Home आरोग्य Alcohol : सावधान! दारु पिण्याची सवय पुरुषांपेक्षा महिलांसाठी जास्त घातक
आरोग्य

Alcohol : सावधान! दारु पिण्याची सवय पुरुषांपेक्षा महिलांसाठी जास्त घातक

0
Indian alcohol brands
Indian alcohol brands

आज ३१ डिसेंबरच दिवस अर्थात २०२५ वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवशी संपूर्ण जगामध्ये थर्टी फर्स्टचा जश्न सुरु झाला असेल. २०२६ चे दणक्यात आणि जल्लोषात स्वागत करण्यासाठी अनेक ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे. आज सर्वच लोकं बेधुंद होऊन नवीन वर्षांचे स्वागत करतील. नवीन वर्षाची पार्टी म्हटल्यावर दारू सेवन आणि नॉन व्हेज आलेच. आता तर महिला देखील अतिशय बिधास्त होऊन दारूचे सेवन करतात. आधी देखील महिला दारू प्यायच्या, मात्र आधी त्या बंद दरवाजाच्या मागे असायच्या, आता तसे नाही आता महिला सर्वांसमोर दारूचे सेवन करताना दिसतात. मात्र दारूचे सेवन महिलांसाठी योग्य आहे की अयोग्य?  (Alcohol)

अल्कोहोलचे सेवन पुरुषांपेक्षा स्त्रियांना वेगळ्या प्रकारे प्रभावित करते. पुरुषांपेक्षा स्त्रियांना मद्यपी यकृतचा त्रास होण्याची अधिक शक्यता असते. अल्कोहोलचे कमी सेवन करूनही त्यांना अल्कोहोलिक यकृत रोगाचा त्रास होऊ शकतो. जर एखादी महिला आठवड्यातून १४ पेक्षा जास्त वेळेला दारू पीत असेल तर तिला अल्कोहोलिक यकृत रोग होण्याची शक्यता अधिक असते. या महिलांना लठ्ठपणा, आहारात जास्त चरबी आणि दररोज किंवा जास्त प्रमाणात मद्यपान हे देखील यकृत खराब होण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. अल्कोहोल घेतल्याने स्त्री आणि पुरुष दोघांनाही हृदयविकाराची समस्या होऊ शकते. परंतु केवळ महिलांचा विचार केला तर अति मद्यपानामुळे त्यांना खूप त्रास होऊ शकतो. सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या संशोधनातून असे समोर आले आहे की अति मद्यपान केल्याने महिलांना शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. (Women’s Health)

महिलांनी दारूचे सेवन केल्याने कोणते त्रास होतात?
– दारू प्यायल्याने महिलांमध्ये लिव्हर सिरोसिसची समस्या अधिक होऊ शकते. पुरुषांच्या तुलनेत महिला याने जास्त ग्रस्त होतात. दारुमुळे महिलांच्या मेंदूवरही परिणाम होऊ शकतो. (Todays Marathi Headline)

Alcohol

– बदलत्या काळानुसार महिलांनी सर्वाधिक दारू पिण्यास सुरुवात केली आहे. दारू पिणाऱ्या महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका सर्वाधिक असतो. अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या जर्नलमध्ये प्रकाशित नुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार, जेव्हा महिला आठवड्यातून किमान तीन ते सहा वेळेस अल्कोहोलिक ड्रिंक घेतात, तेव्हा स्तनाच्या कर्करोगाचा धोका सर्वात जास्त वाढू शकतो. (Marathi News)

– महिलांनी मद्यपान केल्याने लठ्ठपणा येऊ शकतो. महिलांनी दारू प्यायल्यास तुमच्या लठ्ठपणाची समस्या वाढू शकते. म्हणून, नेहमी मर्यादित प्रमाणातच अल्कोहोलचे सेवन करा. तज्ज्ञ सांगतात की पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये दारूचे दुष्परिणाम लवकर दिसतात. कमी प्रमाणात दारू घेतली तरी लिव्हरवर परिणाम होऊ शकतो आणि वजन वाढण्याची शक्यता असते. (Top Marathi Headline)

– मद्यपान करणाऱ्या महिलांना मधुमेहाचा धोका सर्वाधिक असतो. जर तुम्ही आधीच मधुमेहाचे रुग्ण असाल तर दारू तुमच्यासाठी विषासारखी आहे. अशा स्थितीत दारू पिणाऱ्या महिलांना मधुमेह आणि मानसिक तणाव दोन्ही असू शकतात.

– गर्भधारणेदरम्यान महिलांनी अल्कोहोल प्यायल्याने बाळाला फेटल अल्कोहोल स्पेक्ट्रम डिसऑर्डरचा धोका असतो. अल्कोहोलच्या अतिसेवनामुळे गर्भपात, स्टिल बॉर्न बेबी आणि बाळाला अनेक जन्मजात रोगांचा धोका वाढतो. दारू पिणाऱ्या महिलांमध्ये प्रजननाशी संबंधित समस्या वाढतात. मद्यपानामुळे वंध्यत्व येते. मद्यपानामुळे हार्मोनल इम्बॅलन्स होते. त्यामुळे मासिक पाळी अनियमित होते. बीज अंडे फुटण्यातही अडथळा निर्माण होतो, गर्भधारणा रुजण्यात अडथळा होतो. (Latest Marathi Headline )

========

Party : जाणून घ्या पार्टीमध्ये सर्व्ह केल्या जाणाऱ्या कॉकटेल आणि मॉकटेलमधील नेमका फरक

========

– मासिक पाळीच्या दरम्यान अल्कोहोल प्यायल्याने रक्त पातळ होणे किंवा अतिरिक्त रक्तस्त्रावाची समस्या होऊ शकते. एका मर्यादेत दारू पिणे वाईट नाही, पण जर तुम्ही जास्त प्रमाणात दारू पित असाल तर तुम्हाला अधिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. (Top Trending News)

– पुरुषांच्या तुलनेत महिलांसाठी दारू अधिक नुकसानदायक ठरते. महिलांच्या शरीरातील जैविक प्रक्रिया दारूचं विघटन कमी प्रमाणात करू शकतात, त्यामुळे लिव्हरवर दारूचा परिणाम वेगाने होतो. परिणामी लिव्हर डॅमेज होण्याचा धोका वाढतो. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

Blood Pressure 
आरोग्य

Health : स्मरणशक्ती शार्प ठेवण्यासाठी आजच आहारात करा ‘हे’ बदल

आपण दैनंदिन जीवनात करत असलेल्या प्रत्येक लहान सहान गोष्टीचा चांगला, वाईट परिणाम...

Potato
आरोग्य

Potato : खरंच बटाटा खाल्ल्याने वजन वाढते का?

आपल्या भारतीय घरांमध्ये स्वयंपाक घराचा राजा कोण असे विचारल्यावर सर्वच लोकांचे एकच...

Pooja Bhatt Relationships
आरोग्य

Dental Care : मोत्यासारखे पांढरेशुभ्र दात पाहिजे, मग आजच ‘हे’ उपाय करा

असे अनेकदा म्हटले जाते की दातांची ट्रीटमेंट ही सर्वात खर्चिक असते. त्यामुळे...

आरोग्य

Joints Sound : हाडांमधून येणाऱ्या कटकट आवाजाचे कारण आणि त्यावर उपाय

अनेकदा आपल्या लक्षात येते की, आपण खाली बसतो, उठतो तेव्हा आपल्या हाडांमधून...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!