Home आंतरराष्ट्रीय Donald Trump Ceasefire : ट्रम्पच्या पलटीमागचं सत्य
आंतरराष्ट्रीय

Donald Trump Ceasefire : ट्रम्पच्या पलटीमागचं सत्य

74

इराणला एका रात्रीमध्ये पाषाणयुगात नेऊ शकतो, इराणची सभ्यता आता काही तासांतच संपुष्टात येणार आहे, अशी शेखी मिरवणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी इराणला दिलेल्या मुदतीच्या अवघ्या ९० मिनिटांआधी त्यांचा निर्णय बदलला आहे. इराणसोबत चालू असलेल्या युद्धामध्ये चाळीस दिवसांनंतर दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी जाहीर करण्यात आली. ही शस्त्रसंधी जाहीर करण्याआधी डोनाल्ड ट्रम्प यांचा जो आवेश होता, त्यावरून इराणमध्ये जोरदार हल्ले होणार, असा अंदाज व्यक्त होऊ लागला होता. मात्र ट्रम्प यांनी अचानक युटर्न घेतला आणि अवघ्या जगाला आश्चर्याचा धक्का दिला. जे ट्रम्प इराणला पाषाणयुगात ढकलण्याची धमकी देत होते, तेच आता इराणचा सुवर्णकाळ सुरू झाला असल्याची हमी देत आहेत. ट्रम्प यांनी हा युटर्न कसा आणि का घेतला, याची आता चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या या युटर्नमागे अमेरिकेतील बदलते सत्तेचे समीकरण आहे. कारण ट्रम्प यांच्या आतातायी धोरणांना आता अमेरिकेतही विरोध वाढू लागला आहे. अमेरिकेतील ऐंशीहून अधिक खासदारांनी ट्रम्प यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून अमेरिकेतही त्यांच्याविरोधात निदर्शने सुरू झाली आहेत. ट्रम्प ज्या इराणला पाषाणयुगात पाठवण्याचे स्वप्न पाहत होते, त्या इराणमध्ये मात्र विजयाचा आनंद साजरा केला जात आहे. ( Donald Trump Ceasefire )

इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धविरामाच्या घोषणेनंतर जगभरात सुटकेचा निःश्वास सोडला गेला असला, तरी ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या धमकीनंतर त्यांचा निर्णय कसा आणि का बदलला, याचीही चर्चा आता सुरू झाली आहे. या युद्धविरामानंतर ट्रम्प यांनी त्यांच्या स्वभावानुसार आपल्या विजयाचा दावा केला असला, तरी या युद्धात अमेरिका आणि इस्रायलला इराणने दिलेले जशास तसे उत्तर जगाने पाहिले आहे. यामुळे अमेरिकेचे होत असलेले हसे पाहूनच ट्रम्प यांनी इराणला पाषाणयुगात पाठवण्याची धमकी दिली. ही धमकी दिल्यानंतर अवघ्या काही तासांत ट्रम्प यांनी युद्धबंदी जाहीर केली. या मागे अमेरिकेमध्ये बदलत असलेले सत्तेचे सूत्र आहे. खुद्द ट्रम्प यांचीच खुर्ची धोक्यात आली आहे. आधीच ट्रम्प यांच्या विरोधात व्हाईट हाऊससमोर मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू आहेत. ट्रम्प यांच्या अनेक विश्वासू अधिकाऱ्यांनीही राजीनामे दिल्यामुळे ट्रम्प एकाकी पडल्याचे चित्र आहे. या सर्वात ट्रम्प यांच्या विरोधात सुरू असलेल्या निदर्शनांची व्याप्तीही वाढली आहे. निदर्शकांच्या मते, ट्रम्प यांनी जगावर युद्ध लादले आहे आणि अशा युद्धखोर अध्यक्षांनी पायउतार करेपर्यंत निदर्शने कायम राहणार आहेत. व्हाईट हाऊससमोर अशी निदर्शने चालू असताना तब्बल ८५ खासदारांनी ट्रम्प यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. हे सर्व खासदार विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाचे असले, तरी यापूर्वी अमेरिकेच्या अध्यक्षापुढे ट्रम्प यांच्यासारखा पेच आला नव्हता. या सर्वात ट्रम्प यांनी ईस्टरच्या दिवशी इराणसंदर्भात जी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली, त्याबद्दल त्यांना त्यांच्याच पक्षातील खासदारांनीही सुनावले आहे. अमेरिकेच्या अध्यक्षाला अशाप्रकारची भाषा शोभत नसल्याची टीका त्यांच्यावर चहूबाजूंनी झाली. ( Donald Trump Ceasefire )

