प्रत्येक व्यक्ती ही आयुष्यात यश मिळवण्यासाठी धडपड करत असते. जीवन आपण यशस्वी व्हावे आणि आपल्याला सर्वच भौतिक सुख प्राप्त व्हावे अशी सगळ्यांचीच इच्छा असते. पण मेहनत घेऊनही कधी कधी आपल्याला यश मिळत नाही, अशा वेळेस हताश व्हायला होते. मनात नकारात्मक विचार येतात. जीवनात यश मिळवण्यासाठी आचार्य चाणक्य यांनी देखील आपल्याला काही गोष्टी करण्यास सांगितले आहे. चाणक्य हे भारतातील महान तत्त्वज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि सम्राट चंद्रगुप्त मौर्याचे महामंत्री होते. त्यांनी ‘अर्थशास्त्र’ आणि ‘चाणक्य नीती’ या ग्रंथांद्वारे राजकारण, समाजकारण आणि मानवी जीवनासाठी उपयुक्त असे अमूल्य विचार मांडले आहेत. त्यांची शिकवण आजही यशस्वी आयुष्यासाठी अत्यंत समर्पक मानली जाते. याच आचार्य चाणक्य यांनी जीवनात यश मिळवण्यासाठी काही गोष्टी सांगितल्या आहेत. जर आपण चाणक्य यांच्या विचारांनी जीवनात मार्गक्रमण केले तर नक्कीच आपल्याला यश मिळेल. (Chanakyaniti)
शिस्त
चाणक्य नीतीनुसार जर तुम्हाला जीवनात यश मिळवायचे असेल तर सर्वप्रथम आपण शिस्तबद्ध बनले पाहिजे. ज्या व्यक्तील वेळेचे महत्त्व असते. यश त्यामाणसाचे असते.यामुळेच प्रत्येकाने शिस्तीची भावना अंगीकारण्याचा आग्रह धरला पाहिजे. एखादी गोष्ट जेव्हा तुम्ही शिस्तबद्ध पद्धतीने करता तेव्हा त्या गोष्टी पूर्ण होतात.
ज्ञान
चाणक्य नीतीनुसार, यश मिळवण्यात ज्ञान सर्वात महत्त्वाची भूमिका बजावते. जो माणूस ज्ञानाने कमकुवत असतो, त्याला यश सहजासहजी मिळत नाही आणि त्याला संघर्ष करावा लागतो, तर जे ज्ञान मिळविण्यासाठी सदैव तत्पर असतात, त्यांना सहज यशाची चव चाखायला मिळते. यामुळेच अशा लोकांना लक्ष्मीची कृपा असते. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण काहीतरी शिकत राहायला हवे. शिकल्यामुळेच तुम्हाला जास्त पर्याय निर्माण होतात. त्यामुळे कायम काहीतरी शिकत राहा. (Todays Marathi Headline)
भीतीचा त्याग
चाणक्य नुसार, व्यक्तीच्या जीवनात कोणत्याही प्रकारची भीती नसावी. तुमची भीती नेहमी अपयशाकडे नेत असते. त्यामुळे कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी आत्मविश्वासाने पुढे जा आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी ठोस पावले उचलत राहा. (Marathi)
वेळेचे नियोजन
वेळेला जो महत्व देतो तो आयुष्यात नेहमी यशस्वी होतो असे म्हणतात. कारण वेळ एकदा हातून निसटली की तुम्ही पुन्हा ती आणू शकत नाही. जसे की परीक्षेच्या दिवशी वेळेवर पोहचला नाही तर पेपर देऊ शकणार नाही आणि त्यामुळे केलेली मेहनत वाया जाणार शिवाय एक वर्ष तुमचे निष्फळ जाणार. त्यामुळे वेळेची कदर करावी आणि नियोजन करावे. कोणतेही धेय्य गाठण्यासाठी त्याचे पूर्ण नियोजन केले तर यशाच्या दिशेने पाऊले पडू लागतात. (Top Trending News)

आत्मविश्वास
स्वतःबद्दल जर मनात आत्मविश्वास असला की जगात अशी कोणतीच गोष्ट नाही जी तुम्ही करू शकणार नाही. आत्मविश्वासाच्या बळावर लोक मोठं मोठ्या गोष्टी मिळवू शकतात. त्यामुळे अमुक गोष्ट मी करू शकणार नाही. हे करणे माझ्यासाठी अवघड आहे असे म्हणून स्वतःला कमजोर समजू नका. स्वतःशी बोलताना नेहमी सकरात्मक बोला. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही तुमच्या धेय्याच्या दिशेने यशस्वीपणे वाटचाल कराल. (Top Marathi News)
कठोर परिश्रम
चाणक्य नीतीमध्ये सांगण्यात आले आहे की यशामध्ये कठोर परिश्रमाचाही विशेष वाटा असतो. मेहनतीशिवाय यश मिळू शकत नाही. जे कष्ट करायला घाबरतात, त्यांना यशाचा आनंद मिळत नाही. कारण कष्ट न करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. अशा परिस्थितीत जर तुम्हाला यश मिळवायचे असेल तर मेहनतीमध्ये न घाबरता आळस सोडून त्यात गुंतून राहा, यामुळे तुम्हाला यश नक्कीच मिळेल. या गोष्टी आत्मसात केल्यावर तुम्हाला कोणीही थांबवू शकणार नाही यश तुमचेच असेल. (Latest Marathi Headline)
शत्रूच्या कमकुवतपणाचा अभ्यास
शत्रूवर विजय मिळवण्यासाठी त्याच्या कमकुवतपणाचा सखोल अभ्यास आवश्यक आहे. चाणक्य सांगतात, “जोपर्यंत शत्रूच्या कमकुवतपणाची माहिती होत नाही, तोपर्यंत त्याच्यावर हल्ला करणे टाळावे.”
========
Chanakya Niti : चाणक्य नीतीनुसार ‘हुशार’ व्यक्ती कशी ओळखाल ?
========
सातत्य आणि लवचिकता
अपयशानंतरही प्रयत्न सुरू ठेवणे आणि परिस्थितीनुसार स्वतःला बदलणे हे यशाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. चाणक्यांच्या मते, “अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.” चाणक्यांच्या या नीतींचा अवलंब करून कोणतीही व्यक्ती अपयशावर मात करून यशाकडे वाटचाल करू शकते. त्यांच्या शिकवणीतून प्रेरणा घेऊन जीवनातील अडचणींवर मात करणे शक्य आहे. (Top Stories)
अस्वच्छता
देवी लक्ष्मीला स्वच्छता आवडते. जे लोक अस्वच्छ राहतात त्यांना देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होत नाही. माणसाने भौतिक, शरीर आणि मनाची शुद्धता करणे गरजेचे असते. त्यामुळे घर आणि शरीराच्या स्वच्छतेची काळजी घ्या. उत्तम आरोग्य, यश आणि पैसा हवा असेल तर घर स्वच्छ ठेवा. (Social News)
( टीप : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. आम्ही या माहितीची कोणतीही पुष्टी करत नाही. आमचा उद्देश फक्त तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics