य म्हणतात माणसाने नेहमी सावध असलं पाहिजे, तुमच्या आयुष्यात भविष्यात कधी कोणता प्रसंग येईल? हे तुम्ही सांगू शकत नाहीत. त्यामुळे जर समजा एखादा वाईट प्रसंग आलाच तर त्यासाठी तुम्ही नेहमी तयार राहिला पाहिजे. तसेच असे प्रसंग आयुष्यात येऊच नये यासाठी सतर्क असणं देखील तेवढंच गरजेच आहे. जे लोक मेहनती असतात ते कधीच अपयशी होत नाहीत. त्यांना त्यांच्या कष्टाचं फळ एक ना एक दिवस मिळतंच. त्यामुळे मेहनत कधीही टाळू नये. कठोर मेहनत हा यशाचा मूलमंत्र आहे. (Social News)

(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

Akshaya Tritiya
लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला मीठ का खरेदी केली जाते?

आता लवकरच अक्षय्य तृतीयेचा सण येत आहे. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला...

लाईफ स्टाईल

Gold : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याला एवढे महत्त्व का आहे?

आज अक्षय्य तृतीया. साडे तीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेचे ओळख...

Parshuram
लाईफ स्टाईल

Parshuram : भगवान परशुरामांबद्दलची रंजक तथ्ये

परशुराम यांना भगवान विष्णू यांचा सहावा अवतार समजले जाते. मान्यतेनुसार भगवान विष्णू...

लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला ‘ही’ कामे करून पुण्य कमवा

वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!