=======

हे देखील वाचा : Dubai’s tourism And Hotel Industry : युद्धामुळे दुबईची चमक हरवली

=======

एकीकडे एपस्टाईन फाईल्समधील घृणास्पद गुन्हे लपवण्यासाठी ट्रम्प यांनी हे युद्ध सुरू केल्याची ओरडही होत आहे. या सर्वांमुळे अमेरिकेत ट्रम्पविरोधी वातावरण तयार झाले आहे. व्हाईट हाऊसमध्येही ट्रम्प यांना विरोध वाढत असून आता काँग्रेसमध्ये २५ व्या घटनादुरुस्तीच्या कलम ४ चा वापर करत ट्रम्प यांना सत्तेपासून दूर करण्याबाबत चर्चा होत आहेत. कारण अमेरिकेत अध्यक्षपदावरून कोणालाही हटवणे इतके सोपे नाही. त्यासाठी २५ वी घटनादुरुस्तीचे कलम आवश्यक असते. हेच कलम आता लागू करण्याची मागणी जोमाने होऊ लागल्याने ट्रम्प अस्वस्थ झाल्याची माहिती आहे. कारण यातून उपराष्ट्रपती आणि मंत्रिमंडळातील बहुसंख्य सदस्यांना राष्ट्रपती आपली कर्तव्ये पार पाडण्यास असमर्थ असल्याची लेखी घोषणा करण्याचा अधिकार मिळतो. त्यानंतर उपराष्ट्रपती तात्काळ कार्यवाहक राष्ट्रपती बनतात. सध्या ट्रम्प हे वारंवार आपली विधाने बदलत आहेत, याचाही आधार घेत त्यांची मानसिक स्थिती अस्थिर असल्याचेही दाखवता येऊ शकते. त्यामुळेच अमेरिकेचे उपराष्ट्रपती आणि रिपब्लिकन कायदेकर्त्यांनी एकत्र येऊन ट्रम्प यांना सत्तेपासून दूर करावे, अशी योजना होत आहे. यामुळेच अस्वस्थ झालेल्या ट्रम्प यांनी इराण युद्ध थांबवण्याची घोषणा करत उपराष्ट्रपती जेडी वेन्स यांना चर्चा करण्यासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. आता जे ट्रम्प इराणमधील सत्ता बदलण्याचे स्वप्न पाहत होते, ते ट्रम्प अमेरिकेत आपली खुर्ची टिकवण्यासाठी धडपड करत आहेत. ( Donald Trump Ceasefire )

सई बने…

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

Katrina Kaif
आंतरराष्ट्रीय

Jiang Xueqin : चीनच्या नॉस्ट्राडॅमसने सांगितले ट्रम्पचे भविष्य

अमेरिका-इराण युद्धामध्ये पंधरा दिवसांचा विराम आला आहे. यात चीनची भूमिका असल्याची माहिती...

Jewellery
आंतरराष्ट्रीय

Jared Kushner : ट्रम्पचा जावई आहे तरी कोण

अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धावर कायमचा विराम आणण्यासाठी पाकिस्तानची राजधानी...

Mobile
आंतरराष्ट्रीय

First Lady Melania Trump : अमेरिकेच्या फर्स्ट लेडीसाठी शाही सवारी

इराणमध्ये सत्तांतर करण्याच्या हेतूने अमेरिकेने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणविरुद्ध लष्करी मोहीम...

आंतरराष्ट्रीयगाजावाजा स्पेशल

US-Iran War : अमेरिका नमली की इराण घाबरलं ?

America, Israel आणि Iran यांचे युद्ध गेले ४० दिवस चालू आहे. रोजच्या...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!