Home आंतरराष्ट्रीय Alcohol Free Britain : अल्कोहल फ्री… ब्रिटनमध्ये नवा ट्रेंड
आंतरराष्ट्रीय

Alcohol Free Britain : अल्कोहल फ्री… ब्रिटनमध्ये नवा ट्रेंड

0

ब्रिटन हा राजेशाही संस्कृती जापोसणारा देश आहे. तशीच राजेशाही रहाणी या देशातील नागरिकांची आहे. ब्रिटीश नागरिकांमध्ये अल्कोहल, अर्थात दारु पिण्याचे प्रमाण हे जगात सर्वात अधिक होतं. दारु पिण्यासाठी या ब्रिटीश नागरिकांना कुठलंही कारण पुरेसं व्हायचं. सामाजिक मेळावे, तणावमुक्ती, सवय, पाहुणे, फिरण्यासाठी गेल्यावर अशा अनेक कारणांनी हे नागरिक दारुला जवळ करायचे. ब्रिटनमधील अनेक घरांमध्ये पारंपारिक पद्धतीनं दारु घरीही बनवली जायची. मात्र आता या सर्वात अमुलाग्र बदल होत चालला आहे. जी दारु ब्रिटनची ओळख होती, ती आता पुसण्यासारखी कमी होत चालली आहे. एकेकाळी जगात सर्वात अधिक दारु पिणारे म्हणून ब्रिटीशांची ओळख होती. पण आता हेच ब्रिटीश नागरिक दारुपासून दूर जाऊ लागले आहेत. एकतर ब्रिटीशांची नवी पिढी ही आरोग्याबाबत अतिशय जागरुक आहे. बहुधा आपल्या मोठ्या पिढीवर दारु पिऊन झालेला दुष्परिणाम त्यांनी पाहिला असणार. त्यातच ब्रिटनमध्ये आरोग्य सुविधांचा दर हा आभाळाला पोहचलेला आहे. या सर्वांपासून दूर राहायचे असेल तर दारुपासून दूर राहिले पाहिजे, हे ब्रिटनच्या नागिरकांनी जाणले आहे. त्यामुळेच या राजाच्या देशातील नागरिक आता झपाट्यानं अल्कोहल मुक्त होत आहेत. ( Alcohol Free Britain )

Alcohol Free Britain
Alcohol Free Britain

मुस्लिम देश सौदी अरेबियामध्ये दारूची दुकाने उघडली गेली असून या दारुच्या दुकानांसमोर लागलेल्या रांगाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र ज्या देशात दारु पिण्यासाठी कुठलिही परवानगी लागत नाही, अशा ब्रिटनमधील नागरिक झपाट्यानं या दारुपासून दूर होत आहेत. सध्या युरोप आणि ब्रिटनमध्ये ख्रिसमसची धूम सुरु आहे. अशात ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणात दारुची विक्री होते. मात्र या वर्षात दारुविक्री जवळपास थंडावल्यासारखी झाली आहे. ब्रिटनमधील काही सामाजिक संस्थांनी यासंदर्भात केलेल्या पाहणीनुसार ब्रिटनची नवी पिढी ही दारु पिण्याचे टाळत आहे. या अहवालाच्या आकडेवाडीनुसार ब्रिटनमध्ये दारूचे सेवन विक्रमी नीचांकी पातळीवर घसरले आहे. त्यामुळे या देशातील बिअर आणि वाईन बनवण्याच्या कंपन्यांवरही संकट उभं राहिले आहे.  

IWSR ही एक संशोधन कंपनी आहे. पेये आणि मद्य उद्योगासाठी डेटा, विश्लेषण आणि माहितीसाठी ही कंपनी काम करते. या संशोधन कंपनीने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी, ब्रिटनमधील सरासरी प्रौढ व्यक्ती आठवड्यातून १०.२ पेये घेत होती. १९९० नंतरची ही सर्वात कमी पातळी आहे. ब्रिटनमध्ये नो अल्कोहल हा ट्रेंड का वाढत आहे, याबाबतही या कंपनीनं अभ्यास केला आहे. त्यामध्ये मुख्य कारण ठरले आहे ती ब्रिटनमधील महागाई. गेल्या काही वर्षापासून ब्रिटनचे राहणीमान अत्यंत खर्चिक झाले आहे. त्याप्रमाणात तिथे नोक-यांची निर्मिती झालेली नाही. तसेच ज्या नोक-या आहेत, त्यामध्ये पुरेसा पगारही नसल्याची कामगारांची ओरड आहे. अशा परिस्थितीत व्यक्तीला नित्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी धडपड करावी लागत आहे. त्यात दारु ही आता चैन वाटत आहे. आर्थिक दबाव, आरोग्याबद्दल वाढती चिंता आणि वृद्धत्वाकडे वाढणारी लोकसंख्या ही सुद्धा या बदलाची प्रमुख कारणे असल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. ( Alcohol Free Britain )

