Home लाईफ स्टाईल Flight Journey : फ्लाईटमध्ये बसल्यानंतर कान बंद का होतात?
लाईफ स्टाईल

Flight Journey : फ्लाईटमध्ये बसल्यानंतर कान बंद का होतात?

58

आजच्या काळात विमान प्रवास खूपच सामान्य बनला आहे. विमानाने केला जाणारा प्रवास हा वेळ वाचवणारा, आरामदायक आणि सोयीस्कर असतो. असे असले तरी सामान्य माणसासाठी आजही विमान प्रवास करणे खूपच अवघड आहे. अतिशय महाग तिकीट दरांमुळे सामान्य माणसांसाठी विमान प्रवास आजही स्वप्नच आहे. मात्र ज्या लोकांनी विमानामध्ये प्रवास केला आहे, त्यांनी विमानात अनेकदा अनुभव घेतला असेल की, प्रवासादरम्यान कानात वेदना जाणवू लागतात. तर हा अनुभव काहीसा त्रासदायक वाटू लागतो. विमान प्रवास करताना आपण अनुभवले असेल की आपले कान हे बंद होतात. साधारणपणे या आवाजामुळे तुम्हाला काहीही इजा होत नाही पण काही लोकांना हा अनुभव अस्वस्थ वाटतो. ही समस्या विशेषतः विमानाच्या टेक-ऑफ किंवा लँडिंग दरम्यान उद्भवते. नक्की यामागे कारण काय आहे हे या लेखातून आपण जाणून घेऊया. (Flight Journey)

जेव्हा विमान हे टेकऑफ करते तेव्हा गुरूत्वाकर्षणच्या विरूद्ध दिशेने ते जाते. ते प्रेशर खूप लागते. त्या विशिष्ट कोनातून टेक ऑफ करणे हे फारच सिस्टेमॅटिक असते. यावेळी हवेचा दाब हा झपाट्याने कमी जास्त होत असतो. जर प्रवासादरम्यान सर्दी, खोकला, सायनस किंवा अ‍ॅलर्जीचा त्रास असेल, तर ही यूस्टेशियन ट्यूब सुजते आणि पूर्णपणे बंद होऊ शकते. त्यामुळे दाब अधिक तीव्रतेने वाढतो आणि कानदुखी अधिक असह्य होते. विशेषतः लहान मुलांमध्ये ही ट्यूब लहान असल्यामुळे त्यांना हा त्रास जास्त होतो. (Marathi)

विमान प्रवास करताना अनेक कान बंद होतात आणि ते दुखूही लागतात. कधी कधी हे प्रेशर फार जास्त असते. काहींच्या कानातून, नाकातूनही रक्त येते. याचे कारण असते ते म्हणजे दाबाचे. आपल्या कानात युस्टाचियन ट्यूब नावाची एक नळी असते. ती कानाच्या मधल्या भागाला घशाच्या मागच्या भागाशी जोडते. तिचे काम कानात हवेचा दाब समान ठेवणे आहे. तर अशावेळेस जेव्हा आपण विमानात प्रवास करतो तेव्हा हवेचा दाब वेगाने बदलतो. बऱ्याच वेळा ही नळी इतक्या लवकर प्रतिसाद देऊ शकत नाही, ज्यामुळे कानाच्या आत आणि बाहेरील दाबात असंतुलन निर्माण होते. याच कारणामुळे कानात ‘पॉप’ किंवा विचित्र आवाज ऐकू येतो, किंवा कानाला दडे बसतात याला एअरप्लेन इअर असे म्हणतात. (Latest Marathi Headline)

Flight Journey

कानात सौम्य वेदना जाणवणे, कान जड किंवा बंद झालेत असे वाटणे, काहींना तीव्र वेदना होणे, कानाचा पडद्यावर ताण पडणे, ऐकायला कमी येणे, कानातून रक्त येणे, चक्कर येणे, कानात सतत घंटी वाजत असलेला आवाज येत राहणे आदी एअरप्लेन इअरची लक्षणे आहेत. लहान मुलांना, सर्दी ताप असणाऱ्या लोकांना, णाला सायनस किंवा कानाचा संसर्ग असेल तर त्यांना याचा त्रास होतो. सोबतच ॲलर्जी असलेले लोकांना सुद्धा हा त्रास होऊ शकतो. जर तुम्ही विमान टेक-ऑफ किंवा लँडिंग दरम्यान झोपलेले असाल तेव्हा हा त्रास जाणवतो. (Top Stories)

=========

Train Journey : 21 दिवसांचा प्रवास, 19,000 किमी अंतर! जगातील सर्वात लांब रेल्वे प्रवास

=========

हा त्रास या वेदना कमी करण्याचा सगळ्यात सोपा आणि नैसर्गिक उपाय म्हणजे वारंवार थुकी गिळणं किंवा जांभई देणं. यामुळे यूस्टेशियन ट्यूब उघडते आणि कानात तयार झालेला दाब कमी होतो. टेकऑफ किंवा लँडिंगच्या क्षणी ही कृती नियमित केल्यास त्रास टाळता येतो. च्युइंगम चघळल्याने लाळ वाढते आणि गिळण्याची प्रक्रिया नैसर्गिकरित्या होते. लहान मुलांना च्युइंगम न देता दूध पाजणं किंवा पॅसिफायर देणं हा एक प्रभावी पर्याय ठरतो. यामुळे त्यांचाही कानाचा दाब नियंत्रित राहतो. नाक बंद करून, तोंड बंद ठेवून नाकातून सौम्यपणे हवा सोडण्याचा प्रयत्न करा. ही एक वैज्ञानिक पद्धत आहे जी कानातील आणि बाहेरील दाब समसमान ठेवते. सर्दी असल्यास प्रवासापूर्वी वाफ घेणं किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने डिकॉन्जेस्टंट घेणं उपयुक्त ठरते. प्रेशर इयरप्लग्स हे खास विमान प्रवासासाठी डिझाइन केलेले असतात. हे कानातील हवेचा दाब हळूहळू समायोजित करतात. अशा इयरप्लग्सचा वापर, विशेषतः सर्दी किंवा अॅलर्जी असलेल्या व्यक्तींनी करणे फायदेशीर ठरते. (Social News)

(टीप : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

लाईफ स्टाईल

Gold : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याला एवढे महत्त्व का आहे?

आज अक्षय्य तृतीया. साडे तीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेचे ओळख...

Parshuram
लाईफ स्टाईल

Parshuram : भगवान परशुरामांबद्दलची रंजक तथ्ये

परशुराम यांना भगवान विष्णू यांचा सहावा अवतार समजले जाते. मान्यतेनुसार भगवान विष्णू...

लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला ‘ही’ कामे करून पुण्य कमवा

वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक...

लाईफ स्टाईल

Vallabhacharya : वल्लभाचार्य जयंती – कोण होते कृष्णभक्त वल्लभाचार्य?

आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची अकरावी तिथी अर्थात. आज चैत्र महिन्यातील एकादशीचा...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!