Home आरोग्य Garlic : आरोग्यासाठी वरदान असलेल्या हिरव्या लसणाचे आहेत ‘हे’ फायदे
आरोग्य

Garlic : आरोग्यासाठी वरदान असलेल्या हिरव्या लसणाचे आहेत ‘हे’ फायदे

0

संपूर्ण जगामध्ये भारतीय जेवण प्रसिद्ध आहे. या जेवणाचे चाहते परदेशी लोकं देखील आहेत. भारतीय लोकांचे जेवण हे मसाल्यांशिवाय कायम अपूर्ण असते. मात्र या जेवणामध्ये अजून काही गोष्टी आहेत, ज्या आपल्या जेवणामध्ये कायम असतातच असतात. कांदा, टोमॅटो आणि लसूण यांच्याशिवाय जेवणाची आपण कल्पनाच करू शकत नाही. काही पदार्थांमध्ये कांदा, टोमॅटो नाही टाकला तरी लसूण तर बहुतांशी भाज्यांमध्ये, आमट्यांमध्ये वापरलाच जातो. (Green Garlic)

लसूण हा केवळ पदार्थांना उत्तम चव आणण्यासाठीच नाही तर आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. हे तर जवळपास सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र लसणाइतकीच लसणाची पात किंवा हिरवा लसूण देखील खूपच लाभदायक आहे. हिवाळा सुरु झाला की, बाजारात बऱ्याच ठिकाणी लसणाची पात आपल्याला पाहायला मिळते. अनेक भाज्यांमध्ये ही पात वापरली जाते. काही ठिकाणी तर कांद्याच्या पातीसारखी लसणाच्या पातीची देखील भाजी केली जाते. मग हिरवा लसूण किंवा लसणाची पात यांचे नक्की आरोग्याच्या दृष्टीने कोणते फायदे आहेत, चला जाणून घेऊया. (Marathi)

जमिनीत आपण दररोज वापरत असलेला पांढरा लसणाचा गड्डा पूर्ण तयार होण्याआधी जमिनीच्यावर लसणाची हिरवी गार पानं येतात किंवा ते असतातच, याच पानांना लसणाची पात म्हटले जाते. या लसणाच्या पातीचा वापर भाजी, कोशिंबीर, सूप किंवा चटणी आदी अनेक पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो. हिरव्या लसणात भरपूर पोषक तत्व असतात सोडियम, पोटॅशियम, लोह, कॅलरीज, कार्बोहायड्रेट्स, आहारातील फायबर, प्रथिने इ. हा हिरवा लसूण आपले अनेक जुने नवीन आजार बरे करण्यासाठी वापरला जातो. (Top Marathi News)

– हिरव्या लसणात अॅलिसिन नावाचे अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असते. हे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सक्रिय घटक म्हणून कार्य करते, शरिरातील जळजळ कमी करते, सर्दी, खोकला आणि फ्लूपासून आपला बचाव करते.

Garlic

– हिरव्या लसणात एलिसिन नावाचा अँटिऑक्सिडंट घटक भरपूर प्रमाणात असतो. शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी एलिसिन खूप मदत करते.

– हिरव्या लसणात अ‍ॅलिसिन नावाचे सल्फर कंपाऊंड असते, याच कंपाऊंडमुळे लसणाचा एक खासप्रकारचा v वास येतो. मुख्य म्हणजे याच खास कंपाऊंडमुळे, विशिष्ट सल्फर पदार्थामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. (Latest Marathi Headline)

– एका अभ्यासानुसार लसणात असलेल्या एलिसिनमुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजाराच्या शरीरातील पेशींची वाढ रोखण्यास काही प्रमाणात मदत होते.

– हिरवा लसूण अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांनी समृद्ध आहे. याव्यतिरिक्त, त्यात दाहक-विरोधी घटक देखील असतात, जे अनेक प्रकारच्या संक्रमणांपासून संरक्षण करतात. याशिवाय लसणाच्या पानात लोह मुबलक प्रमाणात असते. ज्या लोकांचे रक्त कमी आहे किंवा त्यांच्या शरीरात अशक्तपणा आहे, त्यांनी लसणाची पानं अवश्य खा. (Top Stories)

– लसूण हृदयासाठी एक उत्तम आहे. हिरव्या लसणात पॉलिसल्फाइड असते, जे हृदयाला निरोगी ठेवण्यास मदत करते. यात मँगनीज असते, हे खनिज शरीरात चांगली कोलेस्ट्रॉल पातळी राखते. शरीरात जितके जास्त मँगनीज असेल तितके हृदय चांगले राखण्यासाठी HDL चे प्रमाण जास्त असते.

========

Winter Foods : थंडीत शरीर उष्ण राहण्यासाठी खा हे फूड्स, रोगप्रतिकारक शक्तीही वाढेल

========

हिरव्या लसणाची चटणी
साहित्य:
लसणीची पात – १ जुडी, टोमॅटो – ३, हिरव्या मिरच्या ३-४, मूठभर कोथिंबीर, चमचाभर जीरे, मोहरी, चवीपुरते मीठ, फोडणीसाठी तेल, हिंग

कृती : लसणाची पात धुवून चिरून घ्या. चिरलेली पात, टोमॅटो, कोथिंबीर, मिरच्या, जीरे आणि मीठ मिक्सरला बारीक वाटून घ्या. तेल कडकडीत तापवून हिंग मोहोरीचा तडका करा. त्यात वाटलेली पेस्ट घाला. पाणी आटेपर्यंत परता. हिरवी चटणी तयार. (Top Trending News)

______________________________________________________________________________________________________________________________________

लसणाच्या पातीचा ठेचा
साहित्य:
लसणाची पात १ जूडी, लाल मिरच्या ४, जीरे १/४ टीस्पून, भाजलेले शेंगदाणे १ टेबलस्पून, चवीनुसार मीठ, फोडणीसाठी तेल, हिंग, जीरे

कृती: प्रथम आपण लसणाची पात स्वच्छ धुऊन पुसून चिरून घ्यावी. त्यानंतर मिक्सरमध्ये पात, लाल मिरची, जीरे, भाजलेले शेंगदाणे, चवीनुसार मीठ घालून मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. नंतर एक कढईमधे तेल गरम करून त्यात हिंग, जीरे घालून मग त्यात मिक्सरमध्ये वाटून घेतलेली ठेचा घालून परतावे घ्यावे. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

Blood Pressure 
आरोग्य

Health : स्मरणशक्ती शार्प ठेवण्यासाठी आजच आहारात करा ‘हे’ बदल

आपण दैनंदिन जीवनात करत असलेल्या प्रत्येक लहान सहान गोष्टीचा चांगला, वाईट परिणाम...

Potato
आरोग्य

Potato : खरंच बटाटा खाल्ल्याने वजन वाढते का?

आपल्या भारतीय घरांमध्ये स्वयंपाक घराचा राजा कोण असे विचारल्यावर सर्वच लोकांचे एकच...

Pooja Bhatt Relationships
आरोग्य

Dental Care : मोत्यासारखे पांढरेशुभ्र दात पाहिजे, मग आजच ‘हे’ उपाय करा

असे अनेकदा म्हटले जाते की दातांची ट्रीटमेंट ही सर्वात खर्चिक असते. त्यामुळे...

आरोग्य

Joints Sound : हाडांमधून येणाऱ्या कटकट आवाजाचे कारण आणि त्यावर उपाय

अनेकदा आपल्या लक्षात येते की, आपण खाली बसतो, उठतो तेव्हा आपल्या हाडांमधून...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!