ब्रिटनमधील आरोग्य सुविधाही या सर्वाला कारणीभूत ठरत असल्याचे IWSR चे म्हणणे आहे. ब्रिटनमध्ये आरोग्याच्या सुविधा या अत्यंत महाग आहेत. त्यात अती दारु पिण्यामुळे आजारांनी ग्रासलेल्या व्यक्तीला योग्य सुविधा न मिळाल्यामुळे त्यांचा जीवही गेला आहे. त्या कुटुंबातील मुलांवर या सर्वांचा परिणाम झाला असून त्यांनी आपसूकपणे दारु घेणे टाळले आहे. या सर्वात ब्रिटनमध्ये गेल्या काही वर्षापासून वाढत असलेली महागाईही कारणीभूत ठरली आहे. दारूच्या वाढत्या किमतींमुळे २०२४ च्या अखेरीस, ब्रिटनमध्ये दरडोई मद्य सेवन २०१९ च्या तुलनेत अंदाजे २० टक्क्यांनी कमी झाले आहे. २०२५ मध्ये हे प्रमाण अधिक कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.  

=======

हे देखील वाचा : Alcohol : सावधान! दारु पिण्याची सवय पुरुषांपेक्षा महिलांसाठी जास्त घातक

=======

ब्रिटनमधील १६-२४ वयोगटातील तरुणांमध्ये मद्यपान न करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. ही तरुण मुलं आपल्या आरोग्याबाबत अधिक जागरुक असून ती दारुऐवजी शरीराला पोषक अशी पेय पिण्यास प्राधान्य देत असल्याचेही उघड झाले आहे. यासर्वात जे आधी दारुच्या आहारी गेले होते, ते नागरिकही दारु सोडण्यासाठीचे अनेक उपाय करीत आहेत. त्यावर मद्यपान-मुक्त दिवस पाळणे, मद्यपान करताना कमी पिण्याचा प्रयत्न करणे, मद्यपान-मुक्त पर्यायांची निवड करणे, मद्यपानासाठी मोठा ब्रेक घेणे आणि मद्यपान-मुक्त रात्री घालवणे आदी अनेक उपाय करण्यात येत आहेत. एकूण काय ज्या देशानं जगभरात दारु पोहचवली तोच देश आता दारुमुक्त देश होण्याकडे वाटचाल करीत आहे. ( Alcohol Free Britain )

सई बने

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

Katrina Kaif
आंतरराष्ट्रीय

Jiang Xueqin : चीनच्या नॉस्ट्राडॅमसने सांगितले ट्रम्पचे भविष्य

अमेरिका-इराण युद्धामध्ये पंधरा दिवसांचा विराम आला आहे. यात चीनची भूमिका असल्याची माहिती...

Jewellery
आंतरराष्ट्रीय

Jared Kushner : ट्रम्पचा जावई आहे तरी कोण

अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धावर कायमचा विराम आणण्यासाठी पाकिस्तानची राजधानी...

Mobile
आंतरराष्ट्रीय

First Lady Melania Trump : अमेरिकेच्या फर्स्ट लेडीसाठी शाही सवारी

इराणमध्ये सत्तांतर करण्याच्या हेतूने अमेरिकेने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणविरुद्ध लष्करी मोहीम...

आंतरराष्ट्रीयगाजावाजा स्पेशल

US-Iran War : अमेरिका नमली की इराण घाबरलं ?

America, Israel आणि Iran यांचे युद्ध गेले ४० दिवस चालू आहे. रोजच्या...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!